राम कपूरने कसे कमी केले वजन? या ट्रिक्स ची तुम्हाला देखील होऊ शकते मदत
गेल्या अनेक वर्षांत त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या वाढत्या वजनाचीही बरीच चर्चा झाली, पण 2019 साली त्याने वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशनच्या माध्यमातून सर्वांना चकीत केले. शेवटी त्यांनी असा काय चमत्कार केला?
टीव्ही आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या राम कपूरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांची लोकप्रिय मालिका ‘बडे अच्छे लगते हैं’ प्रचंड गाजली होती. गेल्या अनेक वर्षांत त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या वाढत्या वजनाचीही बरीच चर्चा झाली, पण 2019 साली त्याने वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशनच्या माध्यमातून सर्वांना चकीत केले. शेवटी त्यांनी असा काय चमत्कार केला?
राम कपूरने कसे कमी केले वजन?
जर तुम्हीही राम कपूरप्रमाणे वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर याच ट्रिक्स फॉलो करा ज्या या अभिनेत्याने अवलंबल्या. त्यांनी अधूनमधून उपवासाचा (Intermittent Fasting) आधार घेतला, ज्यात त्यांना अनेक तास न खाता-पिता राहावे लागले.
राम कपूर यांनी 16:8 चा डाएट प्लॅन फॉलो केला, ज्यानुसार ते दिवसातून फक्त 8 तास खात-पिता, उरलेले 16 तास उपवास ठेवत असत. तुम्ही संपूर्ण आठवडा किंवा 3 दिवस या पद्धतीचा अवलंब करू शकता.
ही युक्ती कशी कार्य करते?
जेव्हा आपण हा डाएट रूटीन फॉलो करता तेव्हा कॅलरीचे प्रमाण कमी होऊ लागते आणि चयापचय वाढते, यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढतो. अशावेळी रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यासही मदत होते.
अधूनमधून उपवास करताना रात्री खाणे टाळावे लागते, काही दिवस फक्त निरोगी गोष्टींवर घालवावे लागतात. राम कपूर रात्री झोपण्यापूर्वी कार्डिओ एक्सरसाइज करायचे, सकाळी उठल्यावर आधी मॉर्निंग वॉकला जायचे, मग जिमला जायचे. याशिवाय हेवी वेट ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा फिटनेस सुधारला.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)