Cervical cancer | गर्भाशयाचा कर्करोग भारतात दरवर्षी हजारो महिलांचा जीव घेतो, आता स्वदेशी लसीने वाढली नवी आशा!

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, गर्भाशयाचा कर्करोग हा जगातील महिलांमध्ये चौथा सर्वात सामान्य कर्करोग आहे. 2020 मध्ये, जगभरात 6 लाखांहून अधिक केसेस नोंदवल्या गेल्या आणि 3.42 लाख मृत्यू झाले. 2020 मध्ये, 90% प्रकरणे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये नोंदवली गेली आहेत.

Cervical cancer | गर्भाशयाचा कर्करोग भारतात दरवर्षी हजारो महिलांचा जीव घेतो, आता स्वदेशी लसीने वाढली नवी आशा!
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 6:21 AM

मुंबई : देशात आता गर्भाशयाच्या कर्करोगावरची (Cancer) पहिली स्वदेशी लस मिळणार आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ला गर्भाशयाच्या कर्करोगाविरूद्ध लस तयार करण्याची परवानगी दिली आहे. या लसीचे नाव CERVAVAC असे ठेवण्यात आले आहे. या वर्षाच्या अखेरीस ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे. सीरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute) गर्भाशयाच्या कर्करोगाविरूद्ध क्वाड्रिव्हॅलंट ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस लस (CHPV) साठी केंद्र सरकारकडे मंजुरी मागितली होती. या लसीच्या फेज 2 आणि 3 चाचण्या झाल्या आहेत. चाचणीमध्ये ही लस सर्व वयोगटातील महिलांवर प्रभावी ठरली असल्याचा दावा केला जात आहे. या लसीचा (Vaccine) सर्व प्रकारच्या एचपीव्ही विषाणूवर परिणाम दिसून आला आहे.

कर्करोगाचे प्रमाण 90% पर्यंत कमी होऊ शकते

एचपीव्ही लसीमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण 90% पर्यंत कमी होऊ शकते असे सांगण्यात आले. गर्भाशयाचा कर्करोग हा भारतीय महिलांमधील दुसरा प्रमुख कर्करोग आहे. स्तनाचा कर्करोग पहिल्या क्रमांकावर आहे. दरवर्षी या कर्करोगामुळे अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागतो. खतरनाक गोष्ट म्हणजे दरवर्षी गर्भाशयाच्या कर्करोगामुळे मृत्यू होणाऱ्या महिल्यांच्या आकडेवारीमध्ये मोठी वाढ होतयं. गर्भाशयाचा कर्करोग महिलांमध्ये होतो, परंतु काहीवेळा तो पुरुषांनाही होऊ शकतो. वेळीच काळजी घेतली तर त्यावर उपचार करता येतात, पण उशीर झाल्यास किंवा संसर्ग पसरल्यास मृत्यू होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, गर्भाशयाचा कर्करोग हा जगातील महिलांमध्ये चौथा सर्वात सामान्य कर्करोग आहे. 2020 मध्ये, जगभरात 6 लाखांहून अधिक केसेस नोंदवल्या गेल्या आणि 3.42 लाख मृत्यू झाले. 2020 मध्ये, 90% प्रकरणे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये नोंदवली गेली आहेत. गर्भाशयाचा कर्करोग ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) मुळे होतो. एचपीव्ही हे गर्भाशयाच्या मुखाच्या 95% पेक्षा जास्त कर्करोगाचे कारण आहे. एचपीव्ही सहसा लैंगिक संभोगाद्वारे पसरतो. डब्ल्यूएचओच्या मते, स्त्रिया आणि पुरुष अधिक लैंगिकदृष्ट्या सक्रिय असतात त्यांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी एचपीव्हीची लागण होऊ शकते.

कर्करोगाची 65,978 प्रकरणे नोंदवली गेली

भारतात 44 कोटींहून अधिक महिला राहतात. 15 ते 64 वयोगटातील महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामच्या आकडेवारीनुसार, भारतात गर्भाशयाचा कर्करोग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. 2015 मध्ये देशात गर्भाशयाच्या कर्करोगाची 65,978 प्रकरणे नोंदवली गेली आणि 29,029 मृत्यू झाले. त्याच वेळी, 2020 मध्ये, 75, 209 प्रकरणे नोंदवली गेली आणि 33,095 मृत्यू झाले. गर्भाशयाचा कर्करोग होण्यास अनेक वर्षे लागतात. त्यामुळे त्याची लक्षणे सुरुवातीला दिसत नाहीत. जेव्हा गर्भाशयाचा कर्करोग असतो तेव्हा सामान्यतः गुप्तांगातून रक्तस्त्राव जास्त होतो.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.