मुंबई : भारतामध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या (Corona) रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते आहे. गेल्या 24 तासांमध्ये 8329 नवीन रुग्ण कोरोनाचे आढळले आहेत. यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क लावणे गरजेचे झाले. रूग्ण वाढीसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिलीये. आरोग्य मंत्रालयाच्या (Ministry of Health) माहितीप्रमाणे एका दिवसात 8329 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता बाधितांची संख्या 4,32, 13, 435 झाली आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 40,370 झाली आहे. देशातील कोरोना नमुना चाचणीचा आकडा आता 85, 45, 43,282 वर पोहोचला आहे. कोरोनाची वाढती संख्या बघता आता काळजी आणि सुरक्षा (Security) घेणे महत्वाचे झाले आहे हे नक्की.
गेल्या काही महिन्यांपूर्वी कोरोनाच्या केसेस कमी झाल्यामुळे कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले होते. मात्र, परत एकदा देशातील कोरोना रूग्णांचा आकडा धडकी बसवणारा आहे. मुंबईमध्येही कोरोनाच्या रूग्णांची संख्या सतत वाढताना दिसते आहे. शुक्रवारी देशामध्ये कोरोना संसर्गाच्या एकूण 3,44,994 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) ही माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आणखी 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 524757 वर पोहोचली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 4,103 ने वाढली आहे आणि ती संसर्गाच्या एकूण प्रकरणांच्या 0.09 टक्के आहे.
कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 4, 26, 48308 झाली आहे. मृत्यूचे प्रमाण 1.21 टक्के आहे. अँटीकोविड 19 लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 194.92 कोटी डोस देण्यात आले आहेत. 7 ऑगस्ट 2020 रोजी देशातील संक्रमित लोकांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. संसर्गाची एकूण प्रकरणे 16 सप्टेंबर 2020 रोजी 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर 90 आहेत.