मुलांना आरोग्यपूर्ण सवयी लावण्यास प्रोत्साहन देणा-या तज्ज्ञांच्या मार्गदर्शक सूचनांद्वारे अॅबॉटचे ग्रो राइट 2.0 चार्टर करू शकते पालकांची चिंता दूर करण्यास मदत!
जोपासना आणि शिस्त: सहानुभाव दाखवून आणि मनातील भावना उघड करण्यासठी प्रोत्साहन देत पालक आपल्या मुलांचे भावनिक स्वास्थ्य जोपासू शकतात. मुलांना वारंवार शिक्षा देऊ नये असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याऐवजी त्यांना आत्मचिंतनासाठी आणि स्वत:च्या वागण्यातील दोष दूर करण्याचा निर्धार करण्यासाठी मदत करायला हवी.
मुंबई : पॅनडेमिकमुळे आपल्या रोजच्या आयुष्यातील, विशेषत: पालकत्वाशी संबंधित कितीतरी गोष्टी बदलून गेल्या आहेत, व अॅबॉट-मॉमप्रेसो सर्वेक्षणाने भारतीय पालकांना आजही सतावणा-या कितीतरी चिंता आणि शंका-कुशंका उजेडात आणल्या आहेत. मुलांच्या निरोगी आणि सर्वंकष वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी अॅबॉटने आपले ग्रो-राइट 2.0 चार्टर प्रसिद्ध केले असून त्यामध्ये वाढीचे मापन (Measuring growth) आहार (Eating), सक्रियता (Activity), पोषण (Nurturing) आणि झोप (Sleep) या वाढीशी संबंध घटकांचा समावेश असलेल्या M-E-A-N-S गाइडलाइन्स अर्थात मार्गदर्शक सूचना आखून दिल्या आहेत.
आरोग्य आणि पोषणतज्ज्ञांच्या ज्ञानाचे पाठबळ लाभलेले हे चार्टर आरोग्यपूर्ण जीवनशैलीला पूरक सवयींना प्रोत्साहन देण्यासाठीच्या सूचनांच्या माध्यमातून पालकांच्या चिंतांवर उत्तर शोधण्यास मदत करू शकते, ज्यांचा त्यांच्या मुलांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडू शकेल. या वर्षाच्या सुरुवातीला भारतभरातील 2,500 हून अधिक मातांच्या केलेल्या सर्वेक्षणातून मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि शारीरिक सक्रियता या निरोगी वाढीवर परिणाम करणा-या दोन महत्त्वाच्या घटकांमध्ये झालेले बदल अधोरेखित झाले.
-सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ६८ टक्के मातांच्या म्हणण्यानुसार मुले विशिष्ट पदार्थ खाण्याच्या बाबतीत अधिक कुरकुर करू लागली आहेत.
-84 टक्के सहभागींच्या मते पॅनडेमिकमुळे मुलांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे.
-आपल्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती बाहेरील वातावरणामध्ये सुरक्षित राहण्यासाठी पुरेशी सक्षम नाही असे 70 टक्के सहभागींना वाटते.
-अॅबॉटने विकसित केलेले ग्रो राइट 2.0 चार्टरमध्ये या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांना विचारात घेण्यात आले आहे व बालरोगतज्ज्ञ डॉ. इंदू खोसला आणि डॉ. सुमन पोतदार, पोषणतज्ज्ञ डॉ. एलीन कँडे व बालमानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिव प्रसाद श्रीनिवासन यांच्यासारख्या बालरोग, पोषण व वर्तणूकविज्ञान या क्षेत्रांतील आघाडीच्या तज्ज्ञांच्या मंडळाकडून आलेल्या शिफारशींचा समावेश या चार्टरमध्ये करण्यात आला आहे.
