ऐकावं ते नवलंच, बीअरचे सेवन आतड्यांसाठी हितकारक, अभ्यासातून निष्कर्ष

मद्यपान करणे शरीरासाठी हानिकारक असते असे आपण नेहमी ऐकतो. मात्र बीअर पिणे हे आतड्यांसाठी चांगले असते एवढेच नव्हे तर त्यामुळे अनेक जुनाट आजार बळावण्याजासून रखू शकते, अशी माहिती समोर आली आहे.

ऐकावं ते नवलंच, बीअरचे सेवन आतड्यांसाठी हितकारक, अभ्यासातून निष्कर्ष
बीअरचे सेवन आतड्यांसाठी हितकारक
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 4:41 PM

दारू पिणे हे वाईट, कधीही मद्यपान करू नये असे आपण लहानपणापासून ऐकत असतो. त्यापासून शक्यतो लांब राहण्याचा प्रयत्न करतो मात्र नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, बीअर पिणे (Drinking Beer) हे आतड्यांसाठी (Intestine) हितकारक (Beneficial) असते, अशी माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर त्यामध्ये जुनाट आजार रोखण्याची क्षमता असते, असे नव्या अभ्यासातून समोर आले आहे.

बीअरचे सेवन आतड्यातील मायक्रोबायोटाच्या संरचनेच्या सुधारणेत योगदान

पोर्तुगालमधील ‘सेंटर फॉर रिसर्च इन हेल्थ टेक्नॉलॉजिज अँड सर्व्हिसेस’ (CINTESIS)ने केलेल्या अभ्यासानुसार रोज बीअर प्यायल्यामुळे आतड्यांना फायदा होतो. बीअरचे सेवन आतड्यातील मायक्रोबायोटाच्या संरचनेच्या सुधारणेत योगदान देते. बीअरमध्ये जुनाट आजारांना रोखण्याची क्षमता असते. बीअर जाडेपणा, मधुमेह आणि हृदय रोग सारख्या जुन्या आजारांना रोखण्यात मदत करू शकते. सोप्या भाषेत सांगायचं झाल तर बीअर पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवते. हा फायदा अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक दोन्ही बिअरपासून मिळतो.

CINTESIS केलेल्या या अभ्यासात 23 ते 58 वर्षांच्या निरोगी, सुदृढ पुरूषांचा समावेश करण्यात आला. त्यांना चार आठवड्यांसाठी दररोज 330 मिलीलीटर बिअर पिण्यास देण्यात आली. त्यांच्यापैकी काही जणांना अल्कोहोलिक आणि काहींना नॉन-अल्कोहोलिक बीअर देण्यात आली. चार आठवड्यांनी सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला.

हे सुद्धा वाचा

जर्नल ऑफ ॲग्रीकल्चर ॲंड फूड केमिस्ट्री, यामध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासासनुसार बीअर प्यायल्यामुळे आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढते. त्याच्या सेवनाने वजनही वाढत नाही. तसेच पचनही सुधारते. हृद्य आणि मेटाबॉलिजमशी संबधितही कोणताही आजार होत नाही.

आतड्यातील चांगले बॅक्टेरिया वाढतात

वैज्ञानिकांच्या सांगण्यानुसार, बीअरमध्ये पॉलीफेनोल्स नावाचे कंपाऊंड आणि विघटनाच्या प्रक्रियेनंतर बनणारे सूक्ष्म जीव असतात. ते आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढवतात. शरीरात चांगले बॅक्टेरिया असणं खूप महत्वाचं असतं. ते नसल्यास मधुमेह, हृदयाशी संबंधित समस्या असे अनेक आजार होऊ शकतात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.