Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breast cancer: एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचतो ब्रेस्ट कॅन्सर, अशी ओळखा लक्षणे

ब्रेस्ट कॅन्सरची (स्तनाचा कर्करोग) ५ टक्के प्रकरणे अनुवांशिक म्हणजेच जेनेटिक असतात आणि पालकांकडून मुलांपर्यंत पोहोचतात.

Breast cancer: एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचतो ब्रेस्ट कॅन्सर, अशी ओळखा लक्षणे
Image Credit source: Cleveland Clinic
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 9:52 AM

नवी दिल्ली – जगभरात दरवर्षी ब्रेस्ट कॅन्सरच्या (स्तनाचा कर्करोग) रुग्णांमध्ये (breast cancer patients) वाढ होत आहे. या कॅन्सरची सर्वाधिक प्रकरणे महिलांमध्ये (women)आढळून येतात. या कॅन्सरची बहुतांश प्रकरणे ही ॲडव्हान्स स्टेजमध्ये (प्रगत अवस्थेत) नोंदवली जातात. त्यांच मुख्य आणि मोठं कारण म्हणजे महिलांना ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांची माहिती नसते. ब्रेस्ट कॅन्सर होण्याची अनेक कारणे (reasons) असतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण अनेक बाबतीत हा आजार अनुवंशिकतेमुळेही (जेनेटिक्स) होतो. अशा परिस्थितीत लोकांनी अधिक सावध राहणे गरजेचे आहे.

राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्युट अँड रिसर्च सेंटर (RGCI) मधील वरिष्ठ सल्लागार आणि ब्रेस्ट सर्जिकल ऑन्कोलॉजीचे प्रमुख डॉ. राजीव कुमार यांच्या सांगण्यानुसार, कुटुंबात एखाद्या व्यक्तीला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर त्या कुटुंबात पुढच्या पिढीत ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका खूप जास्त असतो. अशा परिस्थितीमध्ये कुटुंबातील महिलांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. ज्यामुळे सुरुवातीच्या पातळीवरच कॅन्सरचा शोध घेऊन या आजारावर वेळीच उपचार करता येऊ शकतील.

5 टक्के प्रकरणे जेनेटिक (अनुवांशिक)

हे सुद्धा वाचा

डॉ. कुमार यांच्या सांगण्यानुसार, ब्रेस्ट कॅन्सरची 5 टक्के प्रकरणे ही जेनेटिक म्हणजेच अनुवांशिक असतात आणि (हा आजार) पालकांकडून मुलांपर्यंत पोहोचतो. ब्रेस्ट कॅन्सर हा बीआरसीए जनुकाद्वारे (जीन) एका पिढीकडून दुसऱ्या पिढीप पोहोचतो. अशा परिस्थितीत, अशा सर्व हाय-रिस्क असलेल्या कुटुंबातील लोकांनी बीआरसीए जनुक चाचणी करून घ्यावी. ही चाचणी अगदी स्वस्त दरात केली जाते. डॉ. राजीव सांगतात की, RGCIने आतापर्यंत ७०० हून अधिक महिलांवर बीआरसीए चाचण्या केल्या असून त्यातील 25 टक्के (व्यक्ती) पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.

मॅमोग्राम चाचणीही गरजेची

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, महिलांनी मॅमोग्राम टेस्टही करून घ्यावी. याद्वारे ब्रेस्ट कॅन्सरचा शोध सहज लावता येतो. मात्र स्तनाच्या आकारात होणारा बदल किंवा स्तनातील गाठ, अशा बदलांकडे महिला लक्ष देत नाही, ही चिंतेची बाब आहे. हे ब्रेस्ट कॅन्सरचे एक प्रमुख लक्षण आहे. या लक्षणांकडे योग्य वेळी लक्ष दिले नाही तर ब्रेस्ट कॅन्सरबद्दल ॲडव्हान्स स्टेजमध्येच कळते आणि अशावेळी उपचार करताना खूप त्रास होतो.

अशी ओळखा लक्षणे

कॅन्सरच्या उपचारात आता नवीन तंत्रज्ञान आले आहे, असे डॉ. राजीव कुमार यांनी नमूद केले. कॅन्सरच्या बाबतीत मृत्यू (होण्याची) शक्यता फारच कमी झाली आहे. आता ब्रेस्ट कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येतो. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, एखाद्या महिलेच्या स्तनात असलेली गाठ ही कॅन्सर कारत नसते. त्यापैकी केवळ ३० ते ४० टक्के गाठी कॅन्सरच्या असतात. पण स्तनामध्ये गाठ आढळली तर त्याची तपासणी अवश्य केली पाहिजे.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.