नवी दिल्ली: दररोज नियमितपणे तीन कप कॉफी पिणे हृदयासाठी अत्यंत चांगलं असल्याचं समोर आलं आहे. रोजी तीन कप कॉफी प्यायल्याने स्ट्रोकचा त्रास 21 टक्क्यांनी तर हृदयरोगाचा धोका 17 टक्क्यांनी कमी होत असल्याचं आढळून आलं आहे. बुडापेस्ट येथील सेमिल्व्हिस यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून ही नवी माहिती उजेडात आली आहे. (Coffee Reduces Stroke Risk And Heart Diabetes; All You Need To Know)
कॉफी प्यायल्याने हृदरोगाचे विकार खरोखरच की होतात का? याची माहिती संशोधकांना कशी मिळाली? तीन कपापेक्षा अधिक कॉफी प्यायल्यास शरीराला काही नुकसान होतं का? या सर्व प्रश्नांचा घेतलेला हा धांडोळा.
रिसर्च प्रोसेस: संशोधकांनी यूके बायोबँकमध्ये नोंद असलेल्या 4,60,000 लोकांवर संशोधन केलं. संशोधना दरम्यान या लोकांची प्रकृती आणि त्यांच्या कॉफी पिण्याच्या सवयींचं विश्लेषण करण्यात आलं. संशोधन अधिक विस्तृतपणे समजावं म्हणून या लोकांचं तीन विभागात वर्गीकरण करण्यात आलं.
पहिला ग्रुप: 22 टक्के लोकांनी कॉफीचा एक थेंबही घेतला नाही.
दुसरा ग्रुप: 58 टक्के लोकांनी अर्धा ते तीन कप कॉफी घेतली.
तिसरा ग्रुप: 20 टक्के लोकांनी तीनहून अधिक कप कॉफी घेतली.
निष्कर्ष: ज्या लोकांनी रोज 3 कप कॉफी घेतली त्यांच्यातील मृत्यूचा धोका 12 टक्क्याने घटला. हृदयरोगाची शक्यता 17 टक्क्याने कमी झाली आणि स्ट्रोकची रिस्क 21 टक्क्याने कमी झाली.
कॉफी घेतल्याने लोकांच्या हृदयावर काय परिणाम झाला याची माहिती घेण्यासाठी संशोधकांनी हृदयाचा एमआरआय स्कॅन केला. स्कॅनिंग केल्यामुळे कॉफीचा हृदयावर पडणारा परिणाम दिसून आला. ज्या लोकांनी कॉफीचा एक थेंबही घेतला नव्हता. त्यांच्या हृदयाशी या स्कॅन रिपोर्टची तुलना करण्यात आली. त्यावेळी जे लोक अत्यल्प प्रमाणात कॉफी पीत होते. त्यांच्या हृदयाचा आकार हेल्दी होण्याबरोबरच अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत असल्याचं दिसून आलं.
हृदयरोग आणि कॉफीचं कनेक्शन समजून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभ्यास करण्यात आला. कॉफी प्यायल्यावर त्याचा हृदयरोगांवर काय परिणाम होतो हे जाणून घेण्याचा यावेळी प्रयत्न केला गेला, असं संशोधक डॉ. जुदित सिमोन यांनी सांगितलं. मर्यादित प्रमाणात कॉफी घेणं चांगलं आहे. मात्र, रोज त्यापेक्षा अधिक प्रमाणात कॉफी घेतल्यास त्याचे उल्टे परिणाम होऊ शकतात. 10 ते 15 लोकांवर त्याचा परिणामही पाहायला मिळाला आहे. रोज अर्धा कप ते तीन कप कॉफी घेणं उत्तम आहे, असंही सिमोन यांनी सांगितलं.
तज्ज्ञांच्या मते, दिवसातून तीन कपपेक्षा अधिक कॉफी घेऊ नका. त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते. कॉफीतील कॅफीनमुळे नुकसान होऊ शकतं. कॅफीन कॉफी आणि कोकोो प्लांटमध्ये सापडणारा स्टिमुलेंट आहे. कॉफीद्वारे तो शरीरात पोहोचतो. त्याचा थेट मेंदूच्या नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटतं. (Coffee Reduces Stroke Risk And Heart Diabetes; All You Need To Know)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 31 August 2021 https://t.co/KwVyAQYqAo #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 31, 2021
संबंधित बातम्या:
व्हर्जिनिटीसाठी तरुणींचं घातक पाऊल, ‘या’ पद्धतीवर बंदीची मागणी!
‘डाराडूर’ झोप घ्या, लठ्ठपणा, तणावापासून मुक्त व्हा; पुरेशा झोपेसाठी ‘हे’ करा!
(Coffee Reduces Stroke Risk And Heart Diabetes; All You Need To Know)