पर्यटकांनो, इकडे लक्ष द्या! देशातील सर्व ऐतिहासिक स्मारकं आणि संग्रहालये 15 जूनपर्यंत बंद राहणार

कोरोनाचा कहर वाढत चालल्याने देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. काही राज्यात लॉकडाऊन शिथिल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. (Closure of centrally protected monuments extended till June 15 amid corona)

पर्यटकांनो, इकडे लक्ष द्या! देशातील सर्व ऐतिहासिक स्मारकं आणि संग्रहालये 15 जूनपर्यंत बंद राहणार
Monuments
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 7:17 PM

नवी दिल्ली: कोरोनाचा कहर वाढत चालल्याने देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. काही राज्यात लॉकडाऊन शिथिल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने देशातील सर्व ऐतिहासिक स्मारके आणि संग्रहालये येत्या 15 जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांनो, ऐतिहासिक स्थळं पाहण्यासाठी जाण्याचा बेत असेल तर आताच हा बेत रद्द करा. (Closure of centrally protected monuments extended till June 15 amid corona)

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने हा निर्णय घेतला असून त्याबाबतची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने आज दिली. कोरोना महामारीमुळे सर्व संरक्षित स्मारके आणि संग्रहालये येत्या 15 जूनपर्यंत वा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. देशात एकूण 3,693 स्मारके आणि 50 संग्रहालये आहेत. या आधी 31 मेपर्यंत हे स्मारके आणि संग्रहालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ही मुदत संपण्याच्या एक दिवस आधीच त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुदत वाढवली जाऊ शकते

देशात कोरोनाची रुग्ण संख्या वाढतच राहिली तर स्मारके आणि संग्रहालये बंद ठेवण्याची तारीख आणखी वाढवली जाऊ शकते, असंही सांस्कृतिक मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, कोरोनाची ही दुसरी लाट अत्यंत घातक असल्याने सांस्कृतिक मंत्रालयाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

गेल्यावर्षी काय घडलं?

गेल्यावर्षी सर्व स्मारकांना मार्च अखेरपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला होता. त्यानंतर गेल्यावर्षी जुलैमध्येच सांस्कृतिक मंत्रालयाने स्मारके, प्रार्थना स्थळे, ऐतिहासिक आणि प्राचीन स्थळे आदींना उघडण्याची परवानगी दिली होती. मात्र, या स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येला मर्यादा घालण्यात आली होती. तसेच मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगही या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलं होतं.

24 तासात 3,460 जणांचा मृत्यू

दरम्यान, देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासात देशात 1,65,553 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 2,78,94,800 वर गेली आहे. गेल्या चोवीस तासात 3,460 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 3,25,972 वर गेली आहे. दुसरीकडे या चोवीस तासात 2,76,309 लोकांना डिस्चार्ज करण्यात आल्याने कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या 2,54,54,320वर पोहोचली आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 21,14,508 एवढी आहे. केरळ, तमिलनाडू, महाराष्ट्र आणि गोव्याने 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. तर उत्तर प्रदेश आणि दिल्ली सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्याचे संकेत दिले आहेत. (Closure of centrally protected monuments extended till June 15 amid corona)

संबंधित बातम्या:

Maharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात दिवसभरात 486 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, 887 रुग्णांना डिस्चार्ज 

कोरोनाशी लढण्यासाठी योग्य धोरण हवं, ‘निरर्थक बात’ नको; राहुल गांधींची टीका

Lockdown: जाणून घ्या देशभरातील लॉकडाऊनची परिस्थिती, कुठली राज्यं अनलॉक होण्याची शक्यता?

(Closure of centrally protected monuments extended till June 15 amid corona)

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.