Health Care Tips | वजन कमी होते म्हणून सतत काकडी खाता? वाचा मग दुष्परिणाम!
उष्ण हवामानात शरीर थंड ठेवण्यासाठी जास्त हलके अन्न, कमी मसाले, पाणी, सूप, फळे, फळांचा रस खाण्याची शिफारस केली जाते. काकडी ही गरम असते. सुमारे 90 टक्के काकडीत पाणी असते. तसेच कॅलरीज पूर्णपणे नसतात. फायबर भरपूर प्रमाणात असते. जे आपली भूक नियंत्रित करते. काकडी आपल्याला वजन कमी करण्यास देखील मदत करते.
मुंबई : तापमानात वाढ होत आहे आणि जीवाची लाहीलाही होत आहे. उन्हामध्ये (Summer) बाहेर जाणे देखील शक्य होत नाहीये. काही शहरांमध्ये तर 40 अंश सेल्सिअसवर तापमान पोहचले आहे. त्वचेची जळजळ, उष्माघाताची शक्यता, निर्जलीकरण (Dehydration) या समस्यांमध्येही मोठी वाढ झाल्याचे दिसते आहे. यामुळे या हंगामामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. या हंगामामध्ये निरोगी राहण्यासाठी काही पदार्थांचा आहारामध्ये समावेश करायला हवा. उन्हाळ्या म्हटंले की, लोक निरोगी राहण्यासाठी काकडीचा (Cucumber) आहारामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश करतात. काकडी खाणे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, असे म्हणतात ना…अति तिथे माती…तसेच काही लोक निरोगी राहण्यासाठी काकडीचे अतिसेवन करतात, हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.
काकडीचे अतिसेवन धोकादायक
उष्ण हवामानात शरीर थंड ठेवण्यासाठी जास्त हलके अन्न, कमी मसाले, पाणी, सूप, फळे, फळांचा रस खाण्याची शिफारस केली जाते. काकडी ही गरम असते. सुमारे 90 टक्के काकडीत पाणी असते. तसेच कॅलरीज पूर्णपणे नसतात. फायबर भरपूर प्रमाणात असते. जे आपली भूक नियंत्रित करते. काकडी आपल्याला वजन कमी करण्यास देखील मदत करते. उन्हाच्या दिवसात काकडीची मागणी वाढते. काकडीत असलेले अँटीऑक्सिडंट आपल्या शरीराला थंड ठेवतात. पण कोणत्याच गोष्टीचा अतिरिक्त नकोच.
अन्न पचनात समस्या निर्माण होतात
जास्त प्रमाणात काकडी खाल्ल्याने पोट दुखण्याची शक्यता असते. अन्न पचनात समस्या निर्माण होतात. तसेच गॅस आणि छातीत जळजळ होण्याची शक्यता वाढते. काकडी पचायलाही वेळ लागतो. दिवसभर काहीही न खाता दही आणि काकडी खाल्ले तर वजन कमी होईल, असे अनेकांना वाटते, पण हे चुकीची आहे. यामुळे शरीराच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्याचप्रमाणे काकडी खाताना कडवट भाग काढून टाकला. कडू काकडी कधीही खाऊ नका.
(वरील टिप्स सामान्य ज्ञानावर आधारित आहेत, फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)