AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coronavirus : तो पुन्हा आलाय ! XBB.1.16 व्हेरिएंटचा आकडा झाला 600 पार, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Corona New Variant : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना विषाणूची 1,573 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर सक्रिय रुग्णांची संख्या 10,981 झाली आहे.

Coronavirus : तो पुन्हा आलाय !  XBB.1.16 व्हेरिएंटचा आकडा झाला 600 पार, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 1:44 PM

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसने (corona) पुन्हा थैमान घातले आहे. अनेक राज्यांमध्ये संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. देशात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजारांहून अधिक झाली आहे. दरम्यान, Omicron च्या XBB.1.16 व्हेरिअंटच्या केसेस देखील वेगाने (cases are rising) वाढताना दिसत आहेत. आतापर्यंत या प्रकाराची 600 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. ओमिक्रॉन प्रकाराची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नोंदवली गेली आहेत. या राज्यांमध्ये कोविड प्रकरणांमध्ये (covid cases) वाढ होण्यामागे हा नवीन स्ट्रेन कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोविडचा आलेखही वाढत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना विषाणूची 1,573 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर सक्रिय रुग्णांची संख्या 10,981 झाली आहे. देशात कोविडचा सकारात्मकता दर 1.30 टक्के झाला आहे. राष्ट्रीय कोविड रिकव्हरी दर हा 98.79 टक्के इतका नोंदवला गेला आहे. या आजारातून बरे होणाऱ्या लोकांची संख्या 4,41,65,703 वर पोहोचल्याचे आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.

तर देशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के नोंदवले गेले आहे. तज्ञांच्या सांगण्यानुसार, XBB.1.16 हा व्हेरिअंट हा कोविडच्या वाढत्या प्रकरणांसाठी कारणीभूत असू शकतो. कारण व्हायरसमध्ये म्यूटेशन होऊन हा स्ट्रेन निर्माण झाला आहे, त्यामुळे लोकांना वेगाने संसर्ग होत आहे. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

हे सुद्धा वाचा

नव्या लाटेसाठी XBB.1.16 व्हेरिअंट कारणीभूत ठरू शकतो का ?

एम्समधील क्रिटिकल केअर विभागातील डॉक्टरांनी Tv9 शी बोलताना सांगितले की, कोविड व्हायरसमध्ये उत्परिवर्तन होतच असते. यामुळे दर काही महिन्यांनी नवीन प्रकार येतो. XBB.1.16 व्हेरिअंट देखील असाच आला आहे. यामुळे प्रकरणे वाढत आहेत. मात्र या प्रकारामुळे कोणतीही नवीन धोकादायक लहर उद्भवणार नाही. आतापर्यंत, या व्हेरिअंटच्या संक्रमितांमध्ये फक्त सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. मात्र असे असले तरीही वृद्ध नागरिक आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. अशा लोकांना कोणत्याही नवीन प्रकाराचा धोका असू शकतो.

मास्क हा बचावासाठी ठरेल उत्तम

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, लोकं आता मास्क घालत नाहीत. पण आता लोकांनी मास्क वापरायला पुन्हा सुरुवात केली पाहिजे. काही दिवस व्हायरसचा धोका कायम राहणार आहे. अशा परिस्थितीत सर्वांना मास्क घालण्याचा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, उच्च जोखीम असलेल्या लोकांनी बूस्टर डोस घेतलेला नसेल तर त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, असेही डॉक्टरांनी नमूद केले.

'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.