Health care : शांत झोप हवी असेल कधीही पोटावर झोपू नका, जाणून घ्या कारण !

शांत झोप आरोग्यासाठी अतिशय गरजेची असते. तुम्ही कोणत्या पोझिशनमध्ये झोपता, हेही फार महत्वाचे असते. झोपण्याची पोझिशन योग्य असेल तर चांगली आणि शांत झोप लागण्यास मदत होते. कधीही पोटावर झोपू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

Health care : शांत झोप हवी असेल कधीही पोटावर झोपू नका, जाणून घ्या कारण !
रात्री लवकर झोपल्यामुळे मिळतात 'हे' फायदे Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 7:08 PM

निरोगी आयुष्यासाठी शांत झोप (Sound Sleep) अतिशय गरजेची असते. ज्यादिवशी आपली झोप नीट होत नाही, आपला तो पूर्ण दिवस चिडचिड करण्यात जातो, कशातच लक्ष लागत नाही. तुम्ही कोणत्या पोझिशनमध्ये झोपता (Sleeping position) हेही महत्वाचे असते. पोझिशन योग्य असेल तर शांत आणि गाढ झोप लागते. आणि सकाळी उठल्यावर छान, फ्रेश वाटते. बरेच जण सांगतात की झोपताना कधीही पोटावर झोपू नये. त्याने खूप अस्वस्थ (Uneasy)वाटते. तसेच पोटभर खाऊन लगेच आडवं होऊ नये. जेवण आणि झोप यामध्ये किमान दोन तासांचे तरी अंतर असावे, झोपण्यापूर्वी शतपावली करावी, असे अनेक सल्ले दिले जातात. मग झोपण्यासाठी नक्की चांगली पोझिशन कोणती? काय केले म्हणजे शांत झोप लागते? हे जाणून घेऊया.

शांत झोपेसाठी काय आवश्यक ?

भरपेट जेवल्यावर कधीही झोपू नका. विशेषत: रात्रीचे जेवण करताना दोन घास कमीच जेवा. जेवण झाल्यावर थोडा वेळ फेऱ्या माराव्यात. त्याने जेवण पचायला मदत होते. सैलसर कपडे घालून झोपा. झोपण्यापूर्वी काही काळ तरी मोबाईल, टीव्ही बघू नका. शांत मनाने झोपायला जा. मुख्य म्हणजे, कधीही पोटावर झोपू नका, त्याने पोटावर दाब येतो व अस्वस्थ वाटू शकते. झोपताना सरळ (पाठीवर) किंवा डाव्या कुशीवर वळून झोपावे. झोपण्यासाठी ही सगळ्यात उत्तम पोझिशन आहे. यामध्ये पोट वरच्या बाजूला राहते, ते दाबले जात नाही. फ्री मूव्हमेंट राहते. त्यामुळे ही पोझिशन झोपण्यासाठी सर्वोत्तम ठरते.

उजव्या कुशीवर झोपणे टाळा

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, उजव्या कुशीवर वळून झोपणे टाळले पाहिजे. याला राइट लॅटरल पोझिशन म्हणतात, मात्र त्यावर झोपू नये. जेव्हा आपण उजव्या कुशीवर वळून झोपतो, तेव्हा फूड पाइपचा खालचा भाग किंवा पोटाचा वरचा भाग, ज्याला GE जंक्शन म्हटले जाते. तिथे अन्न एकत्रित होते. ते वरच्या बाजूस येऊ शकते. उजव्या कुशीवर वळून झोपल्यामुळे अन्न, पाणी किंवा हवा वर येऊ शकते. आणि आपण झोपेत असताना ते आपल्या नाकातून अथवा तोडांतून बाहेर येऊ शकते. अथवा त्याचे काही कण फुप्फुसांमध्येही जमा होऊ शकतात. हे न्यूमोनियासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे साधारणत: उजव्या कुशीवर वळून झोपणे टाळले पाहिजे.

हे सुद्धा वाचा

तसेच पोटावर झोपणेही टाळावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. पोटावर झोपल्यास आपला डायफ्रॅम दाबला जातो. आतड्यांची हालचालही नीटपणे होत नाही. पोट फुलून येते, ज्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटत राहते आणि आपल्या झोपेतही अडथळा येत राहतो. शांत झोप न झाल्यास त्याचा परिणाम आरोग्यावर होता. म्हणून पोटावर झोपणे टाळले पाहिजे.

Non Stop LIVE Update
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?.
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.