काळा गॉगल डोळ्यांच्या संसर्गापासून वाचवू शकतो का?

पण या काळ्या चष्म्याचा खरंच काही उपयोग होतो का? याने संसर्ग टाळता येतो का? नुसत्या डोळ्यांकडे पाहिलं तरी हा संसर्ग होतो असा गैरसमज लोकांमध्ये आहे. चला तर मग जाणून घेऊ, काळा चष्मा डोळ्यांच्या संसर्गापासून वाचवू शकतो का?

काळा गॉगल डोळ्यांच्या संसर्गापासून वाचवू शकतो का?
conjuctivitis case
Follow us
| Updated on: Jul 30, 2023 | 3:02 PM

मुंबई: राज्यभरात डोळ्याची साथ आलीये. अर्थातच वातावरणातील बदल त्यामुळे साथीचे रोग पसरणारच. डोळे आले की लोक सगळ्यात आधी काय करत असतील तर ते लावतात काळा चष्मा! पण या काळ्या चष्म्याचा खरंच काही उपयोग होतो का? याने संसर्ग टाळता येतो का? नुसत्या डोळ्यांकडे पाहिलं तरी हा संसर्ग होतो असा गैरसमज लोकांमध्ये आहे. चला तर मग जाणून घेऊ, काळा चष्मा डोळ्यांच्या संसर्गापासून वाचवू शकतो का?

दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील नेत्र विभागाचे HOD प्राध्यापक डॉ. ए. के. ग्रोव्हर म्हणाले की, काळा चष्मा घातल्याने आय फ्लूपासून बचाव होऊ शकत नाही. संक्रमित व्यक्तीच्या डोळ्यात पाहून आजूबाजूच्या लोकांना अस्वस्थ वाटू नये म्हणूनच काळा चष्मा लावला जातो. बाकी अशावेळी जर कोणी काळा चष्मा लावला असेल पण ती व्यक्ती संक्रमिताच्या संपर्कात आली किंवा त्याच्या वस्तू वापरत असेल तर संसर्ग होतो, त्यालाही/ तिलाही डोळे येऊ शकतात.

तुम्ही काळा चष्मा घालू शकता पण यामुळे रोगाचा धोका टाळता येऊ शकतो यावर विश्वास ठेवू नका. स्पर्श केल्याने हा आजार पसरत असतो. संरक्षणासाठी वेळोवेळी हात स्वच्छ धुवा आणि स्वच्छतेची काळजी घ्या.

आय फ्लू मध्ये चष्मा घालण्याचे फायदे

– फक्त काळा चष्मा घालण्याचा फायदा म्हणजे यामुळे डोळ्यांचे उन्हापासून संरक्षण होते.

– जर बाधित व्यक्तीने चष्मा घातला असेल तर तो वारंवार डोळ्यांना स्पर्श करणे टाळू शकतो. जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा खाज येते किंवा जळजळ होते आणि आपल्याला वारंवार स्पर्श करावासा वाटतो, तर चष्मा आपल्याला या सवयीपासून दूर ठेवू शकतो.

– डोळ्यात माती किंवा धूळ गेल्यास जळजळ किंवा खाज सुटते आणि डोळ्यात आय फ्लूची समस्या असेल तर ती आणखी वाढते. चष्मा लावल्याने डोळ्यात माती किंवा धूळ येत नाही.

डोळ्यांचा फ्लू टाळण्यासाठी करा ‘या’ गोष्टी

– डोळ्यांचा हा संसर्ग टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वच्छता. याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. वारंवार हात धुण्याची सवय लावा.

– जर एखाद्या संक्रमित व्यक्तीला त्याच्याशी संपर्क साधण्यास भाग पाडले गेले तर त्यानंतर आपले हात आणि वस्तू सॅनिटाईज करा.

– दिवसातून दोन ते तीन वेळा थंड पाण्याने डोळे धुवून त्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या.

– संक्रमित व्यक्तीने घराबाहेर पडणे टाळा. डोळ्यांना वारंवार हात लावू नका आणि आपल्या वस्तूंचा वापर करून त्या घरातील वेगळ्या ठिकाणी ठेवण्याची सवय लावा.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.