मुंबई : आयुर्वेदात आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि सुधारण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत. या उपायांमध्ये आहाराशी निगडीत अनेक प्रभावी टिप्स्चा देखील समावेश होतो. आयुर्वेद शास्त्रानुसार, काही घरगुती उपायांचे सेवन केल्याने आपण दीर्घकाळ तंदुरुस्त (long term healthy) आणि निरोगी जिवन जगु शकतो. केवळ आयुर्वेदातच नव्हे तर अॅलोपॅथीमध्येही जायफळ आणि लवंग यांचे आरोग्यासाठी विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या दोन घटकांचे एकत्र सेवन केल्यास आरोग्याचे दुहेरी फायदे आपणास मिळू शकतात. घरातील जुन्या जाणत्या गृहीणी अर्थात आजीबाईंच्या बटव्यात जायफळ आणि लंवग (nutmeg and clove) याला अनन्य साधारण महत्व आहे. मुलांच्या संगोपनाशी या देाघा घटकांचा मुबलक प्रमाणावत (Abundant use) वापर केला जातो. भुख वाढवणे असो की, सर्दी दूर करण्यासाठी जायफळ आणि लवंग या दोन्हींचा योग्य वापर केल्यास, अनेक समस्या चुटकीसरशी दूर होतात.
कोरोनाचा प्रभाव अजूनही आपल्यामध्ये आहे, आणि नुकत्याच चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असतांना या परिस्थितीत लवंग आणि जायफळाच्या माध्यमातून प्रतिकारशक्ती वाढवून तुम्ही निरोगी राहू शकता. जायफळ आणि लवंग रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयोगी असून घसा खवखवण्या सारख्या आरोग्य समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी वापरले जातात.
एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात दोन ते तीन लवंगा टाका. तसेच त्यात अर्धा चमचा जायफळ पावडर टाका. लक्षात ठेवा दोघांचा प्रभाव गरम असतो परिणामी उन्हाळ्यात जरा जपुनच वापर करावा. लवंग जायफळ मिश्रणात साधे पाणी टाकून तसेच राहु द्यावे काही वेळाने एकजिन्सी मिश्रण झाल्यावर ग्रहण करावे. या मिश्रणाने आपल्या शरीरात जादु प्रमाणे फायदे आपण अनुभवू शकतात.
बहुतांश वेळी थंडगरम पाण्यामुळे किंवा थंडपेयांमुळे उन्हाळ्यातही खोकला आणि सर्दीचा त्रास जाणवतो, मात्र जायफळ आणि लवंगाच्या सेवनाने त्यापासून सुटका होऊ शकते. खोकला किंवा सर्दी झाल्यास लवंग आणि जायफळापासून तयार केलेले पाणी सकाळी लवकर प्यावे. शक्यतो झोपेतून उठताच उपाशी पेाटी घेतल्यास अधीक चांगले. उन्हाळ्याच्या हंगामात, तुम्हाला ते दिवसातून एकदाच प्यावे लागेल आणि हे सुमारे तीन ते पाच दिवस करावे लागेल.
जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती क्षीण, कमकुवत झालेली असते, तेव्हा शरीरात अनेक आरोग्य समस्यांसह आजार जडण्याची अधीक भिती असते. अशा वेळेस लवंग आणि जायफळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रभावी उपायात गणले जातात, कारण त्यात अँटीऑक्सिडंट, अँटीबैक्टीरियल आणि अँटीफंगल गुणधर्म सारख्या प्रमाणात यात आढळून येतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा संरर्गं असल्यास काही दिवसातच तो दूर होतो.
कोरोनापासून वाचण्यासाठी अनेकांनी लवंग आणि जायफळापासून बनवलेल्या काढ्यांचा भरपूर प्रयोग केला असला तरी, प्रमाणापेक्षा अधीक वापर नकोच हे देखील लक्षात ठेवले पाहिजे. बेचैन करणारी घशाची खवखव लवंग जायफळाच्या वापरातून दूर करता येते हे त्याचे वैशिष्ट्य आहे. मात्र, ते रोज प्यायल्याने तुम्ही इतर आरोग्याच्या समस्यांना बळी पडू शकता. म्हणुन आराम पडताच वापर थांबवायला विसरु नका.