भाजप नेते हर्षवर्धन पाटील कोरोनाबाधित, दोन दिवसांपूर्वीच मुलीचा लग्न सोहळा, नेत्यांची चिंता वाढली!

दोन दिवसांपूर्वी मुंबईत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचा थाटामाटात विवाहसोहळा झाला. आज हर्षवर्धन पाटील यांना कोरोना झाल्याचे निदान झाल्याने सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे.

भाजप नेते हर्षवर्धन पाटील कोरोनाबाधित, दोन दिवसांपूर्वीच मुलीचा लग्न सोहळा, नेत्यांची चिंता वाढली!
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 4:25 PM

मुंबईः भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोना झाल्याचे दुपारी उघडकीस आले. त्यानंतर आता भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोना झाल्याची माहिती हाती आली आहे. पाटील यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. यात गंभीर बाब म्हणजे हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांचा विवाहसोहळा 28 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडला. या लग्नसोहळ्याला अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. पाटील यांना कोरोनाची लागणी झाल्यानं आता या विवाहसोहळ्याला उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांनाही कोरोनाची बाधा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संपर्कातील सर्वांनी चाचणी करावी- हर्षवर्धन पाटील

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी ट्विट केले. त्यात ते म्हणाले, ‘सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोरोना चाचणी केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व काळजी घ्यावी, ही विनंती.’ त्यामुळे अंकिता पाटील यांच्या लग्नाला उपस्थित राहिलेल्या सर्व नेत्यांची चिंता वाढली आहे.

Ankita Patil marriage

अंकिता पाटील विवाह सोहळ्यातील चित्र

लग्न सोहळ्याला कोण कोण?

अंकिता हर्षवर्धन पाटील आणि निहार बिंदुमाधव ठाकरे यांच्या विवाह सोहळ्याला राज्यपालांसह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. कालच सुप्रिया सुळे, त्यांचे पती आणि मुलं हे सर्वच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच कोरोना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विधीमंडळ अधिवेशनातील दोघांना कोरोना

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित असलेल्या दोघांना कोरोना झाल्याचे दोन दिवसांपूर्वी उघडकीस आले. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड तसेच भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनाही कोरोना झाल्याचे निदान झाले आहे.

इतर बातम्या-

शरद पवारांची परंपरा खोटं बोलण्याची, मोदींची पवारांना कोणती ऑफर? वाचा सविस्तर

Sugarcane Sludge : ऊसाचे गाळप कासवगतीने, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पाथरी येथे रास्तारोको

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.