पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही? चिंता करु नका! चुटकीसरशी दुखणं गायब करणारा उपाय
अनेक वेळा बसून कामे केल्याने पाठदुखीची समस्या निर्माण होत असते. बदलत्या काळानुसार कामाच्या पध्दतींमध्येही बदल झालेत, यातून अनेकांना पाठदुखीचे दुखणे लागले आहे.
पाठदुखी (Back pain) ही महिला व पुरुषांमध्ये एक सामान्य समस्या आहे. अनेकांना पाठदुखीच्या इतक्या वेदना होतात की त्यातून त्यांना काही दिवसांसाठी कामापासून दूर रहावे लागते, अनेक व्यायाम, उपचार करुनही पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही. ऑफिसमध्ये (office) तासन्तास काम केल्याने आणि सतत एकाच ठरावीक पध्दतीने बसल्याने पाठदुखी होत असते. थोडेसे वाकले तरी पाठीला अत्यंत वेदना होत असता. 8 ते 9 तासांच्या ऑफिस वर्कमुळे अनेकांना पाठदुखी होत असते. पाठदुखी ही सामान्य समस्या असल्याने अनेक लोक याकडे दुर्लक्ष करीत असतात. परंतु दीर्घकाळापर्यंत (long time) चालणारी पाठदुखीची समस्या तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यावर काही उपाय आहेत, त्यामुळे पाठदुखीची समस्येपासून आराम मिळू शकतो.
पाठदुखीची काय आहेत कारणे
जास्त वेळ एकाच प्रकारे बसणे, शरीराची हालचाल न करणे, वजन जास्त असणे किंवा व्यायाम न करणे यामुळे लोकांना पाठदुखीचा त्रास होतो. खेळताना किंवा प्रवास करताना वारंवार धक्के बसल्यानेही अनेक वेळा पाठीच्या कण्याला त्रास होतो ज्यामुळे पाठदुखी होते. जास्त मानसिक ताण आणि थकवा यांमुळे आपल्या पाठीचे स्नायू ताणले जातात, ज्यामुळे पाठदुखी होते. अनेक वेळा लोक रात्री झोपताना पाय दुमडून झोपतात. यातूनही पाठदुखीची समस्या निर्माण होत असते.
1. पाठीचा कणा ताठ ठेवा
चालताना किंवा बसताना, पाठ सरळ ठेवा, यामुळे तुमचा पाठीचा कणा ताठ राहतो. वाकून बसल्याने पाठदुखीची समस्या निर्माण होत असते. विशेषतः ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवत असलेल्या व्यक्तींनी बसताना पाठ नेहमी सरळ ठेवली पाहिजे. तसेच कार्यालयात काही वेळानंतर फेरी मारत पुन्हा कामाला सुरुवात केली पाहिजे.
2. व्यायाम करताना वाकने टाळावे
अनेक लोक पाठीचे दुखणे जाण्यासाठी तसेच शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करतात. परंतु ज्याना पाठीचे दुखणे आहे अशा लोकांनी काही व्यायाम टाळायला हवे, वाकून व्यायाम करणे तुमची पाठदुखी अजूनच वाढवू शकते. त्यामुळे असे व्यायाम न केलेले बरे असतात.
3. सलग काम करु नका
काहींना कामाचा इतका ताण असतो की, त्यामुळे ते संपूर्ण वेळ फक्त कामच करीत असतात. काही क्षणाचीही उसंत घेत नाही. त्यामुळे सतत बसून असल्यामुळे पाठीचे दुखणे लागू शकते. त्यामुळे कामात काही वेळाची विश्रांती आवश्यक असते. कामांत किमान एक तासाच्या अंतराने ब्रेक घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही कुठे बाहेर जाऊ शकत नसाल तर तुमच्या ऑफिसमध्येच एक फेरी मारा व पुन्हा कामाला लागा.
4. जड वस्तू उचलू नका
कोणतीही जड वस्तू उचलू नका. जर एखादी जड वस्तू उचलायची असेल तर आधी गुडघे वाकवून मग ती वस्तू उचलावी. असे केल्याने सर्व भार कंबरेवर जाण्याऐवजी गुडघ्यावर येईल, तसेच अवजड कामे करताना कुणाचीतरी मदत नक्की घ्या, यातून सर्वच भार तुमच्यावर येणार नाही.
5. सकस आहाराचा समावेश करा
पाठदुखीसह अन्य दुखणे मुळापासून नष्ट करण्यासाठी आपल्या रोजच्या जेवणात सकस आहाराचा समावशे करणे गरजेचे आहे. व्हिटॅमिन डी 3, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम, फॉस्फरस, हिरव्या भाज्या खाल्ल्याने पाठदुखीमध्ये आराम मिळतो. जर तुम्ही मांसाहार करू शकत असाल तर आहारात माशांचा नक्कीच समावेश करा. यातून आपली हाडे मजबूत होत असतात.
संबंधित बातम्या :
सांधेदुखीचा आणि संधीवाताचा एकमेकांशी काय संबंध? तुमची हाडं वाजत असतील, तर हे वाचाच!
झुंबा डान्स’चे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
Eye Care : डोळ्यातून सतत पाणी येण्याची समस्या? मग ‘हे’ खास घरगुती उपाय करून पाहा!