हिवाळ्यात मॉर्निंग वॉकला जाताना टाळा या चुका, अन्यथा फायदा होण्याऐवजी होईल नुकसान
हिवाळ्यात मॉर्निंग वॉकला जाणे ही चांगली सवय आहे. परंतु काही वेळा मॉर्निंग वॉकला जाताना आपण काही चुका करतो ज्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. या छोट्या चुका आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकतात. मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी काही चुका टाळणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता असते.
हिवाळ्यात सकाळी मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यामुळे दिवसभर ताजे तवाने वाटते. मॉर्निंग वॉकमुळे ना आळस येतो ना झोप. पण कधी कधी मॉर्निंग वॉकला जाताना आपण काही चुका करतो. त्यामुळे फायदा होण्याऐवजी तोटा होतो. मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. जर आपण कोणतीही काळजी न घेता घरातून बाहेर पडलो तर यामुळे नुकसान होऊ शकते. त्यामुळे मॉर्निंग वॉक करताना काही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जाणून घेऊ सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्याआधी काय केले पाहिजे आणि काय नाही.
थंड पाणी पिणे टाळा
आपण अनेकदा सकाळी झोपेतून उठल्याबरोबर थंड पाणी पितो. ही सवय आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. थंड पाण्यामुळे हृदयावर परिणाम होतो आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकता. मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी कोमट पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. जेव्हा आपण मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा कोमट पाणी पिऊनच घराच्या बाहेर पडा. त्यामुळे आपल्या शरीरात उर्जेचा चांगला संचार होतो.
चहा किंवा कॉफी पिऊन करू नका मॉर्निंग वॉक
मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी चहा किंवा कॉफी पिल्याने शरीरावर आणि हृदयावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हिवाळ्यात गरम पेय पिल्यानंतर थंड वातावरणात बाहेर जाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. हिवाळ्यामध्ये घरातील वातावरण उबदार असते. चहा किंवा कॉफी पिऊन बाहेर गेला तर फायदा होण्यापेक्षा नुकसान होऊ शकते. त्यामुळे मॉर्निंग वॉक झाल्यानंतर चहा आणि कॉफी प्या.
आंघोळ करून घराबाहेर पडू नका
आंघोळ करून मॉर्निंग वॉकला गेल्याने सर्दी, खोकला आणि मेंदूंच्या नसांवर ताण येऊ शकतो. शरीराचे तापमान आणि बाहेरचे तापमान वेगळे असते. शरीराचे तापमान बदलायला वेळ लागतो. सकाळी उठल्याबरोबर आंघोळ केली आणि डोके ओले केले तर खोकला होऊ शकतो आणि मेंदूच्या नसांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे अंघोळ केल्यानंतर अर्धा तासाने किंवा मॉर्निंग वॉक झाल्याच्या नंतर एक तासाने आंघोळ करा. लक्षात ठेवा की मॉर्निंग वॉकला जाताना डोके झाकून जाणे अत्यंत आवश्यक आहे.
उबदार कपडे घालूनच पडा घरा बाहेर
जेव्हा तुम्ही मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर जाल तेव्हा तुमचे शरीर ऊबदार कपड्यांनी झाकून घ्या. तसेच शूज, हातमोजे आणि टोपी घालूनच मॉर्निंग वॉकसाठी जा. मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी शक्य असल्यास हलका वॉर्म अप किंवा व्यायाम करा त्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानाच्या बरोबरीने येईल यानंतर मॉर्निंग वॉकला सुरुवात करा. तुमच्या मॉर्निंग वॉकच्या वेळी ही अचानक वेगाने चालणार नाही याची काळजी घ्या प्रथम हळूहळू चालणे सुरू करा आणि नंतर वेगाने चाला. साधारणपणे 45 मिनिटांसाठी मॉर्निंग वॉक करा आणि नंतर घरी आल्यावर शरीराला काही वेळ विश्रांती द्या आणि मग पौष्टिक नाष्टा करा. या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमचा मॉर्निंग वॉक केवळ सुरक्षितच नाही तर अधिक फायदेशीर बनवू शकता.