तुम्हीही भेसळयुक्त चहापत्ती घेत नाहीयेत ना? भेसळयुक्त चहापत्ती ओळखण्यासाठी ही सोपी पध्दत जाणून घ्या!

भेसळयुक्त खाद्यपदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक (Dangerous) आहे. सध्याच्या काळात बाजारामध्ये अनेक पदार्थ भेसळयुक्त आहेत. त्याचे आपण सेवन केल्याने आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. भेसळयुक्त पदार्थ (Food) ओळखण्यासाठी अनेक प्रकारचे संशोधने केली जात आहेत. भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्याने आपल्या हाडांची झिज होण्याची देखील असते.

तुम्हीही भेसळयुक्त चहापत्ती घेत नाहीयेत ना? भेसळयुक्त चहापत्ती ओळखण्यासाठी ही सोपी पध्दत जाणून घ्या!
भेसळयुक्त चहापत्ती आरोग्यासाठी धोकादायक
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 10:32 AM

मुंबई : भेसळयुक्त खाद्यपदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक (Dangerous) आहे. सध्याच्या काळात बाजारामध्ये अनेक पदार्थ भेसळयुक्त आहेत. त्याचे आपण सेवन केल्याने आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. भेसळयुक्त पदार्थ (Food) ओळखण्यासाठी अनेक प्रकारचे संशोधने केली जात आहेत. भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्याने आपल्या हाडांची झिज होण्याची देखील शक्यता असते. आज तेल, साखर, गूळ, तूप, विविध पेय, दूध, दही आणि अशा कित्येक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जाते. आता तर एक धक्कादायक बाब पुढे आली असून आता थेट चहापत्तीमध्ये देखील भेसळ (Counterfeiting) केल्याचे काही प्रकरणे पुढे आले आहेत.

भेसळयुक्त चहापत्ती आरोग्यासाठी धोकादायक

आपल्या सर्वांचीच सकाळ एक घोट चहा घेतल्याशिवाय होत नाही. जर आपल्याला सकाळी चहा मिळाला नाहीतर दिवसभर आपली चिडचिड होते. विशेष म्हणजे चहाला असा कोणताच ठराविक वेळ नसतो. चहा कधीही घेतला जातो. मात्र, तुम्हाला हे ऐकून नक्कीच धक्का बसेल की, आता चहाच्यापत्तीमध्ये देखील भेसळ केली जात आहे आणि हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. यामुळे आपण जी चहापत्ती बाजारामधून खरेदी करतो, त्याची पडताळणी नक्कीच करायला हवी.

हैदराबादमध्ये आढळली अनेक प्रकरणे

नुकताच काही राज्यांमध्ये भेसळयुक्त चहापत्ती आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. चहापत्तीमध्ये रंग आणण्यासाठी विविध रंगाचा आणि डांबरचा वापर सर्रास केला जात असल्याचे उघड झाले आहे. धोकादायक बाब म्हणजे ही भेसळयुक्त चहापत्ती आपल्या शेजारील राज्यामधील हैदराबाद येथे आढळली आहे. आता यावर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने भेसळयुक्त चहापत्ती नेमकी कशी ओळखायची यासाठी एक अत्यंत सोपी पध्दत लोकांना सांगितली आहे.

अशाप्रकारे ओळखा भेसळयुक्त चहापत्ती

भेसळयुक्त चहापत्ती ओळखण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर एक फिल्डर पेपर लागणार आहे. एक फिल्डर पेपर घ्या आणि त्यावर चहापत्ती व्यवस्थित पसरवा. त्यानंतर चहापत्ती काढा आणि हा पेपर चांगल्या प्रकाशामध्ये काही वेळ ठेवा. जर आपल्या या फिल्डर पेपरवर एकही डाग दिसत नसेल तर समजा की, आपली चहापत्ती भेसळयुक्त नाहीये. जर आपल्या फिल्डर पेपरवर डाग पडला असेल तर लगेचच समजा की, आपली चहापत्ती ही भेसळयुक्त आहे आणि ही चहापत्ती अजिबात वापरू नका.

संबंधित बातम्या : 

अस्थमाचा त्रास होतोय…? मग आजच पुण्याच्या बीएसआयमध्ये जाऊन अस्थमावरील रामबाण औषध घ्या!

Health Care Tips : उन्हाळ्यात हे 5 पदार्थ नक्की खा आणि निरोगी राहा!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.