Arrowroot Benefits: डायबिटीससारखे आजार दूर ठेवण्यासाठी आरारूट ठरते उपयोगी

आरारूट हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्याच्या सेवनामुळे आपल्या शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे तर मिळतातच पण वजन कमी करण्यासाठीही ते मदत करते.

Arrowroot Benefits: डायबिटीससारखे आजार दूर ठेवण्यासाठी आरारूट ठरते उपयोगी
Diabetes
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 1:16 PM

आरारूट (Arrowroot)हे अत्यंत औषधी आहे. त्याचे कंद आणि खोड उन्हात कडकडीत वाळवून नंतर त्याची वापडर तयार करण्यात येते. आरारूटचे स्टार्च युक्त पीठ व कणीक याचा वापर अनेक खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. आरारूटमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे आपल्या तब्येतीसाठी (Beneficial for health) फायदेशीर ठरतात. आरारूटच्या सेवनामुळे शरीरातील फॉस्फरस, झिंक ( जस्त ) आणि पोटॅशियम सारख्या मिनरल्सची कमतरता पूर्ण होते. भरपूर पोषक तत्वं असलेल्या आरारूटची शेती त्याचे कंद आणि मुळं यांसाठी केली जाते. मॅरंटा ॲरुनडिनाशिआ असे त्याचे वैज्ञानिक नाव आहे. अनेक आजारात औषध (medicine) म्हणून आरारूटचा वापर केला जातो. त्याच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पचन समस्याही दूर होतात. मधुमेहासारखा आजार दूर ठेवण्यासाठी आरारूटचे सेवन फायदेशीर ठरते.

आरारूटचे फायदे :

– हेल्थ लाइनच्या रिपोर्टनुसार, आरारूटमध्ये कितीतरी औषधी गुणधर्म असून त्याचे भरपूर फायदे आहेत. आरारूटमधील स्टार्च आणइ इतर घटकामुळे त्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. जर तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होत असेल तर आरारूटचे सेवन करावे, त्याने आराम मिळतो.

– वजन कमी करण्यातही आरारूट मदत करते. त्यामध्ये फायबर आणि प्रथिने यासारखी पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

– जुलाब किंवा लूज मोशनचा त्रास होत असेल तर आरारूटचा आहारात समावेश करावा. जुलाबामुळे डिहायड्रेशन होऊ शकते व त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत आरारूटचे सेवन केल्यास डिहायड्रेशन व जुलाब यापासून आराम मिळतो व तब्येत सुधारते.

– आरारूटमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आरारूटमधील अनेन व्हिटॅमिन्स तुम्हाला वेगवेगळ्या रोगांशी, आजारांशी लढण्याची शक्ती देतात. ते ॲंटीबॉडीच्या रुपात काम करतात. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व तुम्ही कमी आजारी पडता.

– कणकेला पर्याय म्हणून आरारूटचा वापर करू शकतो. ते ग्लूटेन फ्री असते.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.