Blood Sugar: तुमच्या रक्तात साखर असली तरीही तुम्ही अंडी खाऊ शकता, फक्त या 5 पद्धती जाणून घ्या
तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढले तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तुमच्या आहारामुळेही रक्तातील साखरेची पातळी अधिक प्रभावी ठरु शकते. त्यामुळे या परिस्थितीत आरोग्य तज्ञ मधुमेही रुग्णांना काही गोष्टींचे सेवन टाळा असा सल्ला देतात.
मुंबईः तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढले तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तुमच्या आहारामुळेही (Diet) रक्तातील साखरेची (Blood sugar) पातळी अधिक प्रभावी ठरु शकते. त्यामुळे या परिस्थितीत आरोग्य तज्ञ मधुमेही (Diabetes) रुग्णांना काही गोष्टींचे सेवन टाळा असा सल्ला देतात. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. जेव्हा कधी तुम्ही काही खाण्याचा विचार करता तेव्हा फक्त खाण्याचाच विचार करत नाही तर रक्तातील साखरेची पातळी निरोगी ठेवण्याचाही विचार करता. खरं तर, रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्याने हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंड निकामी होणे, एकादा अवयव निकामी होणे आणि ब्रेन स्ट्रोक यांसारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजारांचा धोका संभवत असतो.
मधुमेह असलेल्या रुग्णांनी अन्नाचे प्रमाण, शिस्त आणि जंक फूड खाण्यापासून स्वतःला लांब ठेवणे आवश्यक आहे. पण आरोग्यदायी आहाराबाबत विचार करणाऱ्यांमध्ये मात्र अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना एक प्रश्न सतत सतावत असतो की, मधुमेहाच्या रुग्णांनी अंडी खावीत की नाही. आणि खाल्ली तर त्यांचे नुकसान होते का?
Protein stores: अंडी हे सगळ्यात जास्त प्रथिनेयुक्त खाद्यपदार्थ आहे. अंडी फक्त इतर लोकांसाठीच फायदेशीर नाही तर मधुमेहाच्या रुग्णांसाठीही अंड्याचे अनेक फायदे आहेत. जर तुम्हाला उच्च किंवा कमी रक्तातील साखरेचा त्रास होत असेल, तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की तुमच्या आहारातील प्रथिने हा तुमचा सर्वोत्तम निर्णय असू शकतो.
त्यामुळे अंडी खाणे तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरणार आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंड्यांमध्ये प्रथिने भरपूर असतात आणि आहारातील प्रथिने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
Proven in research: ब्रिटीश जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात अशा नोंद करण्यात आली आहे की, मधुमेह असलेल्या रूग्णांनी दिवसांतून 2 अंडी खाल्ल्याने त्यांच्या खराब कोलेस्टेरॉल किंवा एलडीएल कोलेस्ट्रॉलमध्ये घट दिसून येते. आहारात जर अंडी असतील तर लिपिड प्रोफाईल आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. काही प्रमाणात अंडी ही फायदेशीर असली तरी जास्त अंडी ही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
संबंधित बातम्या
तुम्हाला तुमचे लटकलेले पोट कमी करायचे असेल तर रोज सकाळी हे पेय घ्या; सुटका तर नक्कीच मिळेल
Health : रिकाम्या पोटी तूप खाण्याचा आयुर्वेदाचा सल्ला! चला जाणून घेऊयात फायदेच फायदे!