केवळ त्वचेसाठीच नव्हे तर केसांसाठीही फायदेशीर ठरते व्हॅसलीन! असा तयार करा हेअरपॅक
पेट्रोलिअम जेलीचा मॉइश्यरायझिंग गुणधर्म हा ऑलिव्ह ऑईलपेक्षा अधिक प्रभावी मानला जातो. त्यामुळे त्वचा आणि केसांना ओलावा देण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
नवी दिल्ली: व्हॅसलीनला पेट्रोलिअम जेली या नावानेही ओळखले जाते. आपल्या सर्वांच्याच घरात व्हॅसलीनची (vaseline) डबी सहज दिसते. थंडीच्या दिवसांत फाटलेल्या ओठांपासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा कोरड्या त्वचेची (skin problems) समस्या दूर करण्यासाठी बरेच लोक व्हॅसलीनचा वापर करतात. मात्र याचा वापर केसांसाठीही (hair care) केला जातो, हे तुम्हाला माहीत आहे का ?
हे वाचून तुम्हीही हैराण झाला असाल ना. पण हे खरं आहे. व्ह्रॅसलीनचा वापर केसांसाठी कसा केला जातो, त्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घेऊया.
केसांसाठी व्हॅसलीन चांगले आहे का?
पेट्रोलिअम जेली हा मॉयश्चरायझरसाठी एक चांगला पर्याय मानला जातो. त्यामधील ओलावा देणारा गुणधर्म हा ऑलिव्ह ऑईलच्या तुलनेत अधिक प्रभावी मानला जातो. त्यामुळेच याचा त्वचा व केसांना ओलावा देण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.
ही गोष्ट नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या (National Center for Biotechnology Information) वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासात नमूद करण्यात आली आहे. केसांसाठी व्हॅसलिनचे अनेक फायदे आहेत.
स्काल्पचे आरोग्य सुधारतो
व्हॅसलीनचा मॉयश्चरायझिंग आणि अँटी-माइक्रोबियल प्रभाव हा आपल्या स्काल्पचे (टाळू) आरोग्य सुधारण्यासाठी मदत करू शकतो. कोरड्या स्काल्पच्या समस्या दूर करण्यासाठी पेट्रोलियम जेलीदेखील खूप प्रभावी ठरू शकते.
व्हॅसलीनमध्ये नैसर्गिक कच्चे तेल असल्यामुळे ते स्काल्पची तसेच केसांची काळजी घेण्यास प्रभावी ठरते.
कोंडा करतो दूर
डोक्यात होणार कोंडा ही बहुतेक लोकांमध्ये एक सामान्य समस्या असते. ही समस्या कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकते. त्याच्या उपचारांसाठी अँटी-मायक्रोबियल हे प्रभावी ठरू शकतात. त्यामुळे कोंडा दूर करायचा असेल तर व्हॅसलीन प्रभावी मानले जाते.
असा तयार करा हेअरपॅक
हा हेअरपॅक तयार करण्यासाठी एक चमचा व्हॅसलीन आणि अर्धा चमचा नारळाचे तेल यांचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी प्रथम नारळाचे तेल थोडं गरम करून घ्याव. नंतर त्यामध्ये व्हॅसलीन मिसळावं.
दोन्हींचे मिश्रण नीट मिसळून एकजीव करावं व हे मिश्रण केसांच्या मुळांपासून ते टकापर्यंत व्यवस्थित लावावं. रात्रभर हा पॅक केसांवर राहू द्यावा व सकाळी सौम्य शांपूने केस धुवावेत.