Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाणीपुरी खातायं ? सावधान, होऊ शकते धोकादायक इन्फेक्शन !

पाणीपुरी खायला सगळ्यानांच आवडतं. मात्र पावसाळ्यात रस्त्यावरील गाडीवर दूषित पाण्याने बनलेली पाणीपुरी खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे धोकादायक आजारही होऊ शकतात.

पाणीपुरी खातायं ? सावधान, होऊ शकते धोकादायक इन्फेक्शन !
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 4:20 PM

पाणीपुरी खायला कोणाला आवडत नाही? तिखट-आंबट-गोड पाणी आणि रगडा असं कॉम्बिनेशन असलेली ही पाणीपुरी दिसताच अनेकांच्या तोंडालाच पाणी सुटतं. पण पावसाळ्यात ही पाणीपुरी खाणे आरोग्यासाठी हानिकारक (Harmful) ठरू शकते. पावसाळा सुरू होताच अनेक आजार पसरू लागतात. त्यापैकीच एक आजार म्हणजे टायफॉईड. सध्या तेलंगणमध्ये टायफॉईडने धुमाकूळ घातला असून, आरोग्य मंत्रालयाने ( Ministry) त्यासाठी फेमस स्ट्रीट फूड असलेल्या पाणीपुरीला कारणीभूत ठरवले आहे. मे महिन्यात तेलंगणमध्ये टायफॉईडच्या 2700 केसेस तर जून महिन्यात 2752 केसेस समोर आल्या होत्या. डॉक्टरांनुसार, टायफॉईडला पाणीपुरी डिसीज म्हणता येऊ शकते. त्यामुळे सरकारतर्फे नागरिकांना पावसाळ्याच्या काळात स्ट्रीट फूडपासून (Street food) विशेषत: पाणीपुरीपासून लांब राहण्याचा सल्ला दिला जात आहे. पाणीपुरी विक्रेत्यांनी स्वच्छतेची काळजी घेत , शुद्ध पाण्याचाच वापर केला पाहिजे, असेही डॉक्टरांनी नमूद केले आहे.

दूषित पाणी, अन्न आणि डासांमुळे पावसाळ्यात मलेरिया, डायरियासारखे आणि व्हायरल ताप अनेक आजार पसरतात. तेलंगणमध्ये डायरियाच्या 6000 हून अधिक केसेसची नोंद करण्यात आली असून डेंग्युचेही रुग्ण वाढताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

काय आहेत टायफॉईडची लक्षणं ?

टायफॉईडची हा आजार म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, जो दूषित पाणी आणि अन्नातील साल्मानोला टाइफी बॅक्टेरियामुळे पसरतो. या आजाराच्या सुरूवातीच्या काळात ताप, पोटदुखी, डोकेदुखी, जुलाब, कमी भूक लागणे, अशी अनेक लक्षणे दिसून येतात. त्यावर वेळेवर उपाय न केल्यास ही लक्षणे वाढून रक्ताची उलटी, शरीराच्या अंतर्गत ब्लीडिंग होणे आणि त्वचा पिवळी पडणे, असा त्रास सहन करावा लागू शकतो.

पावसाळ्यातील आजार

भारतात सध्या मान्सून सीजन जोरात आहे. या काळात घाणेरडे, दूषित पाणी व अन्नामुळे टायफॉईडसारख्या बॅक्टेरियल आजारांचा सामना करावा लागू शकतो. तसेच या काळात डासांमुळे पसरणारे आजारही वाढतात, ज्यामध्ये डेंग्यू व मलेरियाचा समावेश आहे.

या गोष्टींची घ्या खास काळजी स्वच्छता

पावसाळ्यात शरीर स्वच्छ राखणे अतिशय आवश्यक आहे. जेवणापूर्वी तसेच बाथरूमचा वापर केल्यावर हातपाय स्वच्छ धुवावेत. तसेच बाहेरुन आल्यावरही हे विसरू नये. खोकताना किंवा शिंकताना नाका-तोंडावर रुमाल जरूर ठेवावा. सतत डोळ्यांना अथवा नाकाला हात लावू नये.

स्वच्छ, शुद्ध पाणी प्यावे

पावसाळ्यात बराच वेळा पाणी अशुद्ध येऊ शकते. त्यामुळे पिण्याचे पाणी नीट उकळू, गार करून प्यावे. बाहेर गेल्यावर कधीही उघड्यावरील पाणी पिऊ नये. नेहमी घरातून बाहेर निघताना पाण्याची बाटली सोबत बाळगावी, ती नसेल तर पॅकबंद बाटलीतील पाणी विकत घेऊन ते प्यावे. दूषित पाणी प्यायल्यामुळे डायरिया होऊ शकतो.

रस्त्यावरील पदार्थ खाणे टाळा

पावसाळ्यात नेहमी चमचमीत पदार्थ खायची इच्छा होते. मात्र या काळात रस्त्यावरील चमचमीत पदार्थ खाणे टाळा. खूपच इच्छा झाली तर सरळ घरी बनवून त्या पदार्थांचा आस्वाद घ्या. बाहेरील पदार्थांमुळे पोट बिघडण्याचा धोका असतो.

डासांपासून दूर रहा

पावसाळ्यांत डास, माशांमुळे खूप त्रास होतो, अनेक आजार पसरू शकतात. त्यामुळे घरातील दारे- खिडक्या नेहमी घट्ट बंद कराव्यात. रात्री झोपण्यापूर्वी डासांना पळवून लावणारे कॉईल तसेच क्रीम लावून झोपावे. पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे घातल्यास डास चावण्याचा त्रास कमी होतो. तसेच घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. साचलेल्या पाण्यात डासांची अंडी असतात, त्यांचा त्रास वाढू शकतो.

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.