शिंका आल्यावर शिंका थांबवणे ठरू शकते धोकादायक , परिणामी ओढावू शकतो मृत्यू!

वातावरणामध्ये बदल झाल्याने अनेकांना शिंका येते. शिंका घेण्यामागे करणे सुद्धा असू शकतात परंतु आपल्यापैकी अनेक जण शिंका आल्यावर शिंका थांबवतात जर तुम्ही सुद्धा जमत असेल तर आत्ताच सावध व्हा असे अजिबात करू नका ..असे केल्याने मृत्यू सुद्धा होऊ शकतो, चला जाणून घेऊ या त्यामागे असलेले कारण..

शिंका आल्यावर शिंका थांबवणे ठरू शकते धोकादायक , परिणामी ओढावू शकतो मृत्यू!
शिंका रोखण्याचे दुष्परिणाम
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 12:30 AM

मुंबई : वातावरणामध्ये बदल झाल्याने अनेकांना शिंका येते. शिंका(sneezing) घेण्यामागे करणे सुद्धा असू शकतात परंतु आपल्यापैकी अनेक जण शिंका आल्यावर शिंका थांबवतात जर तुम्ही सुद्धा जमत असेल तर आत्ताच सावध व्हा! असे अजिबात करू नका, असे केल्याने मृत्यू (death) सुद्धा होऊ शकतो, निसर्गाने म्हणजेच प्रकृतीने मानवाचे शरीर बनवलेले आहे. मानवी शरीरामध्ये (human body) अनेक अशा काही महत्त्वाच्या गोष्टी समाविष्ट करण्यात आलेले आहे की, ज्यामुळे मनुष्याला त्याचे वेगळेपण प्राप्त झालेले आहेत. अशा अनेक गोष्टी निसर्गाने मानवाच्या शरीरामध्ये बनवलेल्या आहेत जेणेकरून अनेक समस्या आजारापासून त्याचे संरक्षण होऊ शकते.

आपल्यापैकी अनेकांना शिंका येतात तसे तर शिंका येणे ही सर्वसाधारण बाब आहे.शिंका येण्याची अशी काही विशिष्ट वेळ असते ती पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने आपल्याला येते.असे म्हटले जाते की, शिंका येणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा चांगले मानले जाते परंतु अनेकदा असे घडते की आपल्याला अचानक शिंका येतात आणि आपण शिंका रोखून धरतो. चारचौघांमध्ये असतो तेव्हा शिंका थांबवण्याचा प्रयत्न करतो परंतु असे करणे चुकीचे आहे. असे जर तुम्ही करत असाल तर असे करणे तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकते आणि परिणामी तुमचा मृत्यू (cause death) सुद्धा ओढवू शकतो.

शिंका न थांबवण्यामागे हे आहे कारण ..

तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, शिंका थांबवणे आपल्या आरोग्याच्या अनुषंगाने अत्यंत धोकादायक ठरते. अनेकदा असे केल्याने तुमचा जागेवर मृत्यू सुद्धा होऊ शकतो. असे का ?यामागे नेमके काय कारण असते ?या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. अनेकदा एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल तर आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीला शिंका येतात तेव्हा एखादी व्यक्ती तरी असते जी त्या व्यक्तीला “गोड ब्लेस यु” असे म्हणते.

शिंका रोखल्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम

नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार एक गोष्ट समोर आलेली आहे की,जेव्हा आपल्याला शिंका येतात आणि अशावेळी आपण शिंका थांबवतो त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर पडतो आणि यामुळे शरीरातील अनेक अवयव यांची कार्य थांबून त्यांच्यावर ताण पडतो, त्याच्या कार्यक्षमतेवर वर सुद्धा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. अनेकदा आपल्याला शिंका येतात तेव्हा अशावेळी आपण नाक दाबून धरतो, असे केल्याने अनेकदा आपल्या गळ्यातील व कानातील ज्या काही पेशी व नसा आहेत त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडतो आणि परिणामी यांच्यातील रक्तप्रवाह गती सुद्धा वाढून जाते. असे केल्याने त्याचा प्रत्यक्ष परिणाम आपल्या मेंदूवर होतो आणि मेंदूवर ताण निर्माण झाल्याने शरीरातील संपूर्ण शरीर संस्थाच बिघडून जाते.

कानाचा पडदा फाटण्याची शक्यता!

तज्ञ मंडळी यांच्या मते, शिंका थांबवल्याने त्याचा विपरीत परिणाम फक्त नाक आणि गळा यांच्यावर तर होतोच पण तसेच कानावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर झालेला पाहायला मिळतो असे केल्याने आपल्या कानाचा पडदा फाटण्याची शक्यता असते. असे म्हटले जाते की जेव्हा आपल्याला शिंका येते तेव्हा आपल्या शरीरामध्ये जे काही किटाणू ,विषाणू असतात ते शिंका द्वारे बाहेर पडतात. परंतु आपण अनेकदा असे करण्यापासून स्वतःला रोखतो त्यामुळे हे विषाणू व कीटाणू आपल्या शरीरामध्ये राहतात आणि परिणामी आपल्या शरीरावर याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो.

हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता

जेव्हा आपल्याला शिंका येते तेव्हा त्या शिंकेचा वेग प्रचंड प्रमाणात असतो आणि अशा वेळी जर आपण शिंका थांबवली तर त्याचा दुष्परिणाम आपल्या डोळ्यांवर सुद्धा झालेला पाहायला मिळतो. तसेच येणारी शिंका जर आपण थांबवली तर याने हृदयावर ताण पडतो आणि तुम्हाला हृदयविकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो म्हणूनच या सगळ्या समस्या जर भविष्यात उद्भवू नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर भविष्यात येणाऱ्या शिंका चुकून सुद्धा थांबवू नका.शिंका थांवण्याचा प्रयत्न कराल तर तुमचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

इतर बातम्या :

आयुर्वेदिक उपचारांनी खरंच उंची वाढू शकते का? डॉक्टरांनी सगळ्या शंकांच निरसन केलंय!

Herbal Tea | घशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी या चार ‘हर्बल टी’ आहेत प्रभावी…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.