Health | दररोज सकाळी लसूण आणि मधाचे सेवन करा आणि या आरोग्य समस्या मिनिटांमध्ये दूर करा!

लसूण आणि मधाचे एकाच वेळी सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. सकाळी रिकाम्या पोटी मधात लसूण बुडवून खाल्ल्याने तुम्ही आरोग्याशी संबंधित अनेक आजारांवर मात करू शकता. अशा प्रकारे लसणाचे सेवन केल्याने तुम्हाला कोणते फायदे मिळतात. यामुळे तुमच्या शरीराला दिवसभर ऊर्जा मिळण्यासही मदत होते.

Health | दररोज सकाळी लसूण आणि मधाचे सेवन करा आणि या आरोग्य समस्या मिनिटांमध्ये दूर करा!
Image Credit source: healthline.com
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 12:06 PM

मुंबई : पदार्थ कोणताही असो जोपर्यंत लसणाची (Garlic) झणझणीत फोडणी देत नाही तोपर्यंत पदार्थाची चवच वाढत नाही. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, लसण खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. लसणाच्या मदतीने आपण आरोग्याच्या अनेक समस्या दूर करू शकतो. विशेष म्हणजे लसूण रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवण्यासही मदत करतो. ज्यामुळे आपण अनेक रोगांपासून दूर राहू शकतो. बहुतेक स्वयंपाकघरात तुम्हाला लसूण सहज मिळेल. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. लसूण केवळ आयुर्वेदातच नाही तर अॅलोपॅथीमध्येही फायदेशीर (Beneficial) मानला जातो. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे लठ्ठपणा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवत नाहीत. रोज सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकता.

लसूण आणि मध सेवन

लसूण आणि मधाचे एकाच वेळी सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. सकाळी रिकाम्या पोटी मधात लसूण बुडवून खाल्ल्याने तुम्ही आरोग्याशी संबंधित अनेक आजारांवर मात करू शकता. अशा प्रकारे लसणाचे सेवन केल्याने तुम्हाला कोणते फायदे मिळतात. यामुळे तुमच्या शरीराला दिवसभर ऊर्जा मिळण्यासही मदत होते.

हे सुद्धा वाचा

अतिरिक्त चरबी कमी होते

चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घ्या आणि त्या मधामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर दोन तासांनी लसणाचे सेवन करा. याप्रकारे जर तुम्ही सतत एक महिना लसणाचे सेवन केले तर तुमच्या शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. मात्र, हे फाॅलो करण्याच्या अगोदर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

रोगप्रतिकारक शक्ती

लसूण आणि मधाचे गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसूण मधात बुडवून खाल्ल्याने तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. असे केल्याने तुम्हाला घसा खवखवणे या समस्या दूर होतात.

कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते

बाहेरचे अन्न खाल्ल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊ लागते. हे कोलेस्टेरॉल इतके वाढते की ते आपल्या आरोग्यासाठी धोकादाक होण्यास सुरूवात होते. हे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमधून साफ ​​न झाल्यास हृदयविकाराचा झटका किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. लसूण आणि मध या मिश्रणाने तुम्ही रक्तवाहिन्या स्वच्छ करू शकता.

मधुमेहाची समस्या दूर होण्यास मदत

ज्यालोकांना मधुमेहाचा त्रास होतो. अशांनी आपल्या आहारामध्ये लसणाचा समावेश करायला हवा. तसेच दररोज सकाळी रिकाम्या पोटी मधाच्या पाण्याचे सेवन केल्याने लठ्ठपणाची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते. कोमट पाण्यामध्ये दोन चमचे मध मिक्स करा आणि दररोज सकाळी प्या. यामुळे आपले वाढलेले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.