‘चिकन’ तुमच्या रक्तात विष पसरवण्याचे काम करू शकते; ‘या’ आरोग्य समस्यांचा वाढू शकतो धोका!
काही लोकांना चिकन खाण्याची सवय असते, पण ते रक्तात विष विरघळण्याचे काम करत असते हे त्यांना माहीत नसते. तुम्हीही चिकन आवडीने खात असाल तर, तुम्हालाही चिकनचे दुष्परिणाम माहिती असायला हवेत. जाणून घ्या, चिकन खाल्लाने, कोणते आजार होण्याची शक्यता असते.
मुंबई : शाकाहारी लोकांना अनेकदा प्रथिनांच्या कमतरतेचा सामना करावा लागतो, परंतु जे मांसाहारी पदार्थ (Non-vegetarian food) खातात त्यांना त्याची समस्या खूप कमी होते. अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की, जे लोक नियमितपणे चिकन सारख्या पदार्थांचे सेवन करतात, त्यांना प्रोटीनची कमतरता (Protein deficiency) कधीच जाणवत नाही. डॉक्टर आणि आरोग्य तज्ञही लोकांना चिकन खाण्याचा सल्ला देतात. तसे, जे लोक शाकाहारी आहेत, ते सोयाबीन किंवा मसूरमधून प्रोटीनची कमतरता पूर्ण करू शकतात. चिकन फायदेशीर असू शकते, परंतु आजकाल ज्या पद्धतीने त्याचे सेवन केले जात आहे, त्यामुळे लोक अनेक आजार आपल्या कवेत घेत आहेत. एवढेच नाही तर कोंबडी किंवा अंडी ही केमिकल वापरून मोठी केली जात आहेत आणि ते आरोग्यदायी न राहता अनारोग्यकारक अन्न (Unhealthy food) म्हणून आपल्या आहाराचा भाग बनले आहेत.
रक्ताची समस्या
रिपोर्ट्सनुसार, चिकन आपल्या कोलेस्ट्रॉलची पातळी खराब करते. जर तुम्ही रोज लाल मांस किंवा चिकन खात असाल तर, ते तुमच्या रक्तातील समस्या वाढवू शकतात. जर कोलेस्टेरॉल वाढले तर रक्तप्रवाहात अडचण येते आणि तुम्हाला उच्च रक्तदाबाचा आजार होऊ शकतो. BAT कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. या कारणास्तव, तज्ञांचे म्हणणे आहे की, चिकनचे जास्त प्रमाणात सेवन रक्तामध्ये विषासारखे कार्य करते.
लठ्ठपणा
आजच्या काळात लोकांना हेल्दी फूडपेक्षा जंक फूडसारखे चिकन खाणे जास्त आवडते. चिकन कोरमा, चिकन बर्गर, चिकन फ्राईज असे अनेक पदार्थ लोक ऑर्डरद्वारे किंवा घरी बनवून खातात. ते टाळावे असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे, परंतु जर तुम्ही ते रोज खात असाल तर तुम्ही लठ्ठपणाचा बळी होऊ शकता. लठ्ठपणा वाढला तर तुम्ही हृदयरोगी होऊ शकता.
उच्च रक्तदाब
हा आजार अनुवांशिकही असू शकतो आणि ज्यांच्या कुटुंबात ही समस्या आधीच आहे, त्यांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. अशा लोकांनी चुकूनही रोज चिकन खाऊ नये. ज्यांना उच्च रक्तदाबाचा अनुवांशिक इतिहास आहे, त्यांनी चिकन, दुग्धजन्य पदार्थ, लाल मांस यांसारखे चरबीयुक्त पदार्थ फार कमी प्रमाणात सेवन करावे.
(या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. TV9 मराठी याची पुष्टी करत नाही. तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच याचे अनुसरण करा.)