केईएम, शीव, कूपर, नायरसह 8 ठिकाणी लसीकरण केंद्रे; वाचा मुंबईत कुठे, कसे होणार लसीकरण!

देशात लवकरच कोरोना लसीकरणास सुरुवात होणार आहे. त्यासाठी संपूर्ण देशात तयारी सुरू असून मुंबई महापालिकेनेही लसीकरणासाठी संपूर्ण तयारी केली आहे. (Bmc prepared for Massive corona vaccine in mumbai)

केईएम, शीव, कूपर, नायरसह 8 ठिकाणी लसीकरण केंद्रे; वाचा मुंबईत कुठे, कसे होणार लसीकरण!
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 5:56 PM

मुंबई: देशात लवकरच कोरोना लसीकरणास सुरुवात होणार आहे. त्यासाठी संपूर्ण देशात तयारी सुरू असून मुंबई महापालिकेनेही लसीकरणासाठी संपूर्ण तयारी केली आहे. मुंबईत केईएम, शीव, नायर, कूपर, वांद्रे भाभा रुग्णालय, व्ही. एन. देसाई, राजावाडी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे. या 8 केंद्रातून मुंबईकरांना लस टोचली जाणार आहे. त्याविषयीचा हा घेतलेला आढावा. (Bmc prepared for Massive corona vaccine in mumbai)

‘या’ 8 रुग्णालयात लस टोचली जाणार

कोरोनाच्या लसीकरणासाठी पालिका क्षेत्राच्या कृती दलाची म्हणजेच टास्क फोर्सची पहिली बैठक पार पडल्यानंतर लसीकरणासाठीची कार्यवाही जलद गतीने सुरु आहे. प्रारंभी लसीकरणासाठी परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय, विलेपार्लेचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही ८ लसीकरण केंद्रे नियोजित करण्यात आली आहेत. या ठिकाणी रुग्णांना लस टोचली जाणार आहे.

पोलीस बंदोबस्तात लस आणणार

मुंबईत नियमित लसीकरण कार्यक्रमांतंर्गत सद्यस्थितीत उपलब्ध असलेली वितरण यंत्रणा कोविड – १९ या लस वितरणासाठी वापरण्यात येईल. तसेच मध्यवर्ती लससाठा शीतगृहापासून लसीकरण केंद्रापर्यंत लस वाहतुकीसाठी पोलिस बंदोबस्त अंतर्गत अतिरिक्त वाहने तैनात करण्यात येणार आहेत.

कांजूरमध्ये प्रादेशिक लस स्टोअर

कोविड १९ लसीकरणासाठी कांजूरमार्ग येथे परिवार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ५ हजार चौरस फूट क्षेत्र असलेली जागा ही केंद्रीकृत ठिकाणी लस साठवण्यासाठी केवळ प्रादेशिक लस स्टोअर (आरव्हीएस) म्हणून ओळखली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह केंद्र सरकारच्या नियमांनुसार ही कोविड स्टोरेज सुविधा विकसित करण्यात येत असून त्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

कोल्ड स्टोअरेजसाठी तांत्रिक समिती

कोल्ड स्टोअरेजसाठी आवश्यक तांत्रिक समितीची स्थापना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. या समितीमध्ये नॅशनल कोल्ड चेन रिसर्च सेंटरमधील तांत्रिक तज्ज्ञ तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील इतर तज्ज्ञ आणि यांत्रिकी व विद्युत विभागातील प्रतिनिधी कार्यरत आहेत.

भारत सरकार आणि PQS Catalogue यांच्या तांत्रिक वैशिट्यानुसार योग्य क्षमतेची दोन वॉक-इन-कूलर (Walk in Cooler) संच उपकरणे आणि एक वॉक-इन-फ्रिजर (Walk in Freezer) संच उपकरणे खरेदी करण्यात येणार आहे. राज्य सरकारमार्फत २२५ लीटर क्षमतेचे १७ आयएलआर (आईस लाइन्ड रेफ्रिजरेटर) चा पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यापैकी ८ आयएलआर नियोजित लसीकरण केंद्रांना (४ वैदयकीय महाविदयालय व ४ उपनगरीय रुग्णालय) देण्यात आले आहेत. सुरुवातीला लसीकरणासाठी केईएम, शीव, नायर, कूपर, वांद्रे भाभा, व्ही. एन. देसाई, राजावाडी आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही ८ लसीकरण केंद्रे नियोजित करण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या नियमांनुसार या प्रत्येक केंद्राने ३ ते ५ आदर्श लसीकरण स्थळं निर्देशित करावयाची आहेत.

80 हजार आरोग्य सेवकांचा डेटा अपलोड

केंद्र सरकारने ८ डिसेंबर २०२० रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिलेल्या सूचनेनुसार आरोग्य सेवकांचा डेटा बेस कोविन डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपलोड केला जात आहे. आतापर्यंत सुमारे ८० हजार सेवकांचा डेटा कोविन पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. एकूण १ लाख २६ हजार ३७८ सेवकांचा डेटा अपलोड करण्याची ही कार्यवाही देखील वेगाने सुरु आहे. सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, फ्रंटलाइन अभियंते, वाहन चालक, बेस्ट कर्मचारी, स्मशानभूमी कर्मचारी आणि देखभाल विभागातील कर्मचाऱ्यांकडून आघाडीच्या कामगारांचा डेटा संकलित करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. फ्रंटलाईन वर्कर्सचा डेटा एकत्रित करून २५ डिसेंबर, २०२० पर्यंत कोविन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी नगर विकास विभागाने निर्देशित केलेल्या समन्वय अधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार आहे. (Bmc prepared for Massive corona vaccine in mumbai)

संबंधित बातम्या:

ब्रिटनमध्ये कोरोना स्ट्रेनचा कहर सुरु; कुठल्या देशात काय बंद? भारतात काय परिस्थिती?

कोरोनाचा कहर: ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत रद्द; केंद्राचा मोठा निर्णय

कोरोनाचा जीवघेणा अवतार आणि त्याची संपूर्ण माहिती, स्पेशल रिपोर्ट

‘मिशन लसीकरण’; राज्यात कोरोना लसीकरणाच्या कामाला वेग; चांद्यापासून बांद्यापर्यंत जय्यत तयारी!

(Bmc prepared for Massive corona vaccine in mumbai)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.