सावधान… रात्री झोपताना चुकूनही करू नका ही चूक! ठरू शकते तुमच्या आरोग्यास घातक; संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा!
संशोधकांचे म्हणणे आहे की, थोड्याशा प्रकाशातही झोपल्याने तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. झोपेच्या वेळी प्रकाशाच्या संपर्कात आल्याने प्रौढांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. जाणून घ्या, काय आहे संशोधन.
मुंबई : रात्री झोपण्याच्या विविध पद्धती आणि वाईट सवयी लोकांना असतात. आता, काहींना रात्री लाइट लावूनच झोपण्याची सवय असते. लाईट बंद असला की, त्यांना अंधारात झोपच लागत नाही. तर काहींना खोलीत अगदी झिरो लाईटही सहन होत नाही. झोपण्यासाठी त्यांना पूर्ण गडद अंधारच हवा असतो. शिकागोच्या नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या फीनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनने रात्री उजेडात (In the light of night) किंवा खोलीचा लाईट लावून झोपणाऱ्या लोकांच्या आरेाग्यावर होणारे दुषपरिणामांवर संशोधन (Research on side effects) केले आहे. खासकरून मोठ्या शहरात वास्तव्यास असलेल्या नागरीकांना या संशोधकांनी धोक्याचा इशाराच (A warning of danger) देऊन टाकला आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोणत्याही प्रकारचा लाईट लावून झोपणे, अगदी मंद प्रकाशातही झोपल्याने प्रौढांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब होण्याची शक्यता वाढते.
मंद प्रकाशही वाढवते हृदयाची गती
या संशोधनाचे अभ्यासक, तथा नॉर्थवेस्टर्न मेडिसिन येथील फीनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. मिंजी किम यांनी एका प्रेस रीलिझमध्ये म्हटले आहे. की, ” तुमच्या हातातील स्मार्टफोन चा प्रकाश, रात्रभर चालणाऱ्या टीव्हीचा प्रकाश किंवा मोठ्या शहरांमध्ये असलेले प्रकाश प्रदूषण.” या मानवी वस्त्यांमधील अशा जागा आहे जिथे २४ तास आपल्या सभोवताली प्रकाश लखलखीत राहतो. डॉक्टर किम यांनी मेडिकल न्यूज टुडेला सांगितले की, अगदी लहानशा दिव्यातून(बल्ब) येणारा प्रकाश देखील आपल्या शरीरावर परिणाम करतो. डॉ. किम म्हणतात की, त्यांच्या अभ्यासगटाने यापूर्वी अनेक संशोधक अभ्यास केले आहेत, ज्यात असे दिसून आले आहे की मंद प्रकाशात झोपल्याने देखील हृदय गती आणि रक्तातील ग्लुकोज पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
आजार जडण्याचा धोका
स्वीडनमधील उप्पसाला विद्यापीठातील झोपे वरील संशोधन करणारे तज्ञ डॉ. जोनाथन सेडर्न्स यांनी मेडिकल न्यूज टुडेला सांगितले की, जे प्रौढ दीर्घकाळ प्रकाशझोतात झोपतात त्यांना हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि बरेच आजार जडण्याचा धोका असतो. .
नव्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे
या विषयावर नुकत्याच झालेल्या एका नव्या संशोधना नुसार 52 प्रौढ महिला आणि पुरुषांच्या झोपेवर अभ्यास करून त्याचा आढावा घेण्यात आला. डॉ. किम म्हणाले, नवीन अभ्यासात आम्ही प्रौढांची झोप आणि प्रकाश 7 दिवसांपर्यंत मोजला. लोकांवर केलेला हा अभ्यास कोणत्याही प्रयोगशाळेत नसून ज्याच्या त्याच्या नेहमीच्या झोपण्याच्या जागेवरच करण्यात आला आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की, अर्ध्याहून कमी लोक किमान 5 तास अंधाऱ्या खोलीत झोपतात. तर अर्ध्याहून अधिक लोक प्रकाशात झोपतात. डॉ किम म्हणतात की, हे सर्व लोक झोपताना खोलीत अंधूक प्रकाशाला प्राधान्य द्यायचे. या सर्व लोकांमध्ये जे प्रकाशाच्या संपर्कात झोपतात त्यांना उच्च रक्तदाबाचा धोका 74 टक्के, लठ्ठपणाचा धोका 82 टक्के आणि मधुमेहाचा धोका 100 टक्के आढळून आला.
चांगल्या आरोग्यासाठी झोप कशी घ्यावी?
झोपताना प्रकाशापासून दूर राहावे, अर्थात अंधाऱ्या खोलीत झोपण्यास प्राधान्य द्यावा असा सल्ला डॉ. किम यांनी दिला आहे. जर तुम्हाला प्रकाशात झोपण्याची सवय असेल तर, किमान डिमलाईट चा वापर करा. ते पुढे म्हणाले की झोपताना शक्य तितके इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून दूर राहा आणि जर तुमच्या आजूबाजूला जास्त प्रकाश असेल तर स्लीपिंग मास्क वापरा. याशिवाय डॉ. किम यांनी असेही सांगितले की, रात्रीच्या वेळी सुरक्षेसाठी तुम्हाला लाईट लावावी लागली तरी ती अशा ठिकाणी ठेवा जिथून त्याचा प्रकाश थेट तुमच्या डोळ्यांवर पडणार नाही. रात्रीच्या वेळी खोलीत निळ्या दिव्याऐवजी लाल दिवा वापरा, असे ही त्यांनी सांगितले.