अस्वस्थ वाटतं का? लवकर टेन्शन येतं का? तुमच्या या सवयी बदला
जर तुम्हाला अनेकदा अस्वस्थता वाटत असेल तर तुम्ही खाण्याच्या सवयी बदलायला हव्यात. जर तुमचे शरीर चिंताग्रस्त असेल आणि अस्वस्थतेला सामोरे जावे लागत असेल तर काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त काही वाईट खाण्याच्या सवयींपासून मुक्त व्हावे लागेल.
सध्याच्या काळातील व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांचे टेन्शन वाढले आहे, ज्यामुळे नैराश्य, टेन्शन आणि तणावाला सामोरे जावे लागत आहे. सहसा कौटुंबिक कलह, ऑफिसमधील समस्या, पैशांची समस्या, मैत्री-प्रेमाची फसवणूक अशा कारणांमुळे तणाव निर्माण होतो. पण अनेकदा आपल्याच चुकीमुळे अशा समस्या उद्भवतात. जर तुम्हाला अनेकदा अस्वस्थता वाटत असेल तर तुम्ही खाण्याच्या सवयी बदलायला हव्यात. ग्रेटर नोएडाच्या जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आयुषी यादव म्हणाल्या की, जर तुमचे शरीर चिंताग्रस्त असेल आणि अस्वस्थतेला सामोरे जावे लागत असेल तर काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त काही वाईट खाण्याच्या सवयींपासून मुक्त व्हावे लागेल. कारण ते आरोग्याला खूप हानी पोहोचवतात, ज्याचा परिणाम आपल्या मेंदूवरही होतो.
दारू पिण्याची सवय
तरुणांसह सर्व वयोगटातील लोकांमध्ये दारू पिण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे, काही लोक स्वत:ला ट्रेंडी दाखवण्यासाठी असे करतात, त्यामुळे अनेकांना वाटते की यामुळे त्यांचे टेन्शन दूर होते. पण बराच वेळ त्याचे सेवन केल्याने त्याचे वाईट व्यसनात रूपांतर होते. यात असणारी रसायने तुमची चिंता वाढवण्याचे काम करतात, याचे आरोग्यावर. अल्कोहोल बऱ्याचवेळा त्वरित विश्रांती देतं. परंतु यामुळे आपल्या मज्जातंतू देखील कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे दारू ही आरोग्यासाठी कधीही हानिकारकच!
गोड खाणे
गोड पदार्थ आपल्याला खूप आकर्षित करतात, पण त्या आरोग्यासाठी अजिबात चांगल्या नसतात, त्याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे टेन्शन वाढते. आपण आपल्या खाण्याच्या सवयी बदलल्या पाहिजेत आणि गोड खाणं पिणं टाळलं पाहिजे.
सिगारेट
अनेक तरुणांना सिगारेटचा छंद असतो. पण त्याचा हळूहळू त्यांना फटका बसतो. सिगारेट ओढण्याचा परिणाम थेट मेंदूवर होतो, ज्यामुळे सवय तयार होते. जेव्हा त्याची सिगारेटसाठीची तळमळ वाढते, तेव्हा अस्वस्थता वाढते.
प्रोसेस्ड फूड
तंत्रज्ञानाच्या विकासानंतर अन्न साठवून ठेवण्याचा कल वाढला आहे, त्यामुळे हल्ली अनेक प्रकारचे प्रोसेस्ड म्हणजेच प्रक्रिया केलेले पदार्थ बाजारात आले आहेत. परंतु यामुळे अपचन किंवा पोटात सूज येऊ शकते. त्यामुळे नेहमीच ताज्या गोष्टी खाणं चांगलं.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)