Hot drinking water : थंडीत गरम राहण्यासाठी तुम्ही काय पिता? हे प्या आणि राहा निरोगी
थंडीत गरम राहण्यासाठी तुम्ही रम किंवा ब्रैंडी घेता. मग था आज आम्ही पेक्षाही हेल्दी पेय तुम्हाला सांगणार आहोत. हिवाळ्यात गरम पाणी प्यायला तर तुम्हाला खूप फायदा होतो.
मुख्य बातमी : हिवाळ्यात घाम कमी येतो म्हणून अनेक जण पाणी कमी पितात. पण हे चुकीचं आहे. त्यामुळे हिवाळ्यात अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होतो. हिवाळ्यात थंडी वाजल्यामुळे अनेकांना वारंवार लघवीला जावं लागतं. मग ते अशावेळी कमी पाणी पितात. पण आरोग्यासाठी हे चुकीचं आहे. आपण गरम पाणी पिऊन डिहायड्रेशनपासून आपलं शरीर वाचवू शकतो. जाणून घेऊयात गरम पाण्याचं महत्त्व
पचनक्रिया सुधारते
गरम पाणी नियमित प्यायलामुळे आपली पचनक्रिया सुधारते. थंडीत गरम पाणी हे शरीरासाठी फायदेशीर ठरतं. हिवाळ्यात आपली पचनक्रिया थोडी संथ असते. त्यामुळे अशावेळी गरम पाणी प्यायलाने आपल्याला फायदा होतो.
ब्लड सर्कुलेशनसाठी फायदेमंद
हिवाळ्यात आपलं ब्लड प्रेशर वाढतं. यामुळे हिवाळ्यात गरम पाणी प्यायलामुळे शरीरातील ब्लड सर्कुलेशन चांगलं होण्यास मदत मिळते.
आरोग्यासाठी उत्तम औषध
हिवाळ्यात नाक आणि गळ्याचा समस्या त्रास देतात. त्यामुळे गरम पाणी प्यायल्यामुळे सर्दी, खोकल्यासारखा आजारपासून आपण दूर राहू शकतो. तसंच इन्फेक्शनची शक्यता ही कमी असते.
वजन कमी करण्यास मदत
हो, गरम पाणी नियमित प्यायल्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होते.
अंगदुखीवर रामबाण उपाय
हिवाळ्यात अंगदुखीची समस्या अनेकांना होते. अशावेळी गरम पाणी पेनकिलरचं काम करते.
ब्रँडी आणि रम प्यायलाने शरीर राहतं गरम?
हिवाळ्यात अल्कोहोल पिणारे ब्रँडी किंवा रम पिऊन शरीराला ऊबदार ठेवतात. मात्र तज्ज्ञांच्या मते यामुळे काही वेळासाठी आपलं शरीर ऊबदार राहतं. त्यामुळे हिवाळ्यात गरम पाणी पिणे हे सगळ्यात उपयुक्त आहे. हिवाळ्यात हळदीचं दूधही खूप लाभदायक आहे. त्यामुळे रोज रात्री झोपताना हळदीचं दूध नक्की घ्या.
हळदीच्या दूधाची रेसिपी
साहित्य 2 कप दूध ¾ टीस्पून हळद ½ टीस्पून काळी मिरी 1 इंच दालचिनी 1 इंच आले 1 टीस्पून मध
कृती भांड्यात 2 कप दूध घ्या. त्यात हळद, काळी मिरी, दालचिनी, आले घाला. आणि मंद आचेवर दूध गरम करा. जर तुम्हाला दूध गरम प्यायचं असेल तर साखर घालून प्या. किंवा मधाचा वापर करायचा असेल तर दूध जरा थंड होऊ द्या मग त्यात मध घाला.