एकाच व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोना होण्याचे चान्सेस आहेत का?; वाचा स्पेशल रिपोर्ट

कोरोनावर उपचार घेऊन पूर्णपणे बरे झाल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं पुन्हा एकदा आढळून आलं आहे. (Can people who recover from Covid 19 be re-infected with it?)

एकाच व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोना होण्याचे चान्सेस आहेत का?; वाचा स्पेशल रिपोर्ट
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 12:48 PM

मुंबई: कोरोनावर उपचार घेऊन पूर्णपणे बरे झाल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं पुन्हा एकदा आढळून आलं आहे. त्यामुळेच एकाच व्यक्तीला कोरोनाची दुसऱ्यांदा लागण होऊ शकत असल्याचं स्पष्ट झाल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे कोरोना होऊ द्यायचा नसेल तर मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे आणि वारंवार हात धुणे या शिवाय पर्याय नसल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. (Can people who recover from Covid 19 be re-infected with it?)

कोरोना मात केल्यानंतर पुन्हा संसर्गाची पहिली केस चीनच्या हाँगकॉंग शहरात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आढळली होती. एका 33 वर्षीय युवकाला पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला. त्याआधी त्याला मार्च महिन्यात संसर्ग झाला होता. कोरोनाच्या पुन्हा संसर्गाची ही जगातील पहिली केस होती. त्यामुळे अनेक संशोधकांनी या केसकडे लक्ष दिलं. काही संशोधकांनी त्यावेळी पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता भारतासह अनेक देशांमध्ये पुन्हा संसर्गाच्या काही केसेस समोर येत आहेत. यावर वैज्ञानिकांचं संशोधन सुरु आहे. दरम्यान, जे रुग्ण पूर्णपणे बरे होत नाहीत त्यांना पुन्हा संसर्गाचा धोका असतो, असं काही संशोधकांचं म्हणणं आहे.

भारतातही पुन्हा कोरोना संसर्गाच्या केसेस

भारतातही गेल्या काही दिवसात पुन्हा कोरोना संसर्गाच्या काही केसेस समोर आल्या आहेत. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) ने नोव्हेंबरमध्ये अशाप्रकारच्या तीन केसेस आढळल्या असल्याचं स्पष्ट केलं होतं. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णाला 100 दिवसात पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता असल्याचं आयसीएमआरचे संचालन बलराम भार्गव यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. “जागतिक आरोग्य संघटनेने कोणतीही व्यक्ती 90, 100 किंवा 120 दिवसानंतर पु्न्हा संक्रमित होऊ शकेल, अशी माहिती दिलेली नाही. त्यामुळे आम्ही 100 दिवसांची सीमा ठेवली आहे. एखादा रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला 100 दिवसात कोरोनाचा पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असतो. जागतिक आरोग्य संघटनेकडून याबाबतची माहिती आम्हाला मिळाली आहे”, असं बलराम भार्गव यांनी सांगितलं होतं.

शरीरात किती दिवस अँटीबॉडी राहते?

हाँगकाँगमध्ये पुन्हा संसर्गाची पहिली केस समोर आली होती. संबंधित रुग्णाच्या शरीरात चार महिन्यात कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडी संपल्या होत्या. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णाच्या शरीरात 60 ते 80 दिवस अँटीबॉडी असतात, त्यानंतर या अँटिबॉडी संपतात, अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे. दरम्यान, मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात तीन ते पाच आठवड्यांपूर्वी संक्रमित झालेल्या 90 टक्के लोकांमध्ये 38.8 टक्के अँटीबॉडी होती.

अमेरिकेच्या एरिजोना विद्यापीठाने केलेल्या संशोधनात कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर योग्य उपचार घेतल्यास शरीरात पुढचे पाच महिने कोरोनाविरोधात लढणारी रोगप्रतिकार क्षमता तयार झालेली असते, अशी माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे या संशोधनासाठी संशोधकांनी जवळपास 6 हजार पेक्षा जास्त लोकांचे टेस्ट केल्या होत्या.

बच्चू कडूंना पुन्हा करोना

राज्याचे जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही कोरोना झाला आहे. त्यांना यापूर्वी कोरोनाची लक्ष जाणवली होती. त्यावर त्यांनी उपचारही घेतले होते.

लस टोचल्यानंतरही कोरोना

नागपूरमध्ये पाच डॉक्टरांना उपचारानंतर पुन्हा कोरोना झाला आहे. तर पुण्यात ससून रुग्णालयातील एका नर्सलाही पुन्हा कोरोना झाला आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लस घेतल्यानंतरही या नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. नर्सला कोरोनाची लस टोचल्यानंतरही तिला कोरोनाची लागण झाली असेल तर त्याने घाबरून जाण्याची गरज नाही. या नर्सने आतापर्यंत कोरोनाचा पहिलाच डोस घेतला आहे. दुसरा डोस बाकी आहे, असं ससूनचे डीन मुरलीधर तांबे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयातही एका फार्मसिस्टला कोरोनाचं इंजेक्शन देण्यात आलं होतं. पण दुसरा डोस घेण्यापूर्वीच तो एका कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्याची टेस्ट केली असता त्याला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं होतं. तर अमरावतीतही जिल्हा रुग्णालयातील 12 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली होती. त्यावर सिव्हिल सर्जन निकम यांनी या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचा आणि कोरोना लसीचा काही संबंध नसल्याचं सांगितलं. कोरोना होऊ द्यायचा नसेल तर दोन डोसचा कोर्स पूर्ण करणं गरजेचं आहे, असं निकम म्हणाले.

