आज या खास स्टाइलने साजरा करा, ‘फ्रेश व्हेज डे’ ; जाणून घ्या, फ्रेश व्हेज डे संबंधित काही खास गोष्टी!
अमेरिकेत भाज्यांचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी 16 जून रोजी फ्रेश व्हेज-डे साजरा केला जातो. त्या मागचा इतिहास तुम्हाला माहित आहे का.. हा दिवस का साजरा केला जातो आणि या दिवशी तुम्ही कोणते अनोखे उपक्रम करू शकता याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

शाकाहार सदाचार (Vegetarian Virtue) असे म्हटले जाते..कारण, निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आहारात भाज्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. भाज्यांमधील पोषक तत्व,गुणधर्म आपल्या शरीराला आतून मजबूत ठेवतात आणि अनेक आजारांपासून शरिराचे संरक्षण करतात. ताज्या भाज्या खाल्ल्याने चयापचय गती सुधारते आणि शरीराचा विकास चांगला होतो. दरवर्षी अमेरिकेत फ्रेश व्हेज-डे हा उत्सव १६ जून रोजी साजरा केला जातो. आजच्या काळात लोकांना जंक फूडच्या आहाराची इतकी सवय झाली आहे की जिवनात भाज्यांचे महत्त्व (The importance of vegetables) काय आहे याचा देखील त्यांना विसर पडला आहे. हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने आपण कर्करोगासारख्या घातक आजारापासून दूर राहु शकतो. त्यामुळे या भाज्यांचे महत्व सांगण्यासाठी अमेरिकेत हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. जाणून घेऊया, फ्रेश व्हेज-डे (Fresh Veg-Day) का साजरा केला जातो, त्या मागील इतिहास काय आहे आणि या दिवशी लोक काय-काय करतात.
फ्रेश व्हेज-डे चा इतिहास
प्राप्त माहिती नुसार, ताज्या भाज्यांच्या वितरणाचा ट्रेंड अमेरिकेच्या काही भागांमध्ये 1800 मध्ये सुरू झाला, परंतु 1852 मध्ये त्यांचे वर्चस्व वाढू लागल्याने, लोकांनी राष्ट्रीय स्तरावर त्याचा व्यापार म्हणुन स्विकार केला. प्रत्येकाला ताज्या भाज्या आणि उत्तम पेाषण मिळायला हवे यासाठी दहा वर्षांनी कृषी विभागाची स्थापना करण्यात आली. हळूहळू त्याचा ट्रेंड इतका वाढला की नवीन सेंद्रिय आणि शाकाहारी उत्पादने बाजारात आली. त्यामुळे भाजीपाल्याचा खप वाढून लोकांना अधिक सुविधा मिळू लागल्या. ताज्या भाज्या मिळणे प्रत्येकाचाच अधिकार आहे. म्हणून, अमेरीकेत (युएस) मध्ये फ्रेश व्हेज-डे साजरा करण्याचे पेव फुटले. त्यासाठी 16 जून ही उत्सवाची तारीख निश्चीत करण्यात आली. तेव्हा पासून पाश्चिमात्य देशात फ्रेश व्हेज-डे चा ट्रेंड सुरू झाला.
हा दिवस का साजरा केला जातो?
बर्याच लोकांना ताज्या भाज्यांचे महत्त्व माहित आहे, परंतु तरीही बरेच लोक त्यांचे सेवन टाळतात. लोकांना ताज्या भाज्या खाण्यास प्रोत्साहित करणे हा या मागचा उद्देश असून जंकफुड मुळे होणारी हानी पाहता ताज्या भाज्यांनाच मुख्य आहारात सहभागी करावे, तसेच लेाकांनी रोज ताज्या भाज्या आणि फळे खावीत, ज्यामुळे ते अनेक आजारांपासून दूर राहू शकतात.
अशा प्रकारे फ्रेश व्हेज डे सेलिब्रेट करा
1.) शेतकऱ्याकडे जा: तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही या दिवशी एखाद्या शेतकऱ्याकडे जाऊन त्याच्या कामाचे कौतुक करू शकता किंवा ते भाजीपाल्याचे काम कसे करतात हे जाणून घेऊ शकता. जर तुमच्या घरात लहान मूल असेल, तर हा दिवस त्याच्यासाठी सर्वोत्तम ॲक्टीवीटी ठरु शकतो.
2.) बाजारात जा: तुम्हाला हवे असल्यास, फ्रेश व्हेज डे च्या दिवशी बाजारात जा आणि ताज्या भाज्या आणा , त्यापासून घरी काहीतरी निरोगी आणि चवदार बनवा. हवे असल्यास डायनींग टेबलवर तुम्ही पालक आणि इतर भाज्यांचे सॅलडही करू शकता.
3). व्हेजिटेबल पार्टी:- तुम्हाला वेळ असल्यास या दिवशी तुम्ही वेगळी अशी व्हेजीटेबल जेवणाची पार्टी करू शकता. त्यासाठी चार-दोन मित्र एकत्र करुन ताज्या भांज्यांपासुन चविष्ट खाद्य पदार्थ बनवा, ज्या फक्त हिरव्या भाज्यांपासून बनवल्या असतील. स्वतःही जेवण करा, अन् मित्रांनाही मनसोक्त घाऊ घाला.