मधुमेह असणाऱ्यांसाठी ‘हे’ पदार्थ म्हणजे विषचं; चुकूनही यांचे सेवन करू नका अन्यथा रक्तातील साखर उच्चांक गाठेल

मधुमेह असलेल्यांनी काळजीपूर्वक आहार निवडणे आवश्यक आहे. मधुमेह असणाऱ्यांसाठी काही पदार्थ म्हणजे चक्क विषाप्रमाणे आहेत. त्याचे सेवन केलं तर रक्तातील साखरेची पातळी उच्चांक गाठेल. त्यासाठी असे कोणते पदार्थ आहे जे मधुमेह असणाऱ्यांनी पूर्णपणे टाळले पाहिजे. हे नक्की पाहा.

मधुमेह असणाऱ्यांसाठी 'हे' पदार्थ म्हणजे विषचं; चुकूनही यांचे सेवन करू नका अन्यथा रक्तातील साखर उच्चांक गाठेल
Diabetes Diet
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 1:23 PM

मधुमेह म्हटलं की सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकतो. या आजारावर अद्याप तरी कायमस्वरूपी म्हणावा असा इलाज सापडलेला नाही. योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीच्या मदतीने यावर नियंत्रण ठेवता येतं. पण मुळात मधुमेह असणाऱ्यांनी आपल्या आहारात कशाचा समावेश करावा आणि कशाचा नाही याबाबत फार काटेकोरपणे नियम पाळायल हवे.

14 नोव्हेंबर रोजी ‘जागतिक मधुमेह दिवस’

मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी आहाराकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. मधुमेह असणारे रुग्ण जे काही आहार घेतात त्याचा थेट परिणाम त्याच्या रक्तातील साखरेवर होतो. त्यामुळेच मधुमेहाबाबत अधिक जनजागृती होणे गरजेच आहे. तर आज 14 नोव्हेंबर रोजी ‘जागतिक मधुमेह दिवसशी’ रक्तातील साखर नियंत्रीत राहण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे पालन केले पाहिजे आणि कोणत्या पदार्थांचे नाही हे जाणून घेऊयात.

तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या बाबतीत, खाण्यामध्ये थोडासा निष्काळजीपणा देखील रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतो. मधुमेहामध्ये, अशा खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे, ज्यांचे ग्लायसेमिक इंडेक्स पातळी खूप कमी आहे. तर, अशा कीही पदार्थाचे सेवन या व्यक्तींनी टाळले पाहिजे जे त्यांच्यासाठी चक्क विषासारखे काम करू शकतात.

मधूमेह रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ म्हणजे विषाप्रमाणे

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात तांदळाचा पास्ता, पांढरे पीठ, मैदा किंवा पांढराब्रेड यांसारख्या खाद्यपदार्थांचा समावेश अजिबात करू नये. या सर्व पांढऱ्या गोष्टी साखरेची पातळी वाढवण्याचे काम करतात. यासोबतच रिफाइंड पीठ हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक मानले गेले आहे. कारण त्यामध्ये साधे कार्बोहायड्रेट्स आढळतात, जे सहजपणे ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात. यामुळेच मधुमेहाला प्रोत्साहन मिळते. पाहूया कोणत्या पदार्थांनी रक्तातील साखर वाढू शकते.

‘ही’ फळे टाळावी

केळी, चेरी, द्राक्षे, आंबा यांसारख्या फळांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळेच उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या फळांमध्ये त्यांचा समावेश होतो. जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक आहे. तसेच चुकून मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी कोल्ड्रिंक्सचे सेवन तर अजिबात करणे पूर्णपणे टाळा. अन्यथा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.

दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळणे

दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढते. दूध, दही आणि चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ खाणे शक्यतो टाळले पाहिजे . कारण त्यामध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. मधुमेहाच्या रुग्णांनी या गोष्टींपासून दूर राहणेच त्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे.

चहा किंवा कॉफी टाळावी

बऱ्याच लोकांना त्यांच्या सकाळची सुरुवात ही चहा किंवा कॉफीने करायला आवडते. पण चहा-कॉफी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, याची मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. जर तुम्हाला सकाळी चहा प्यायचा असेल तर त्याऐवजी तुम्ही ग्रीन टी किंवा शुगर फ्री ब्लॅक टी घेऊ शकता. मधुमेहादरम्यान तुम्ही कॅफिन असलेले सर्व पदार्थ टाळावेत. केवळ चहा आणि कॉफीच नाही तर दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यानेही रक्तातील साखर वाढते.

मधुमेहाच्या रुग्णांनी नॉनवेजपासून दूर राहणे कधीही उत्तम. कारण ते पचायला बराच वेळ लागतो. त्यामुळे शरीरातील पचनक्रियादेखील बिघडते. अशा परिस्थितीत या रुग्णांनी त्याचे सेवन अजिबात करू नये. याशिवाय कोलोकेशिया, रताळे, बटाटा, फणस इत्यादी नैसर्गिक साखर असलेल्या गोष्टीही त्यांच्यासाठी विषापेक्षा कमी नाहीत.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.