फरिदाबादेत 23 जणांना पुन्हा कोरोना

उत्तर प्रदेशातील फरिदाबादमध्ये सप्टेंबर 2020मध्ये 23 जणांना पुन्हा कोरोना झाल्याचं आढळून आलं होतं. या 23 जणांना कोरोना झाल्यावर त्यांच्यावर उपचार करून कोरोनामुक्त जाहीर करण्यात आलं होतं. पण त्यानंतर त्यांना पुन्हा कोरोना झाला. हे सर्व रुग्ण 1 महिना ते 70 दिवसात पुन्हा कोरोना झाल्याचं दिसून आलं. तर तीन रुग्णांना 20 दिवसांत कोरोना झाल्याचं दिसून आलं आहे.

लसीकरणानंतरही कोरोना का?

लसीकरणानंतर शरीरात दोन प्रकारची इम्युनिटी तयार होते. एक इफेक्टिव्ह इम्युनिटी आणि दुसरी स्टरलायजिंग इम्युनिटी. स्टरलायजिंग इम्युनिटी व्हायरसपासून पूर्णपणे बचाव करते. त्यामुळे शरीरातील कोशिकांमध्ये व्हायरसचा कोणताही कण जात नाही. शरीरातील व्हायरस त्याच्या सारखा व्हायरस निर्माण करत नाही, त्यामुळे शरीरातील त्याचा प्रसार थांबतो. असं असलं तरी केंब्रिज विद्यापीठाच्या क्लिनीकल रिसर्च फेलो सारा कँडी यांच्या म्हणण्यानुसार, व्हायरसला शरीरात घुसण्यापासून रोखणं पूर्णपणे अशक्य आहे. तर इफेक्टिव्ह इम्युनिटीद्वारे शरीरात व्हायरसमुळे निर्माण होणारे गंभीर आजार रोखण्याचं काम केलं जात. त्यामुळे तुम्ही कोरोना संक्रमणाच्या नियंत्रणापासून वाचू शकता. तसेच शरीरात व्हायरसही फैलावत नाही. कँडीच्या मते, लस टोचल्यानंतर शरीरात पुरेश्या अँटिबॉडी तयार होतात. तसेच एका व्हायरसपासून दुसरा व्हायरस तयार होण्याची प्रक्रियाही थांबते. त्यामुळे व्हायरस रोखल्याचं दिसून येतं. मात्र, ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षण दिसत नाहीत, अशांनाच पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं दिसून येतं असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, लस घेतल्यानंतरही कोरोना रोखायचा असेल तर हात धुणे, मास्क तोंडाला लावणे आणि अंतर ठेवणे या गोष्टी पाळल्याच पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

आजाराचं स्वरुप गंभीर नसेल

लसीकरणानंतरही कोरोना होऊ शकतो. पण लसीकरणानंतर कोरोना झाल्यास त्याचं स्वरुप गंभीर नसेल. त्यामुळे जीवाला धोका होणार नाही. लस घेतली असेल तर लक्षण नसलेला कोरोना होऊ शकतो. पण त्याचा परिणाम सौम्य असेल. फायजर बायोनटेकची लस मूळ व्हायरसपासून होणारा आजार रोखण्यासाठी 95 टक्के यशस्वी ठरली आहे तर ऑक्सफर्ड-एक्स्ट्राजेनेका 76 टक्के प्रभावी ठरली आहे. (Can people who recover from Covid 19 be re-infected with it?)

लसीकरणानंतरही खबरदारी घ्यावी लागणार

कोरोनावरील लस घेतल्यावर कोरोना होणार नाही, अशा भ्रमात कुणी राहू नये. सरकारने कोरोना बाबतची जी गाईडलाईन जारी केली आहे. त्याचं सर्वांना पालन करावंच लागणार आहे. मास्क वापरणं, सहा फूटापर्यंत अंतर ठेवणं, वारंवार हात धुणे आदी गोष्टी कराव्या लागणार आहेत. व्हॅक्सीन टोचल्यानंतर या गोष्टींचं पालन केल्यावरच कोरोनापासून वाचणं शक्य होणार आहे. (Can people who recover from Covid 19 be re-infected with it?)

संबंधित बातम्या:

राज्यातील धडाडीच्या मंत्र्याला दुसऱ्यांदा कोरोना, दोन दिवसात 4 मंत्री पॉझिटिव्ह

7 कॅबिनेट, 3 राज्यमंत्री, ठाकरे सरकारमधील ‘कोव्हिड योद्धे’ मंत्री

चहा प्यायल्यानंतर कप फोडला, डोळ्यात पाणी येत होतं, बच्चू कडूंनी अनुभवलेले कोरोनाचे 3 दिवस

(Can people who recover from Covid 19 be re-infected with it?)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.