Baby health: लहान मुलांना या पदार्थांपासून होऊ शकते अलर्जी…जाणून घ्या एका क्लिकवर कोणते आहे ते पदार्थ
लहान मुलांचं संगोपन करणं कठिण काम आहे. 6 महिन्यांचं बाळ झाल्यावर आपण त्याला आईच्या दूधाव्यतिरिक्त खाण्यास द्यायला पण सुरुवात करतो. साधारण वरणाचं पाणी, भाताची पेस्ट, फळं इत्यादी गोष्टी आपण त्यांना खायला देतो. मग अशावेळी लहान मुलांना कुठल्या पदार्थापासून अलर्जी होऊ शकते हे आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आज आपण या सगळ्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
लहानमुलांच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. 6 महिन्यांचं बाळ झाल्यानंतर आपण त्याला अनेक पदार्थांची ओळख करुन देतो. त्याची चव त्याला द्यायला सुरुवात करतो. पण अशावेळी या पदार्थांमुळे आपल्या मुलाला कुठल्याही प्रकारची अलर्जी होत नाही आहे ना हे ओळखणं गरजेचं आहे. लहान मुलं स्वत: काही सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्यालाच हे लक्ष ठेवावं लागतं. असे कुठले पदार्थ आहे ज्यामुळे मुलांना अलर्जी होऊ शकते, त्यांना अलर्जी झाली हे कसं ओळखायचं या सर्व बाबी विषय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कुठल्या मुलांना होऊ शकते अलर्जी
साधारण 6 महिन्यांपासून ते 12 महिन्यांपर्यंत मुलांना खाण्यातून अलर्जीचा त्रास होऊ शकतो. काही मुलांना हा त्रास 3 वर्षांपर्यंत होतो. कायम लहान मुलांमध्ये होणार बदल आणि त्यातून होणारी अलर्जीकडे कायम लक्षपूर्वक पाहा. आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
या पदार्थाने होऊ शकते अलर्जी
शेंगदाणे, फ्रीश, अंडा, गहू, बदाम, काजू, सोया दूध, सोयाबीन, तीळ या पदार्थांनी मुलांना अलर्जीचा त्रास होऊ शकतो.
कसं ओळखणार अलर्जी झाली ?
1. उल्टी आणि जुलाब 2. पोट दुखणे 3. त्वचेवर लाल दाणे येणे 4. श्वास घेताना त्रास होणे 5. पोटात वारंवार गॅस होणे 6. तोंडाला सूज येणे 7. त्वेचेला किंवा चेहऱ्याचा आजूबाजूनला खाज सुटणे 8. ओठावर सूज येणे 9. या सतत छिंका येणे
याकडे नक्की लक्ष द्या
लहान मुलाला एखादा नवीन पदार्थ खायला दिला असेल तर जवळपास 72 तास त्याला दुसरा कुठलाही पदार्थ देऊ नका. कारण त्या पदार्थापासून त्याला कुठल अलर्जी होते आहे हे तुमचा लक्षात येणार नाही. एखादा पदार्थ लहान मुलाला खायला दिला असेल तर त्याच्या शरीरात काही फरक जाणवतो आहे का हे लक्ष द्या. जर असं काही जाणवलं तर डॉक्टारांशी संपर्क करावा आणि त्यांना यासंदर्भात माहिती द्यावी. मग डॉक्टरच्या सांगण्यानुसार तो पदार्थ लहान मुलांच्या जेवण्यात समावेश करु नये. तसंच लहान मुलांना आईचं दूध हे वरदान आहे त्यामुळे ब्रस्टे फीड जास्तीत जास्त करा.
इतर बातम्या-