काही लोकांना रात्री अंघोळ (Night Bath) करून झोपण्याची सवय असते. कारण, अंघोळ केल्यावर फ्रेश वाटतं आणि दिवसभरातील शरिरातील घाम दुर्गधी निघून जाते. पण तुम्हाला माहित आहे का की, रात्री अंघोळ केल्यानंतर झोपणे आरोग्यासाठीही खुप फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या शरीरात अनेक बदल (Many changes in the body) होऊ शकतात. असे केल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापासून ते त्वचा सुंदर बनवण्यासाठी रात्रीची आंघोळही उपयुक्त ठरू शकते. रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करणे ही एक चांगली सवय आहे. रात्रीची अंघोळ केल्याने, केवळ तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटत नाही. तर, त्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान देखील सामान्य राहते. झोपण्यापूर्वी आंघोळ करणे शरीरासाठी अनेक प्रकारे चांगले असते. जर तुम्ही रात्री अंघोळ करत नसाल तर आजच ही सवय स्वतःला लावून घ्या.. यामुळे तुमचे आरोग्य ठणठणीत राहील. या सोबतच रक्तदाबाच्या तक्रारीही (Complaints of high blood pressure) दूर होतील.
जेव्हा तुम्ही रात्री अंघोळ करता तेव्हा ते तुमचे मन आणि शरीर त्वरित ताजेतवाने होते. रात्री, अंघोळ केल्याने तुमचा मूड फ्रेश होऊन मन आणि शरीर दोन्ही शांत होण्यास मदत होते. तसेच तणाव कमी होण्यास मदत होईल.
याशिवाय ज्या लोकांना झोप येत नाही, ते रात्री अंघोळीचा पर्याय निवडू शकतात. ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल. कारण अंघोळ केल्याने तुमचा तणाव दूर होतो, ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते.
रात्री अंघोळ केल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते हे तुम्हाला माहीत आहे का? एवढेच नाही तर मायग्रेन, अंगदुखी आणि सांधेदुखीच्या तक्रारीवर रात्रीची अंघोळ प्रभावी उपाय ठरते.
यासोबतच जर तुम्ही खूप थकले असाल तर रात्री झोपण्यापूर्वी नक्कीच आंघोळ करा. यामुळे तुमचा थकवा दूर होईल आणि तुम्हाला हलके वाटेल.
ज्या लोकांना उच्च रक्तदाबाच्या तक्रारी जास्त असतात त्यांनी रात्री अंघोळ करावी. कारण अंघोळ केल्यावर तुम्हाला आराम वाटतो. दिवसभर थकुन भागून आल्यावर हातपाय न धुता थेट अंघोळीचा पर्याय निवडावा त्यामुळे मनप्रसन्न होवुन ताजेतवाने वाटते. म्हणून नव्हे तर, जादुई पद्धतीने रक्तदाबावर नियंत्रण राहते.
रात्री अंघोळ करणे डोळ्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. खरे तर रात्री अंघोळ करताना डोळ्यात पाणी येते तेव्हा डोळ्यांना ताजेतवाने वाटते. मग, आजपासुन लावा सवय…रात्रीच्या अंघोळीची.!