मुंबईः आजच्या काळात कॅन्सरसारखा (cancer) महाभयंकर रोगही अगदी सामान्य झाला आहे. कर्करोगाची लक्षणे लवकर ओळखणे फार कठीण होऊन बसले आहे. कर्करोगाविषयी नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका 14 वर्षांच्या मुलामध्ये रक्ताच्या (Blood) कर्करोगाची लक्षणे (Symptoms)आढळून आली आहेत. या प्रकरणाचीच माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये रोगाचे निदान करणे खूप कठीण आहे. मुलांना त्यांच्या शरीरात होत असलेल्या बदलांची जाणीव नसते. याप्रकारचे असेच एक प्रकरण आता समोर आले आहे. एका महिलेने सांगितले की, तिच्या मुलाला त्वचेवर खूप खाज येत होती. त्यानंतर त्याला उपचारासाठी डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्यानंतर डॉक्टरांनी जी लक्षणे सांगितली ती ऐकून सगळ्यानाच आश्चर्याचा धक्का बसला. काय होते हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया
एके दिवशी एका स्थानिक क्लबमध्ये फुटबॉल खेळत असताना रायन थॉमसन खेळपट्टीवर आळशी दिसत होता. त्यानंतर रायनच्या आईच्या लक्षात आले की, रायनची तब्बेत काही तरी बिघडली आहे. त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यानंतर मात्र रायनच्या आईला धक्काच बसला.
स्कॉटलंडमधील फाल्किर्क येथे राहणाऱ्या रायनचा अचानक मृत्यू झाला. वजन बऱ्यापैकी कमी झाले होते. यासोबतच त्याला खाज येण्याची समस्याही भेडसावत होती, हळूहळू ही खाज त्याच्या शरीरात पसरली. ऑड्रेला प्रथम वाटले की रायनला अशा एखाद्या गोष्टीची ऍलर्जी असू शकते ज्यासाठी ती लॉन्ड्री डिटर्जंटकडे वळली. असे करूनही रायनच्या त्वचेच्या लक्षणांमध्ये कोणताही बदल झाला नाही आणि नंतर त्याच्या ग्रंथींना (लिम्फ नोड्स) सूज येऊ लागली. रायनमध्ये ज्या वेळी ही लक्षणे दिसू दिसल्यानंतर ऑड्रेने त्याला तातडीने डॉक्टरांना दाखवले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन रक्ताची तपासणी आणि बॉडीही स्कॅन करण्यात आली. त्यानंतर याच रायनला आणखी काही चाचण्यांसाठी ग्लासगो येथील क्वीन एलिझाबेथ युनिव्हर्सिटीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
त्यानंतर रायनला कॅन्सर वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले, मात्र त्याच्या कुटुंबीयांना याबाबत काहीच सांगण्यात आहे नाही. एक आठवड्यानंतर मात्र रायनला सांगण्यात आले की, हॉजकिन्स लिम्फोमा नावाचा दुर्मिळ प्रकारचा रक्ताचा कर्करोग झाला आहे. या रोगाने त्रस्त असलेल्या तीनपैकी एकाला त्वचेवर प्रचंड खाज येते. याशिवाय, वजन कमी होणे, लिम्फ नोड्स सुजणे आणि रात्री घाम येणे ही देखील सामान्य लक्षणे दिसू लागतात. लिम्फोमाचे दोन मुख्य प्रकार आहेत- हॉजकिन लिम्फोमा आणि नॉन-हॉजकिन लिम्फोमा.
लिम्फोमा हा कोणत्या प्रकारचा लिम्फोमा आहे आणि शरीराच्या कोणत्या भागात विकसित होत आहे यावरसुद्धा अवलंबून आहे. त्यामुळे या रोगामध्ये अनेक वेगवेगळी लक्षणे उद्भवू शकतात. ऑड्रेने सांगितले की, हा कॅन्सर रायनच्या मानेत आणि छातीत सापडला होता मात्र ज्या वेळी निदान झाले त्यावेळी रायनचा कॅन्सर दुसऱ्या टप्प्यात पोहचला होता.
या रोगाचे दोनच टप्पे असून हा रोग दुसऱ्या टप्प्यापर्यंतच जातो. त्यामुळे या रोगाचे निदान झाले की प्रथम उपचाराला सुरुवात करणे गरजेचे असते. रोगाचे निदान झाल्या झाल्या प्रथम केमोथेरपीची गरज आहे. त्यामुळे ते पहिल्यांदा करणे गरजेचे आहे.
रायनला हा रोग झाला आहे असे कळल्यानंतर आणि त्याच्यावर उपचार चालू केल्यानंतर ऑड्रे हॉजकिन आता लोकांमध्ये लिम्फोमाबद्दल जागरूकता करत आहेत. ऑड्रे म्हणाली, ‘मी कधीच विचार केला नाही की वजन कमी होते आणि त्वचेला खाज सुटते. त्यामुळे आपल्या मुलांच्या शरीराला खाज सुटत असेल तर पालकांनी मुलांच्या खाज येण्याकडे दुर्लक्ष करु नये.
त्यामुळे ज्या मुलाचा या रोगामध्ये मृत्यू झाला आहे त्याचे निदान लवकर झाले असते तर परिस्थिती वेगळी झाली असती. त्यामुळे बदलत्या दिवसात तुमच्या मुलांची काळजी गांभीर्याने घ्या. तरुणापणात त्यांना कोणता आजार आहे का, किंवा त्याला कोणता त्रास होतो का याबाबत सतत त्याच्याशी हितगुज करत राहा.
संबंधित बातम्या
Gaziabad Suicide : गाझियाबादमध्ये आर्थिक विवंचनेतून महिलेची मुलांसह आत्महत्या, वाचा नेमके काय घडले ?
Russia Ukrane War : …तर, अख्खा युरोप ‘गॅस’वर, कच्च्या तेलाचा भाव 300 डॉलर; रशियाची आगपाखड!