चालल्यानंतरही वजन कमी होत नसेल तर ‘या’ चुका टाळा
वजन कमी करण्यासाठी चालणे हा अत्यंत साधा आणि सोपा व्यायाम आहे. चालल्यामुळे कॅलरीज बर्न होतात. पण चालताना काही चुका केल्या तर वजन कमी होत नाही.
व्यायाम हा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दररोज व्यायाम केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. व्यायाम केल्याने अनेक आजार दूर राहतात. असं म्हणतात की चालणे हा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा व्यायाम आहे. चालल्यामुळे अनेक फायदे होतात. चालल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, तणाव कमी होतो आणि वजन कमी करण्यास देखील याचा फायदा होतो. पण चालताना काही सामान्य चुका केल्या तर तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना त्या अपयशी ठरवू शकतात. अशाच काही सामान्य चुकांबद्दल जाणून घेऊया.
पुरेसे पाणी न पिणे
पाणी ही शरीराची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. पुरेसे पाणी न पिल्यामुळे डीहायड्रेशन होते आणि वजन कमी होण्याची प्रक्रिया मंदावते. त्यासोबतच नारळ पाणी, ज्यूस इत्यादींचे सेवन करावे. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखले जाईल.
एकाच ठिकाणी चालणे
नेहमी एकाच जागी चालल्याने शरीराला त्याच स्नायूंचा वापर होतो. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होत नाही म्हणून वेगवेगळ्या मार्गावर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पृष्ठभागावर चाला. यामुळे शरीराच्या विविध स्नायूंचा व्यायाम होईल आणि वजन कमी होण्यास मदत होईल.
चुकीच्या पद्धतीने चालणे
बरेच लोक चालताना पाय पुढे करत नाही. त्यामुळे कॅलरी बर्निंग कमी होते आणि वजन कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करणे कठीण होते. तसेच खाली पाहून चालणे किंवा फोन कडे पाहत चालणे यामुळे मान आणि खांदे दुखू शकतात. ज्यामुळे चालणे चांगल्या पेक्षा जास्त नुकसानदायक ठरते.
आहार
चालण्यासोबतच संतुलित आहार घेणे देखील गरजेचे आहे. चालल्यानंतर जंक फूड किंवा जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाल्ल्यास वजन कमी करणे कठीण होईल. त्यामुळे फळे, हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, कमी कॅलरी असलेले आणि प्रथिने युक्त पदार्थ खाण्यास प्राधान्य द्या.
अनियमित चालणे
अनियमित चालत नसल्यामुळे वजन कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या कॅलरी बर्न करण्याची शरीराला संधी मिळत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होत नाही त्यासाठी रोज किमान 30 मिनिटे चालणे आवश्यक आहे.