पुरुषांसाठी वरदान आहे लवंग, लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी असा करा उपयोग

आयुर्वेदात भारतीय मसाल्याने मोठं महत्त्व आहे. भारतीय मसाल्याने जगभरात मागणी आहे. अनेक मसाले तर औषध म्हणून वापरले जाते. आयुर्वेदात लवंग खाण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. खासकरुन पुरुषांसाठी लवंग खाण्याचे मोठे फायदे होऊ शकतात. लैंगिक आरोग्यासाठी लवंगचा आहारात समावेश केला पाहिजे.

पुरुषांसाठी वरदान आहे लवंग, लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी असा करा उपयोग
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 8:46 PM

भारतीय गरम मसाल्यांना जगात विशेष मागणी आहे. त्यापैकीच एक लवंगला देखील विशेष महत्त्व आहे. लवंग हे उष्ण असून तिची चव तिखट आहे. लवंग तिच्या सुगंधासाठी देखील ओळखली जाते, लवंगचा वापर पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. बदलत्या ऋतूंसोबत होणाऱ्या ऍलर्जीपासून देखील लवंग तुम्हाला आराम देऊ शकते. लवंगाचा डेकोक्शन आणि लवंग यांचे मधासोबत सेवन केले जाते. त्याचप्रमाणे लवंगाच्या तेलात अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. ज्याला आयुर्वेदात खूप महत्त्व दिले गेले आहे. लवंगमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि जस्त यांसारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. लवंगपासून तयार केलेले तेल अनेक रोगांवर औषध म्हणून वापरले जाते. लवंग पुरुषांसाठी अधिक फायदेशीर आहे. पुरुषांना लैंगिक समस्या असेल तर त्यांनी लवंगचे सेवन करावे.

पचनशक्ती वाढवणे

पचनशक्ती चांगली असेल तर माणूस निरोगी राहतो. पचनसंस्था ही अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करते. त्यामळे शरीराला पोषण मिळते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. पण जर पचनसंस्था कमकुवत असेल तर तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्ही जर लवंगचे नियमित सेवन केले तर तुम्हाला पाचक एन्झाईम्सचा स्राव उत्तेजित होऊन पचन सुधारण्यास मदत होते. लवंग जळजळ, अपचन आणि मळमळ यासारख्या जठरासंबंधी समस्या दूर करते. पुरुषांना जर पचनाशी संबंधित समस्या असेल तर त्यांनी लवंगचे सेवन करावे.

यकृत सुरक्षित ठेवते

यकृत खराब होण्याची समस्या वाढत आहेत. खास करुन पुरुषांमध्ये याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी यकृत निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यकृत खराब झाले तर शरीराची कार्य करण्याची क्षमता कमी होत जाते. यकृताची योग्य काळजी घ्यायची असेल, तर भरपूर पाणी प्यायला हवे, सोबत आहाराकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे. लवंगमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात, ज्यामुळे ते अवयवांचे, विशेषत: यकृताला मुक्त रॅडिकल्सच्या प्रभावापासून संरक्षित करते.

लैंगिक आरोग्य सुधारते

पुरुषांसाठी लवंग खूप फायदेशीर ठरु शकते. ज्यांचे लैंगिक आरोग्य व्यवस्थित नसेल तर लवंग खाण्याचा सल्ला दिला जातो. कामोत्तेजक किंवा लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी लवंगचा वापर केला जातो.

मधुमेह नियंत्रित करा

मधुमेह टाळण्यासाठी खाण्याच्या सवयी सुधाराव्या लागतील. लवंग हे मधुमेहावर खूप चांगले औषध आहे. लवंगाचा उपयोग अनेक रोगांवर उपचार म्हणून केला जातो. मधुमेह होऊ नये म्हणून लवंगचा आहारात उपयोग करावा.

प्रतिकारशक्ती वाढवतो

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल करण्यासाठी लवंगचे सेवन केले पाहिजे. कारण रोगप्रतिकारशक्ती मजबूत असेल तरच तुम्हाला आजारांपासून लांब राहता येते. विषाणू, बॅक्टेरिया इत्यादींच्या संसर्गापासून ते शरीराचे संरक्षण करते. आयुर्वेदात काही औषधी वनस्पतींचे वर्णन केले आहे जे रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्यास मदत करतात. अशीच एक औषधी वनस्पती म्हणजे लवंग.

डिस्क्लेमर : वरील दिलेली माहिती ही सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. याबाबत टीव्ही ९ कोणताही दावा करत नाही. कोणतीही समस्या असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.
लालबागचा राजा मंडपातून मार्गस्थ, शेवटच्या निरोपासाठी भक्तांची गर्दी
लालबागचा राजा मंडपातून मार्गस्थ, शेवटच्या निरोपासाठी भक्तांची गर्दी.
लालबागच्या राजाची निरोपापूर्वीची आरती, खास tv9 च्या प्रेक्षकांसाठी
लालबागच्या राजाची निरोपापूर्वीची आरती, खास tv9 च्या प्रेक्षकांसाठी.
वडील दादांसोबत सत्तेत अन् मुलं वेगळ्या दिशेनं? बापांचा प्लॅन बी तयार?
वडील दादांसोबत सत्तेत अन् मुलं वेगळ्या दिशेनं? बापांचा प्लॅन बी तयार?.