ब्लड प्रेशर वाढण्याची कारणे, त्यावर नियंत्रण मिळविण्याचे सोपे उपाय पाहा

बैठे काम करणे, व्यायामाचा अभाव आणि बदलत चाललेला आहार यामुळे कमी वयातच आपल्या ब्लड प्रेशरचा सामना करावा लागू शकतो. हायपरटेंशन हा सायलेंट किलर म्हटला जातो. चला पाहूयात कोणत्या कारणाने ब्लड प्रेशर वाढते आणि त्यास कंट्रोल करण्याचे उपाय पाहूयात

ब्लड प्रेशर वाढण्याची कारणे, त्यावर नियंत्रण मिळविण्याचे सोपे उपाय पाहा
BLOOD PRESSUREImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 3:47 PM

नवी दिल्ली | 8 फेब्रुवारी 2024 : आज कालच्या बिघडलेल्या लाईफ स्टाईलने अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. त्यात उच्च रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशरचा त्रास अनेकदा कमी वयातही सुरु होत आहे. आपले खानपान, घर आणि ऑफीसचे टेन्शन आणि योग्य व्यायाम न केल्याने ब्लड प्रेशरचा त्रास वाढत असतो. ताण-तणावामुळे आपल्याला हायपरटेंशनचा त्रास होत असतो. हायपरटेंशन एक सायलेंट किलर असून त्याची लक्षण सहज ओळखता येत नाहीत. तुम्हालाही काही जर डोकेदुखी किंवा चक्कर येणे, अंधुक दिसणे अशा तक्रारी असतील तर लागलीच डॉक्टरांची भेट घ्या…

उच्त रक्तदाबाची लक्षण

1 – वारंवार डोकेदुखी

2 – श्वास घेण्यात अडचणी

3 – नसांमध्ये झिणझिण्या जाणवणे

4 – चक्कर येणे

हायपरटेंशनपासून वाचण्याचे सोपे उपाय –

1 – डाएट हेल्दी ठेवा –

हायपरटेंशनपासून वाचण्यासाठी आपल्या ( Eat healthier ) डाएटची काळजी घ्यावी. अरबट चरबट खाऊ नये. चुकीच्या खाण्याच्या सवयीने देखील हा आजार होतो.

2 – वजन नियंत्रित ठेवणे –

जर तुमचे वजन जास्त आहे. ( Maintain a healthy weight ) तर वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवा. जास्त वजन झाल्यास देखील ब्लड प्रेशर वाढते.

3 – कमी मीठाचा वापर करणे –

आपण कमीत कमी मिठाचा ( Reduce sodium ) आहारात वापर करावा. कमी मीठ खाल्याने तुमचे ब्लड प्रेशर नियंत्रणात राखण्यात मदत मिळते. मिठात सोडीयमचे प्रमाण असते ते ब्लड प्रेशर वाढविते.

4 – ताण-तणाव वाढू देऊ नका –

जास्त विचार केल्याने ताण-तणावामुळे देखील ब्लड प्रेशर वाढते. तुम्ही जेवढा ट्रेस घ्याल तेवढा ब्लड प्रेशर हाय होतो. यासाठी तुम्ही योगासने करा.

5 – योग आणि मेडीटेशन करा –

योग आणि मेडीटेशन देखील ताण-तणाव कमी करण्यास मदत करते. यष्टीकासन, हस्तपादांगुष्ठान, भद्रासन आणि मत्स्यासन सारखी आसने करा. योगासनाने रक्ताभिसरण चांगले होते. मन शांत होण्यास मदत होते.

6 – वेळेवर जेवण घ्या –

जेवण वेळेवर घ्यावे. जर तु्म्ही वेळेवर जेवत नसाल तरी तुमचे ब्लड प्रेशर वाढू शकते. उपवास करू नये. उपवासाने देखील ब्लड प्रेशर वाढू शकते.

7 – खूप पाणी प्या –

जेवणासह तुम्ही पाणी पिण्याची सवय वाढवा. दिवसातून तीन लिटर पाणी तरी प्यायलाच हवे. सामान्य ब्लड प्रेशर ठेवण्यासाठी आपल्या डाएटमध्ये खजूराचा समावेश करावा. दालचिनी, मणूके, गाजर आणि आल्याचा सारख्या वस्तूंचा आहारात समावेश करावा.

( हा माहीती सामान्य ज्ञानावर आधारीत आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा )

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.