Right M-E-A-N-S to Growचा स्वीकार करण्याची मुलभूत गरज
जगाचा कारभार पुन्हा एकदा पूर्वीसारखा खुला होत असताना, शाळा आणि कार्यालये पुन्हा एकदा प्रत्यक्षात सुरू होत असताना खूप काळापासून ज्याची प्रतिक्षा केली त्या जगण्याच्या नव्या सर्वसामान्य पद्धतीचा स्वीकारही लक्षणीय वेगाने केला जात आहे. अशावेळी पालकांनी आणि मुलांनीही एकटं असण्याच्या काळात लागलेल्या निष्क्रियता आणि विस्कळीत दिनक्रमासारख्या सवयी सोडून द्यायला हव्यात. ‘
मुलांच्या आयुष्यातील सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्यांच्या पुढील आयुष्याचा पाया रचला जातो आणि आयुष्यभरासाठी स्वास्थ्य व विकासाची बेगमी करण्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो.” अॅबॉटच्या भारतातील न्यूट्रीशन बिझनेस विभागाच्या जनरल मॅनेजर स्वाती दलाल म्हणाल्या. “वाढीची जोपासना करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच अॅबॉटने पालकांच्या चिंता लक्षात घेतल्या आहेत व त्यांना ग्रो राइट २.० चार्टरचे बळ देऊ केले आहे. मुलांची केवळ शारीरिक नव्हे तर सर्वांगीण वाढ व्हावी याची काळजी वाहणारे घटक अर्थात M-E-A-N-S या चार्टरमध्ये समाविष्ट आहेत.” M-E-A-N-S गाइडलाइन्समध्ये झोपेचे शिस्तशीर वेळापत्रक, आहाराचे वेळापत्रक, शारीरिक व्यायामासाठीचा वेळ आणि बौद्धिक विश्रांती आत्मचिंतनासाठीचा वेळ यांचा समावेश आहे.
वाढीचे मोजमाप आणि देखरेख
मुलाच्या वाढीचा आलेख समजून घेण्यासाठी व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी वाढीचे अचूक मापन होणे महत्त्वाचे असते. यामुळे वाढीमध्ये काही उणीव राहून गेल्यास तीही पालकांच्या लक्षात येण्यास मदत होऊ शकते व त्यामागील कारणांवर लवकरात लवकर उपाययोजना करता येते.
योग्य आहार
पोषण ही सर्वांगीण वाढ व रोगप्रतिकारशक्तीला आधार देणारी गुरुकिल्ली आहे. मुलांच्या आहारामध्ये तृणधान्ये, डाळी, दूध आणि मांस, फळे आणि भाज्या, स्निग्ध पदार्थ आणि साखर अशा पाच अन्नगटांतील पदार्थांचा समावेश असायला हवा. खाण्यापिण्याच्या बाबतीत कुरकुर, आळस करणा-या मुलांना संतुलित पोषण मिळावे यासाठी न्यूट्रिशन सप्लिमेंट्सची मदत होऊ शकते.
खेळण्यात सक्रिय सहभाग
शारीरिक हालचालींमुळे हाडांचे आरोग्य सुधारते, चांगली झोप लागते आणि एकूण शारीरिक स्वास्थ्यामध्ये सुधारणा घडून येते. यामुळे लहान मुलांमधील लठ्ठपणासह तब्येतीच्या विविध समस्या उद्भवण्याचा धोकाही कमी होतो.
जोपासना आणि शिस्त
सहानुभाव दाखवून आणि मनातील भावना उघड करण्यासठी प्रोत्साहन देत पालक आपल्या मुलांचे भावनिक स्वास्थ्य जोपासू शकतात. मुलांना वारंवार शिक्षा देऊ नये असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याऐवजी त्यांना आत्मचिंतनासाठी आणि स्वत:च्या वागण्यातील दोष दूर करण्याचा निर्धार करण्यासाठी मदत करायला हवी.
झोप घेण्यास प्रोत्साहन देणे
लहान वयापासूनच मुलांना वेळच्यावेळी आणि पुरेशी झोप घेण्याची चांगली सवय लावल्याने मुलांच्या शारीरिक आणि संज्ञानात्मक कामगिरीला प्रोत्साहन मिळते. पालकांनी मुलांना विशिष्ट वेळी झोपी जाण्याची सवय लावली पाहिजे आणि झोपेच्या वेळेमध्ये नियमितता जपली पाहिजे.
“आयुष्यभर साथ देणा-या शारीरिक आणि मानसिक स्वास्थाचा पाया हा अगदी लहानपणातच रचला जातो. निरोगी सवयी आणि दैनंदिन वेळापत्रकामुळे मुलांच्या जास्तीत-जास्त वाढीस प्रोत्साहन मिळू शकते आणि मुले त्यांच्या शालेय आयुष्यात यशस्वी होण्याच्या शक्यता वाढतात.” प्रख्यात बालरोगतज्ज्ञ आणि पीडिएट्रिक पल्मोनोलॉजिस्ट डॉ. इंदू खोसला म्हणाल्या. “पालक आणि मुलांची देखभाल करणा-या व्यक्तींकडे आपल्या मुलांशी यासंदर्भात परिणामकारकरित्या आणि सर्जनशील पद्धतीने संवाद साधण्याची आणि इतरांसमोर आदर्श ठेवण्याची सुसंधी आहे.”