Health : रेाजच पिताय हे आवडते पेय तर..जाऊ शकते तुमची दृष्टी; तज्ज्ञांच्या मते ‘हॉट कॉफी’ करू शकते तुमची दृष्टी क्षीण!

तज्ज्ञांच्या मते, गरम कॉफी प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी कमी होण्याचा धोका वाढतो. त्यांचं म्हणणं आहे की, जर तुम्ही रोज ठराविक प्रमाणात कॉफी प्यायली तर काचबिंदू किंवा मोती बिंदुचा धोका वाढतो.

Health : रेाजच पिताय हे आवडते पेय तर..जाऊ शकते तुमची दृष्टी; तज्ज्ञांच्या मते ‘हॉट कॉफी’ करू शकते तुमची दृष्टी क्षीण!
कॉफीचे अतिसेवन शरीरासाठी धोकादायक आहे
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 3:41 PM

मुंबई : काहींना चहा आवडते तर, काहींना कॉफी प्राणप्रिय (Coffee dear) आहे. काहींना थंड पेय आवडतात तर काहींना ज्यूस आवडतात. अनेक द्रवपदार्थ आरोग्यासाठी चांगले मानले जातात तर अनेक चांगले मानले जात नाहीत. बहुतेक लोकांना कॉफी आवडते, म्हणून ते दिवसाची सुरवात 1 कप स्ट्राँग कॉफीने करतात. भारतासह जगभरात कॉफीला जास्त मागणी आहे. 1 कप स्ट्रॉंग कॉफी प्यायल्यानंतर शरीरात ताजेपणा येतो. अनेकांना दिवसाची सुरवात 1 कप स्ट्रॉंग कॉफीनेच होते, तर काही लोक दिवसाच्या कोणत्याही वेळी कॉफी रिपीट करतात. टेस्टी आणि हेल्दी (Tasty and healthy) कॉफी प्यायल्याने शरीरात एनर्जी चा संचार होवुन छान वाटते. कॉफी हे जगातील सर्वात प्रसिद्ध पेयांपैकी एक आहे. परंतु, तज्ज्ञांच्या मते, गरम कॉफी प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी कमी (Low vision) होण्याचा धोका वाढतो. जाणून घ्या, काय आहेत रोज कॉफी पिण्याचे परिणाम.

गंभीर आजार

स्टॅटिस्टा संशोधन विभागाने केलेल्या संशोधनानुसार 2022 या आर्थिक वर्षात संपूर्ण भारतात 1210 हजार 60 किलो कॉफीचा खप झाला होता. तो मागील वर्षीपेक्षा जास्त होता. 2021 मध्ये जागतिक कॉफीचा वापर अंदाजे 165 दशलक्ष 60 किलोग्रॅम बॅग होता, ज्यामध्ये युरोपियन युनियन आणि युनायटेड स्टेट्समध्ये कॉफीचा सर्वाधिक वापर केला जातो. संशोधनानुसार, कॉफीच्या सेवनाने काही गंभीर आजारांमध्ये मदत होऊ शकते जसे: टाइप 2 मधुमेह, फॅटी लिव्हर रोग आणि काही कर्करोग. पण तुम्हाला माहीत आहे का की, जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्यानेही डोळ्यांची झीज होऊ शकते.

रक्तदाब वाढू शकतो

Themirror च्या मते, जास्त कॉफी प्यायल्याने मोतीबिंदू होऊ शकतो. ही डोळ्यांची एक सामान्य स्थिती आहे, परंतु जर त्यावर त्वरित आणि योग्य उपचार केले नाहीत तर, यामुळे दृष्टी कमी-कमी होऊन आंधळेपण येऊ शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात कॅफीन असते, त्यामुळे दिवसातून एक किंवा दोन कपा पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये. जर कोणी नियमितपणे दररोज ठराविक प्रमाणापेक्षा जास्त कॉफी घेत असेल तर मोतीबिंदूचा धोका वाढतो.

रक्तदाब वाढतो

वास्तविक, कॅफिनयुक्त पेये रक्तदाब वाढवतात, ज्यामुळे डोळ्यांचा दाब देखील वाढतो. दुसरीकडे, एखाद्याच्या डोळ्यांवर सतत दाब असल्यास, मोतीबिंदू होऊ शकतो. मोतीबिंदू हे जगातील अंधत्वाचे प्रमुख कारण म्हणून ओळखले जाते. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार, तीन किंवा त्याहून अधिक कप कॉफी प्यायल्याने ‘एक्सफोलिएशन ग्लुकोमा’चा धोका वाढतो. जेव्हा शरीरात द्रव तयार होतो आणि डोळ्यांच्या ऑप्टिक नर्व्हवर दबाव वाढतो तेव्हा मोतीबिंदू होतो. पण जास्त कॉफी प्यायल्याने मोतीबिंदू होईलच असे नाही.

संशोधनात सहभागी झालेल्या लोकांचा मोतीबिंदूचा कौटुंबिक इतिहास होता, ज्यामुळे भविष्यात मोतीबिंदू होण्याचा धोका वाढतो. जर एखाद्या व्यक्तीने अधूनमधून म्हणजेच आठवड्यातून एक दिवस जास्त कॉफी प्यायली तर त्याचा या संशोधनात समावेश करण्यात आला नाही. दररोज तीन किंवा त्याहून अधिक कप कॉफी पिणाऱ्यांचा समावेश होता.

किती कॉफी प्यावी?

हेल्थलाइनच्या मते, कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण बदलू शकते. म्हणजेच, कधीकधी एक कप कॉफीमध्ये 50mg कॅफीन असते तर कधी 400mg कॅफीन असते. सरासरी एक कप कॉफीमध्ये 100mg कॅफीन असते. बरेच तज्ञ सहमत आहेत की, दररोज सुमारे 400 मिलीग्राम कॅफीन सुमारे चार कप समतुल्य आहे. मध्यम प्रमाणात कॅफिन पिणे तुमच्या डोळ्यांसाठीच चांगले नाही तर अनेक रोगांचा धोका देखील कमी करतो. कच्च्या कॉफी बीन्समध्ये क्लोरोजेनिक ऍसिड (सीजीए) असते जे एक चांगले अँटिऑक्सिडेंट आहे जे रक्तदाब कमी करण्यास आणि रक्त परिसंचरण कमी करण्यास मदत करते.

हळूहळू मोतीबिंदू हेाऊ शकतो

मोतीबिंदू ही सामान्यतः वृद्ध आणि प्रौढांना प्रभावित करणारी स्थिती आहे. वर्षानुवर्षे ते खूप हळूहळू विकसित होते. प्रथम तुमचा प्रकाश अंधूक होतो आणि त्यानंतर इतर लक्षणे दिसतात. या कारणास्तव, बहुतांश लोकांना बऱ्याच काळासाठी माहित नसते की त्यांना काचबिंदू आहे. जर एखाद्याने नियमित डोळ्यांची तपासणी केली तर त्याला याची माहिती मिळते.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....