Health Care Tips | हळदीचे सेवन करणे या लोकांसाठी हानिकारक, जाणून घ्या सविस्तरपणे!

अनेकांना स्टोनचा त्रास होतो. अशावेळी हळदीचे सेवन करण्याच्या अगोदर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. हळदीमध्ये ऑक्सलेट असते. यामुळे कॅल्शियम शरीरात विरघळत नाही. ते स्टोन तयार होण्याचे महत्त्वाचे कारण बनते, त्यामुळे हळदीचे सेवन करण्याच्या अगोदर निश्चितपणे विचार करायला हवा.

Health Care Tips | हळदीचे सेवन करणे या लोकांसाठी हानिकारक, जाणून घ्या सविस्तरपणे!
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 6:00 AM

मुंबई : हळद (Turmeric) आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. अन्नाचा रंग आणि चव वाढवण्यास हळद मदत करते. हे केवळ आरोग्यच नाही तर सौंदर्य (Beauty) देखील वाढवते. हळदीचा उपयोग आयुर्वेदात औषध म्हणून केला जातो. हळदीमध्ये प्रतिजैविक, कॅल्शियम, लोह, सोडियम, अँटीसेप्टिक, व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि जीवनसत्त्वे यांसारखे पोषक घटक देखील असतात. हळदीमध्ये कर्क्युमिन तत्व असते. त्यात अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते. पण याचे जास्त प्रमाणात सेवन करणेही आपल्या आरोग्यासाठी घातक आणि धोकादायक आहे.

स्टोन

अनेकांना स्टोनचा त्रास होतो. अशावेळी हळदीचे सेवन करण्याच्या अगोदर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. हळदीमध्ये ऑक्सलेट असते. यामुळे कॅल्शियम शरीरात विरघळत नाही. ते स्टोन तयार होण्याचे महत्त्वाचे कारण बनते, त्यामुळे हळदीचे सेवन करण्याच्या अगोदर निश्चितपणे विचार करायला हवा.

अतिसार

हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे तत्व असते. त्यामुळे पचनाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे ज्यालोकांना अतिसाराचा त्रास आहे, त्यांनी हळदीचे सेवन करण्याच्या अगोदर नक्कीच विचार करावा.

मधुमेह

मधुमेहाने त्रस्त असलेल्यांनी आपल्या आहाराची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत अनेक पदार्थ खाण्या आणि पिण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या. मधुमेहाच्या रुग्णाने हळदीचे अतिसेवन टाळावे.

नाकातून रक्तस्त्राव

अनेक लोक नाकातून रक्तस्त्राव झाल्याची तक्रार करतात. हे उष्णतेमुळे होते. हळद गरम असते. त्याच्या अतिसेवनाने ही समस्या आणखी वाढू शकते.

कावीळ

ज्या लोकांना कावीळ झाला आहे. त्यांनी हळद खाण्याचा सल्ला डाॅक्टरांकडूनच घ्यावा. जर आपण असे नाही केले तर आरोग्याच्या समस्या अधिक निर्माण होण्याची शक्यता असते.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.