दुर्गंधी न येणे हे असू शकते 100 हून अधिक आजारांचे लक्षण

बऱ्याच काळापासून कोणत्याही प्रकारचा वास येत नसेल तर हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते त्यामुळे लवकरच डॉक्टरांचा सल्ला घ्या.कारण एका संशोधनानुसार हे अनेक प्रकारच्या आजारांमुळे देखील होऊ शकते.

दुर्गंधी न येणे हे असू शकते 100 हून अधिक आजारांचे लक्षण
Bad breathImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 8:00 AM

नाक बंद असताना कोणत्याही गोष्टीचा वास न येणे हे एक सामान्य लक्षण आहे. पण दीर्घकाळ वास न येणे हे धोकादायक ठरू शकते. शंभराहून अधिक रोगांचे प्रारंभिक लक्षण म्हणजे कोणत्याही गोष्टीचा वास न येणे. त्यामुळे जर तुम्हाला ही बऱ्याच काळापासून कोणत्याही प्रकारचा वास येत नसेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.कारण एका संशोधनानुसार हे अनेक प्रकारच्या आजारांमुळे देखील होऊ शकते. अनेकदा काही विशिष्ट आजारामुळे लोकांना कोणत्याही प्रकारचा दुर्गंध जाणवत नाही. थंडीत नाक बंद होण्यापासून ते कोविडमध्ये लोकांना काहीही वास न येण्यापर्यंत अशी लक्षणेही आपण पाहिली आहेत.

कोणत्याही प्रकारचा दुर्गंध जाणवणे ही आपल्या पाच इंदिरांपैकी एक आहे जे आपल्याला लहानपणापासूनच मिळते परंतु काही आजारांमुळे आपली ही भावना काम करणे थांबून जाते. त्यामुळे आपली कोणत्याही गोष्टीचा वास घेण्याची क्षमता नष्ट होते.नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार 139 वैद्यकीय परिस्थिती आहेत ज्यामध्ये कोणताही वास घेण्याची आपली क्षमता नष्ट होते.

संशोधन काय सांगते

चार्ली डनलॉप स्कूल ऑफ बायोलॉजीकल सायन्सेसच्या संशोधकांनी, द ऑक्सफर्ड रिसर्च सेंटर इन द ह्युमॅनिटीच्या सहकार्याने असे संशोधन केले आहे ज्यामध्ये अशा प्रकारच्या 139 वैद्यकीय परिस्थितीचा मानवी वास घेण्याच्या क्षमतेशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. ज्यामुळे रुग्ण कोणत्याही प्रकारची दुर्गंधीचा वास घेऊ शकत नाही. हे लक्षण अगदी सामान्य मानले जात असले तरी देखील हे विविध न्यूरोलॉजिकल आणि शारीरिक रोगांचे प्रारंभिक लक्षण असू शकते. त्याचा संबंध एखाद्या व्यक्तीच्या स्मरणशक्तीशीही असल्याचा आढळून आले आहे.

कोणत्या रोगांशी संबंध

अलझायमर आणि पार्किन्सन्स सारख्या आजारांशी देखील संबंध आहे . कोरोना व्हायरस आणि सायनुसायटीस सारख्या प्रमुख आजारांशी देखील याचा संबंध आहे. या संशोधनानुसार जर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गोष्टीचा वास न आल्यासारखी लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण हे आजारांची प्रारंभिक लक्षणे असू शकतात.ज्याद्वारे रुग्णांवर उपचार करता येवू शकतात.वेळीच उपचार घेतले तर आजार वाढण्यापासून रोखणे देखील शक्य होते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.