Health hot water : रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या सत्य
बऱ्याच वेळा वजन कमी करण्यासाठी गरम किंवा कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हे खरंच फायदेशीर आहे का, त्यामागचे नेमके कारण काय आहे, जाणून घेऊया.
Weight Loss : व्यस्त जीवनशैली, धावपळीचे जीवन, अपुरी झोप आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, पौष्टिक आहार न घेणं यामुळे आजकाल अनेक लोकांचे वजन वाढलेले दिसते. हे वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. कोणी स्पेशल डाएट (Diet) करतात, तर काहीजण व्यायाम, योगासने असे बरेच उपाय करतात. काहींना यश मिळतं तर काहींना वेळ लागतो. बरेच जण वजन कमी करण्यासाठी सकाळी उठून गरम पाणी पितात. मात्र खरंच गरम पाणी (Warm Water) प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत पाण्याचा एक मोठा भाग असतो, मात्र ते नेमकं कसं होतं , रोज किती पाणी प्यावे, या सर्वांबद्दल माहिती जाणून घेऊया.
गरम पाणी पिऊन वजन कमी होते का ?
गरम पाणी पिण्याचे जसे काही फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यास शरिरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत मिळते. तसेच जेवल्यानंतर गरम पाणी अथवा कोमट पाणी प्यायल्यास अन्नपचनास मदत मिळते. मात्र त्यामुळे शरीराच्या वजनावर सरळ प्रभाव पडत नाही. मात्र, एका ठराविक प्रमाणात पाणी प्यायल्यास वजनावर परिणाम होतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी पित असाल तर तुमचे वजन कमी होऊ शकते. त्याशिवाय, जेवण्याआधी काही वेळ अर्धा लिटर पाणी प्यायल्यास मेटाबॉलिज्मही वाढते. दिवसभर थोड्या -थोड्या वेळाने गरम पाणी पीत राहिल्यास मेटाबॉलिज्म सुधारते, फॅट ब्रेक करण्यासाठी गरम पाण्याची मदत होते. त्यामुळे पचनही चांगल्या पद्धतीने होते आणि पाणी पीत राहिल्याने सारखी-सारखी भूकही लागत नाही.
हे उपाय येतील कामी
- वजन कमी करायचे असेल तर गरम पाणी पिण्यासोबतच आणखीही काही उपाय केल्यास त्याचाही फायदा होऊ शकेल.
- तुम्ही सकाळी हर्बल टी (Herbal Tea) पिऊ शकता. हर्बल टी, वजन कमी करण्याचे काम करते आणि त्यामुळे शरीरही डिटॉक्स होते.
- सकाळी असा नाश्ता करावा जो तुम्हाला दिवसाची चांगली सुरूवात करण्यासाठी भरपूर उर्जा देईल. तसेचे दिवसभरात कोणतेही जेवण टाळू नका.
- भरपूर प्रमाणात फळं आणि सुका-मेवा खात रहा. दोन जेवणांच्या दरम्यान छोटी -छोटी भूक लागते तेव्हा स्नॅक्स म्हणून हे खाऊ शकता.
- थोड्याफार प्रमाणा व्यायाम करावा. त्याने शरीराचीही हालचाल होईल, फॅट कमी होताना दिसेल व तुमचा फायदा होईल.