मोठी बातमी! भंडारा जिल्हा कोरोना मुक्त; शेवटच्या रुग्णालाही मिळाला डिस्चार्ज

महाराष्ट्रासह देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट घोंघावत असतानाच राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी मोठी बातमी आहे. राज्यातील भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. (Coronavirus in Bhandara)

मोठी बातमी! भंडारा जिल्हा कोरोना मुक्त; शेवटच्या रुग्णालाही मिळाला डिस्चार्ज
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 12:03 PM

भंडारा: महाराष्ट्रासह देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट घोंघावत असतानाच राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी मोठी बातमी आहे. राज्यातील भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. या जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. संपूर्णपणे कोरोनामुक्त होणारा भंडारा हा पहिलाच जिल्हा ठरला आहे. (Bhandara is the first district in Maharashtra to become Covid free Last patient discharged)

भंडाऱ्याचे जिल्हाचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी-डॉक्टरांचे प्रयत्न, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या नीतीमुळे भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. भंडाऱ्यात गेल्या वर्षी 27 एप्रिल रोजी गरदा बुद्रुकमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता, अशी माहिती त्यांनी दिली. शुक्रवारी जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच शुक्रवारी 578 जणांचे सँपल तपासण्यात आले. त्यापैकी एकालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचं आढळून आलं आहे.

12 जुलैला पहिला रुग्ण दगावला.

या वर्षी 12 जुलै रोजी जिल्ह्यात सर्वाधिक 1596 रुग्ण आढळले होते. तर 18 एप्रिल रोजी जिल्ह्यात 12, 847 रुग्ण सक्रिय होते. तर 12 जुलै 2020 रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दगावला होता. तर यावर्षी 1 मे रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची संख्या 35 झाली होती. आतापर्यंत जिल्ह्यात 1133 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी कदम यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढलं आहेत. त्यानुसार, 18 एप्रिल रोजी जिल्ह्यात 12,847 सक्रिय रुग्ण होते. मात्र, त्यानंतर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली. 22 एप्रिल रोजी सर्वाधिक 1568 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

रिकव्हरी रेट 98.11 टक्के

जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. 19 एप्रिल रोजी जिल्ह्यातील रिकव्हरी रेट घटून 62.58 टक्के होता. आता हा रिकव्हरी रेट वाढून 98.11 टक्के एवढा झाला आहे. तर 12 एप्रिल रोजी पॉझिटीव्हिटी रेट सर्वाधिक 55. 73 टक्के होता. तो आता घटून शून्य झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यू दर 1.89 टक्के असल्याचंही कदम यांनी स्पष्ट केलं.

जिल्ह्यात आतापर्यंत 4,49,832 कोरोना रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात 59,809 सँपल पॉझिटिव्ह आढळले होते. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 58,776 रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्याच्या 9.5 लाख लोकसंख्येच्या 40 टक्के लोकांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. तर 15 टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. (Bhandara is the first district in Maharashtra to become Covid free Last patient discharged)

संबंधित बातम्या:

वाशिम-गोंदियात कोरोनानंतर नवं संकट, ‘या’ आजाराच्या पहिल्या बळीने खळबळ

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ सुरुच, अ‍ॅक्टिव्ह केसेसही पुन्हा वाढल्या

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प वाढ, मात्र अ‍ॅक्टिव्ह केसेसमधील वाढ सुरुच

(Bhandara is the first district in Maharashtra to become Covid free Last patient discharged)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.