Tea Tips | मिल्क टी आणि ग्रीन टी दोन्ही एकत्र पित असाल तर…हे वाचा!
मिल्क टी चे फॅन्स खूप आहेत. ग्रीन टी चे सुद्धा आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. दोन्ही प्रकारचे चहा तितकेच महत्त्वाचे आहेत. पण हे दोन्ही वेगवगेळे चहा समजा एकत्र प्यायले, एकामागोमाग प्यायले तर काय होईल? याचा आरोग्यावर काही परिणाम होईल का? चला बघुयात...
मुंबई: भारतात प्रत्येकाला सकाळी उठल्याबरोबर चहाची आठवण येते. फक्त एक कप गरम चहा घ्या आणि सगळी झोप नाहीशी होते. आता काही लोक मिल्क टी पितात, काही लोक ग्रीन टी पितात. ग्रीन टी प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होते. जे लोक फिटनेसबाबत जागरूक असतात, त्यांना सकाळ-संध्याकाळ ग्रीन टी प्यायला आवडते. तसे तर चहा कसाही असो, तो प्यायल्याने मूड एकदम फ्रेश होतो. चहा प्यायल्याने काही लोकांना भरपूर ऊर्जा मिळते.
दोन्ही एकत्र पित असाल तर…
आता काही लोकांच्या मनात प्रश्न उभा राहतो की हे दोन्ही प्रकारचे चहा एकाच वेळी प्यायले जाऊ शकतात का? आज आपण लोकांचा हाच संभ्रम दूर करणार आहोत. तसेच हे दोन्ही चहा एकाच वेळी प्यायल्याने आरोग्याचे काय नुकसान होते हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जर तुम्ही मिल्क टी आणि ग्रीन टी दोन्ही एकत्र पित असाल तर हा लेख नक्की वाचा.
परंतु दररोज असे केल्याने…
एका रिपोर्टनुसार, जर तुम्ही हे दोन्ही चहा एकाच वेळी प्यायले तर यामुळे तुमच्या आरोग्याला कोणतेही नुकसान होत नाही. म्हणजेच दुधाच्या चहानंतर तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता. हे दोन्ही चहा तुम्ही आरामात प्यावेत. परंतु दररोज असे केल्याने तुमची पचनक्रिया देखील बिघडू शकते, म्हणून लक्षात ठेवा की तुम्ही कधीतरीच त्यांचे सेवन करू शकता.
एकाच वेळी चहाचे दोन प्रकार
या दोन्ही चहामध्ये पुरेशा प्रमाणात कॅफिन असते. तसेच दोन्हींमधील कॅफिनची पातळीही वेगवेगळी असते. त्यामुळे दोन्ही चहाचा शरीरावर होणारा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. याव्यतिरिक्त जर तुम्हाला लैक्टोज इंटॉलरन्सची समस्या असेल तर तुम्ही मिल्क टी घेणे टाळावे. हर्बल टी म्हणजेच ग्रीन टीला प्राधान्य द्यावे. आरोग्याच्या दृष्टीने ग्रीन टी अधिक फायदेशीर आहे. यात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे प्यायल्याने चयापचयासाठी चांगले असतात. त्यामुळे दुधाच्या चहापेक्षा ग्रीन टीचे सेवन जास्त करावे.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)