Ayurvedic tips : हे सात मसाल्याचे पदार्थ आहेत आरोग्यदायी; नियमित सेवनाने मिळेल अनेक आजारांपासून मुक्ती

आयुर्वेदात (Ayurveda) सांगितल्यानुसार तुमचे स्वयंपाकघर (Kitchen) हे आवश्यक पोषक तत्वांचे भांडार आहे. स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे मसाले (Spices) असतात जे पदार्थांमध्ये वापरले जातात. हे मसाले बाजारात सहज मिळतात. मसाले जेवणाची चव तर वाढवतातच पण तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात.

Ayurvedic tips : हे सात मसाल्याचे पदार्थ आहेत आरोग्यदायी; नियमित सेवनाने मिळेल अनेक आजारांपासून मुक्ती
आरोग्यदायी मसाले पदार्थ
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 4:26 PM

Ayurvedic tips :  आयुर्वेदात (Ayurveda) सांगितल्यानुसार तुमचे स्वयंपाकघर (Kitchen) हे आवश्यक पोषक तत्वांचे भांडार आहे. स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे मसाले (Spices) असतात जे पदार्थांमध्ये वापरले जातात. हे मसाले बाजारात सहज मिळतात. मसाले जेवणाची चव तर वाढवतातच पण तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. या मसाल्याच्या नियमित सेवनाने तुमचे वजन तर कमी होतेच याशिवाय तुमच्या शरीरातील डिटॉक्स कमी करण्यासाठी देखील त्यांची मदत होते. या मसाल्यांमध्ये दालचिनी, जिरे, धणे आणि हिंग यांसारख्या मसाल्यांचा समावेश होतो. हे मसाले तुमची पचनसंस्थाही निरोगी ठेवतात. तसेच असे अनेक मसाल्यांचे पदार्थ असतात, ज्यांच्या घरगुती उपयोगाने तुम्ही सर्दी, खोकल्या सारख्या आजारांपासून दूर राहतात. आज आपण अशाच काही मसाल्यांच्या पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

आले

आले हा एक प्रसिद्ध असा मसाल्याचा पदार्थ आहे. आल्याचा वापर हा जवळपास प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात होतो. आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असताता त्यामुळे आयुर्वेदात आल्याला महत्त्व आहे. आल्याच्या नियमित सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच पोटातील पाचक एन्झाईम्सचा स्राव वाढतो, हा स्राव पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतो. जेवणात आल्याचा समावेश करण्यासोबतच तुम्ही आल्यापासून बनवलेल्या चहाचेही सेवन करू शकता.

दालचिनी

दालचिनीमध्ये अँटीव्हायरल गुणधर्म असतात. हे सर्दीस कारणीभूत असलेल्या विषाणूंशी लढण्यास मदत करते. यात दाहकविरोधी गुणधर्म देखील आहेत जे घसा दुखीपासून आराम देतात.

जिरे

जिऱ्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. हे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.

कोथिंबीर

या मसाल्याच्या पदार्थामध्ये उष्णताविरोधी गुणधर्म आहेत. पोटात जास्त उष्णतेमुळे ऍसिड रिफ्लक्सचा त्रास होत असलेल्या लोकांसाठी कोथिंबीरीचे नियमित सेवन चांगले मानले जाते. पोट फुगण्याच्या समस्येवर देखील कोथिंबीर एक चांगले औषध आहे.

हिंग

हिंगाला सुवासिक असा वास असतो, पचन सुधारण्यासाठी विविध अन्नपदार्थांमध्ये हिंगाचा उपयोग केला जातो. हिंगाच्या नियमित सेवनाने पचनसंस्था मजबूत होते. तसेच पोटदुखीवर देखील हिंग हा रामबाण उपाय आहे.

हळद

हळदीचा वापर बहुतेक सर्वच पदार्थांमध्ये केला जातो. आयुर्वेदिक उपचारांमध्ये हळदीला अतिशय महत्त्व आहे. हळदीच्या सेवनामुळे पित्त दोष दूर होतात. तसेच हळदीमुळे तुमची इम्युनिटी वाढण्यास देखील मदत होते. हळदीच्या नियमित सेवनाने सांधेधुखीपासून देखील आराम मिळतो.

संबंधित बातम्या

Budget 2022 : आता सर्व आरोग्य सुविधा एकाच प्लेटफॉर्मवर, अर्थमंत्र्यांकडून नव्या पोर्टलची घोषणा!

Budget 2022 :तणाव, नैराश्यमुक्तीसाठी विशेष कार्यक्रम राबवणार; सीतारमण यांची मोठी घोषणा

Budget 2022 : आपत्कालीन विम्यांतर्गत 5 लाखांची मदत, केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.