Breast cancer: ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळायचा असेल तर तज्ज्ञांच्या ‘या’ टिप्स करा फॉलो

ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत आहे. या कॅन्सरची बरीचशी प्रकरणे ही ॲडव्हान्स स्टेजमध्ये रिपोर्ट होत आहेत.

Breast cancer: ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळायचा असेल तर तज्ज्ञांच्या 'या' टिप्स करा फॉलो
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 10:13 AM

नवी दिल्ली – जगभरात ब्रेस्ट कॅन्सरच्या (स्तनाचा कर्करोग) केसेस झपाट्याने वाढत आहेत. आता लहान वयातील महिलाही या कॅन्सरला बळी पडत आहेत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे (bad lifestyle) हा आजार वाढत आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर (breast cancer) हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडेही जात आहे. कॅन्सरची ही काही प्रकरणे अनुवांशिक देखील आहेत. अशावेळी याच्यापासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी (care to be taken for prevention) घेणे गरजेचे आहे. बीएसए जनुकांच्या माध्यमातून हा कॅन्सर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र, अशी प्रकरणे केवळ 5 टक्केच आहेत.

निष्काळजीपणा आणि आजाराची लक्षणे वेळेवर न तपासणे हे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण आहे. राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरमधील ब्रेस्ट सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे डॉ. राजीव कुमार यांच्या सांगण्यानुसार, एखाद्या कुटुंबांमध्ये कुणाला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाण्याचा धोका असतो. अशा लोकांनी कॅन्सरची तपासणी वेळेवर करून घ्यावी. जेणेकरून हा आजार वेळीच ओळखून त्यावर योग्य उपचार करता येतील. या आजारापासून बचाव करण्यासाठी बीआरएसए जनुक चाचणी केली पाहिजे.

हे सुद्धा वाचा

का वाढत आहेत ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणे ?

आजकाल महिला या वय बरंच वाढल्यानंतर लग्न करत आहेत. मुलांचा जन्मही उशीरा होतो. अनेक प्रकरणांमध्ये स्त्रिया या बाळांना स्तनपानही देत नाहीत. त्याशिवाय खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत, असे डॉ. कुमार यांनी सांगितले. यापूर्वी 50 वर्षांवरील महिलांना कॅन्सर झाल्याचे दिसून येत होते, मात्र आता 30 ते 45 वयोगटातील व्यक्तींनाही कॅन्सर होत आहे. लहान वयातच कॅन्सरची लक्षणे शोधून त्यावर उपचार केले जातात, पण जर हा आजार ॲडव्हान्स स्टेजमध्ये पोहोचला तर त्यावर उपचार करणे खूप कठीण होते. मात्र आता नवनवे तंत्रज्ञान आल्याने पूर्वीच्या तुलनेत कॅन्सरवरील उपचार पूर्वीपेक्षा सोपे झाले आहेत.

ही आहेत ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे

– स्तनांमध्ये न दुखणारी गाठ तयार होणे

– स्तनाग्रांमधून रक्त येणे

– स्तन आतल्या बाजूस ओढले गेल्यासारखे वाटणे

– खांद्याच्या खालच्या भागात गाठ तयार होणे

– अचानक वेगाने वजन कमी होणे.

बचावासाठी या टिप्स करा फॉलो

– बीआरसीए जनुक चाचणी करावी

– 40 व्या वर्षानंतर मेमोग्राम चाचणी करत रहावी.

– वजन नियंत्रणात ठेवावे.

– खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचा अवलंब करावा.

– धूम्रपान तसेच मद्यपान करू नये.

– स्तनांमध्ये गाठ जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.