चेहऱ्यावरील निशाणाला ब्यूटी मार्क समजत होती “ही” महिला, पुढे जे घडले ते सर्वांना थक्क करणारे होते !

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक (People) असतात, जे आपल्याला त्वचाकडे अजिबात लक्ष देत नाहीत. लोकांना आपल्या त्वचेत होणारे बदल (Changes in the skin)  जाणवत नाही. त्वचाकडे लक्ष न देण्याचा हलगर्जीपणा तुम्हाला भविष्यात भोगावा लागू शकतो यामुळे एखादा गंभीर आजार (Serious illness) देखील होऊ शकतो.

चेहऱ्यावरील निशाणाला ब्यूटी मार्क समजत होती ही महिला, पुढे जे घडले ते सर्वांना थक्क करणारे होते !
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 6:03 PM

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक (People) असतात, जे आपल्याला त्वचाकडे अजिबात लक्ष देत नाहीत. लोकांना आपल्या त्वचेत होणारे बदल (Changes in the skin)  जाणवत नाही. त्वचाकडे लक्ष न देण्याचा हलगर्जीपणा तुम्हाला भविष्यात भोगावा लागू शकतो यामुळे एखादा गंभीर आजार (Serious illness) देखील होऊ शकतो. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी एका महिलेसोबत घडली आणि त्याबद्दल ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्वचे संदर्भातील केलेला हलगर्जीपणा या महिलेला नडला. आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास जेव्हा होतो तेव्हा त्या त्रासाचा परिणाम त्वचेवर सुद्धा जाणवू लागतो. आपल्या शरीरावर त्याचे काही संकेत, लक्षणं दिसून येतात. अनेक लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करत असतात. काही दिवसांपूर्वीच अशीच एक घटना एका महिलेच्या बाबतीत घडलेली आहे. या महिलेच्या ओठांवर एक निशाण होते. या निशाणाला ती महीला एक ब्यूटी मार्क समजत होती पण काही दिवसानंतरच त्या महिलेला एका आजाराबद्दल कळाले, त्यामुळे त्या महिलेच्या पायाखालची जमीनच घसरली. वय वर्ष 49 असणारी महिला एंड्रिया मोजर हिला नेहमी असे वाटायचे की, आपल्या ओठांवर जे स्पॉट म्हणजेच निशाण आहे, ते आपल्या सौंदर्यामध्ये भर टाकणारे निशाण आहे, परंतु कालांतराने या निशाणाचा रंग बदलू लागला. या स्पॉटचा आकारसुद्धा दिवसेंदिवस वाढू लागला. एंड्रियाला नेहमी असे वाटायचे की, तिच्या ओठांवर असलेला ब्राऊन रंगाचा जो स्पॉट आहे, तो तिचा ब्युटी मार्क आहे.

नेमके काय आहे हे प्रकरण

ही घटना 2020 मधील आहे. सावळी त्वचा असल्या कारणामुळे एंड्रियाला आपल्या चेहऱ्यावर एक ब्राऊन कलरचा स्पॉट दिसला. या स्पॉटची तपासणी करण्यासाठी जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा एंड्रियाने डॉक्टरांना आपल्या ओठांवरील ब्राऊन स्पॉट दाखविला. डॉक्टरांनी एंड्रियाला सांगितले की, हा जो स्पॉट आहे तो नॉर्मल मोस आहे, याबद्दल काही काळजी करण्याची गरज नाही.

पोस्ट वाचून डॉक्टरांचा सल्ला

मोंटाना येथे राहणारी एंड्रिया एक दिवस फावल्या वेळेत इंस्टाग्राम पाहत होती. तेव्हा तिने पाहिले की, एका व्यक्तीने एनुअल स्किन चेकअप संदर्भातील एक पोस्ट शेयर केली होती त्यानंतर एंड्रिया ने सुद्धा डर्मेटोलॉजिस्टकडे जावून आपल्या स्किनचे चेकअप करून घेण्याचा निर्णय घेतला. एंड्रिया बायोप्सीसाठी गेली तेव्हा तिला कळाले की,तिच्या ओठांवर जो ब्राऊन रंगाचा स्पॉट होता हा कॅन्सर होण्याचा पहिला संकेत सांगणारा होता.

व्यवसायाने इस्टेट एजेंट

व्यवसायाने एस्टेट एजेंट म्हणून काम करणारी एंड्रियाने सांगितले की, या गोष्टीचा आनंद होतो की मी त्यावेळी डर्मेटोलॉजिस्टकडे गेली आणि योग्य वेळी या समस्येबद्दल मला कळाले. मार्च 2020 मध्ये डॉक्टर्स ने एंड्रियाच्या ओठांवर असलेला स्पॉट काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. त्यांनी म्हंटले की, या स्पॉट जवळील भागाला कव्हर करण्यासाठी डॉक्टरांना एक मोठी चीर मारावी लागणार होती. अशावेळी डॉक्टरांनी माझ्या ओठांवर एक मोठी चिर मारून त्या मोसला वेगळे केले. मला खूप चांगले डॉक्टर मिळाले, ज्यांनी ही ट्रीटमेंट व्यवस्थितरित्या पार पाडली. मोस काढल्यानंतर पुन्हा एकदा या मोसची डॉक्टरांनी टेस्ट केली. टेस्ट केल्यानंतर जे रिपोर्ट आले त्यामध्ये कळाले की जर हा मोस काढला नसता तर मला भविष्यात स्किन कॅन्सरचा सामना करावा लागला असता.

मोस कसा ओळखावा?

जर मोस बद्दल बोलायचे झाल्यास, हे मोस सर्वसाधारणपणे ब्राउन किंवा निळ्या रंगाचे असतात. हे मोस आपल्याला शरीरावर वेगवेगळ्या भागांवर पाहायला मिळतात. काही लोकांना जन्मजात असतात, तर काही लोकांना कधीही केव्हाही मोस शरीरावर निर्माण होतात. अनेकदा मोसचा रंग एक सारखा असतो परंतु जर या मोसचा आकार व रंग बदलत असेल तर अशावेळी आपल्याला डॉक्टरांना आवश्यक भेटायला हवे, अन्यथा तुम्हाला सुद्धा भविष्यात स्क्रीन कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो.

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

संबंधित बातम्या

वजन कमी करायचंय?, तर ‘या’ पदार्थांसोबत करा कोरफडीचे सेवन

महिलांनो पेनकिलर्सच्या नेहमी सेवनाने उद्भवू शकतील कानाच्या समस्या, वेळीच व्हा सावधान!

Health care | नेहमी अंडी खाताय?, अतिरेक झाल्यावर होऊ शकतो जीवघेणा गंभीर आजार!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.