Breathing During Running : रनिंग करताना श्वास घेण्याचे तंत्र जाणून घ्या, वाचा याबद्दल सविस्तर!
अनेकदा आपण फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआउट करतो. धावणे किंवा चालणे फिटनेससाठी खूप फायदेशीर आहे. पण कोणत्याही प्रकारच्या वर्कआउट रूटीनमधून (Workout Routine) जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत.
मुंबई : अनेकदा आपण फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआउट करतो. धावणे किंवा चालणे फिटनेससाठी खूप फायदेशीर आहे. पण कोणत्याही प्रकारच्या वर्कआउट रूटीनमधून (Workout Routine) जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. तुमचा फॉर्म आणि तुमची श्वास घेण्याची पध्दत. (Breathing Pattern)
-वर्कआउट करताना अनेकदा आपण श्वासोच्छवासाच्या पद्धतीकडे लक्ष देत नाही. कोणताही व्यायाम करताना, श्वासोच्छ्वास योग्य प्रकारे कसा घ्यावा हे सर्वात महत्वाचे आहे. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, धावताना किंवा चालताना श्वास घेण्याची योग्य पध्दत किती महत्वाची आहे. श्वास घेण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे आपण बघूयात.
– धावण्यामुळे तुमच्या स्नायू आणि श्वसन प्रणालीतून तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि सतत हालचाल करण्यासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता असते. अशा स्थितीत धावत असताना नीट श्वास घेणे खूप गरजेचे आहे. अनेकजण पळताना किंवा चालताना नाकातून श्वास घेतात आणि तोंडातून श्वास सोडता. मात्र, धावताना आपल्याला अधिक ऑक्सिजनची गरज असते.
-अशा परिस्थितीत ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी तोंडाने श्वास घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही हळू धावत असाल तर तुम्ही तुमच्या नाकातून श्वास घेऊ शकता. पण जेव्हा तुम्ही फास्ट धावत असाल तर तुम्ही तोंडातून श्वास घ्यायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही चालता किंवा धावता तेव्हा तुमचा फॉर्म योग्य असणे खूप महत्वाचे आहे. या दरम्यान, तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवा. पुढे पहा आणि अधिक क्षमतेने श्वास घेण्यासाठी तुमचे खांदे मोकळे करा. नीट श्वास घ्या.
संबंधित बातम्या :
Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Breathing During Running Follow these special tips while running)