एक चमचा पीनट बटरमध्ये असतं अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन, वाचा 5 अमेजिंग फायदे!

पीनट बटर एक निरोगी अन्न आहे. हे पोषक घटक वजन कमी करण्यास, हृदयरोगाशी लढण्यास आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करतात. सकाळी आणि संध्याकाळी कुठल्याही वेळी तुम्ही पीनट बटर हे खाऊ शकता.

एक चमचा पीनट बटरमध्ये असतं अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन, वाचा 5 अमेजिंग फायदे!
Peanut butter benefitsImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 3:08 PM

मुंबई: पीनट बटर एक निरोगी अन्न आहे. यात चांगल्या आरोग्यासाठी प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी 3, व्हिटॅमिन बी 6, फोलेट, मॅग्नेशियम, तांबे आणि मॅंगनीज यासारखे अनेक पोषक आणि जीवनसत्त्वे असतात. याशिवाय व्हिटॅमिन बी 5, झिंक, पोटॅशियम, लोह आणि सेलेनियम देखील यात आढळतात. हे पोषक घटक वजन कमी करण्यास, हृदयरोगाशी लढण्यास आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करतात. सकाळी आणि संध्याकाळी कुठल्याही वेळी तुम्ही पीनट बटर हे खाऊ शकता. एक चमचा पीनट बटरमध्ये 8 ग्रॅम प्रोटीन असते, जे अंड्यापेक्षा जास्त आहे. अंड्यात 6 ग्रॅम प्रथिने असतात. जाणून घेऊया दररोज पीनट बटर खाण्याचे कोणते फायदे आहेत.

  1. पीनट बटरमध्ये उच्च प्रमाणात प्रथिने आणि फायबर असतात. हे वजन वाढण्यास प्रतिबंध करते आणि निरोगी वजन राखण्यास मदत करते.
  2. पीनट बटरमध्ये असलेले मोनो अनसेटेड फॅट्स निरोगी हृदयासाठी चांगले असतात. हे आपल्याला हृदयरोगापासून वाचविण्यास मदत करते.
  3. पीनट बटर हा एक चांगला प्रथिने स्त्रोत आहे. एक चमचा पीनट बटरमध्ये 8 ग्रॅम प्रथिने असतात. त्यामुळे हे रोज खाणं आपल्या शरीरासाठी उत्तम असतं.
  4. पीनट बटरमध्ये उच्च प्रमाणात फायबर असते जे आपल्याला भूक कमी करण्यास मदत करते. हे खाल्ल्याने फारशी भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
  5. पीनट बटरमध्ये व्हिटॅमिन ई, फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजे जास्त प्रमाणात असतात. हे सर्व महत्वाचे पोषक घटक आपल्या शरीराच्या निरोगी विकासास मदत करतात.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.