World diabetes day: 14 ते 20 वयोगटातील मुलांनाही होतोय मधुमेह, अशी घ्या काळजी

मुलांमध्ये मधुमेहाच्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे 12ते 25 % प्रकरणे ही टाइप-2 मधुमेहाची आहेत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि ॲक्टिव्ह लाइफस्टाइलचा अभाव यामुळे लहान मुलांनाही मधुमेह होत आहे.

World diabetes day: 14 ते 20 वयोगटातील मुलांनाही होतोय मधुमेह, अशी घ्या काळजी
मधुमेह
Follow us
| Updated on: Nov 14, 2022 | 11:51 AM

खराब जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे जगभरात मधुमेहाचे (Diabetes) रुग्ण वाढत आहेत. या आजाराबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी आज ‘ जागतिक मधुमेह दिन’ (World diabetes day) साजरा केला जात आहे. भारतातही मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत. इंटरनॅशनल डायबिटिस फेडरेशनच्या अहवालानुसार 2019 सालापर्यंत भारतात (in India) मधुमेहाचे 77 दशलक्ष रुग्ण आहेत. तसेच 20 ते 80 या वयोगटातील मधुमेहाच्या रुग्णांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मधुमेहाचा आजार हा केवळ वृद्ध व्यक्तीनांच होतो, असे पूर्वी म्हटले जायचे. मात्र आता लहान मुलंही या आजाराला बळी पडू लागली आहेत. यातील बहुतांश प्रकरणे टाइप-2 मधुमेहाची आहेत. ज्येष्ठ मधुमेह तज्ञ आणि RSSDI डॉ. बी. एम. मक्कर यांच्या सांगण्यानुसार, आता टाइप-2 मधुमेह सुरू होण्याचे निश्चित वय निश्चित करणे खूप कठीण झाले आहे. आता 14 ते 20 वर्ष या वयोगटातील मुलांना या आजाराचा सर्वाधिक फटका बसत आहे. गेल्या दशकभरात (10 वर्षे) या वयोगटातील टाइप-2मधुमेहाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मुलांमध्ये मधुमेहाच्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे 12 ते 25 % प्रकरणे ही टाइप-2 मधुमेहाची आहेत.

मुलांमध्ये वाढता लठ्ठपणा हे धोक्याचे लक्षण

हे सुद्धा वाचा

डॉ. बीएम मक्कड सांगतात की, मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. शारीरिक हालचालींचा अभाव, रात्री उशिरापर्यंत काम करणे, जेवण मिळवण्यासाठी फारसे कष्ट करावे न लागणे आणि जंक फूडचे वाढते सेवन यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एखादी गरोदर स्त्री लठ्ठ असेल तर किशोरवयात मुलाला टाइप-2 मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. ज्या मुलांना वयाच्या 15 व्या वर्षी (आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात) टाइप 2 मधुमेह होतो, त्यांच्या पुढल्या जीवनावर त्याचा परिणाम होतो.

अपोलो टेलिहेल्थचे सीईओ विक्रम थापलू यांच्या सांगण्यानुसार, देशातील 20 ते 70 या वयोगटातील एकूण लोकसंख्येपैकी 8.7 टक्के लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. मधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित एक आजार आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण आता भारतात या आजाराला महामारीचे स्वरूप आले आहे. मधुमेह हा अनेक कारणांमुळे होऊ शकतो, त्यामुळे त्याला सामोरे जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबण्याची गरज आहे. त्यासाठी या आजाराची लक्षणे काय आहेत व त्याला प्रतिबंध कसा करता येऊ शकेल, याची माहिती असणे आवश्यक आहे.

या गोष्टींची घ्या काळजी

मुलांमध्ये रक्तातील साखरेची पातळी (blood sugar level) नियंत्रणात ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण टाइप -2 मधुमेह असलेल्या मुलांवर लक्ष ठेवून त्यावर (मधुमेह) नियंत्रण ठेवले नाही तर ते त्या मुलांच्या आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत, वयाच्या 35 व्या वर्षीच (आरोग्यास) धोका निर्माण होऊ शकतो व त्याचा त्यांच्या संपूर्ण जीवनावर परिणा होऊ शकतो. मुलांचा मधुमेहापासून बचाव करायचा असेल तर या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

1) मुलांना ॲक्टिव्ह ठेवा आणि (बाहेर) खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या.

2) मुलांचे वजन जास्त वाढू देऊ नका.

3) मुलांच्या आहाराकडे लक्ष द्यावे व जंक फूडचे सेवन करू देऊ नये.

4) मुलांचा स्क्रीन टाईम ( मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर पाहणे) 1-2 तासांपेक्षा जास्त असू नये.

5) जास्त फॅट्स असलेले पदार्थ खाण्यास देऊ नयेत.v

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.