कोरोनाविरुध्द ‘व्हिटॅमिन डी’वरदानापेक्षा कमी नाही जाणून घ्या कसे ?

‘व्हिटॅमिन डी’ हे केवळ हाडांच्या बळकटीकरणासाठीच नव्हे तर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ‘व्हिटॅमिन डी’कमतरतेमुळे आपणास अनेक समस्या निर्माण होउ शकतात.

कोरोनाविरुध्द ‘व्हिटॅमिन डी’वरदानापेक्षा कमी नाही जाणून घ्या कसे ?
corona
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 11:39 AM

मुंबई :  लहानपणापासून आपल्याला घरातील मोठ्यांकडून सकाळचे कोवळे उन अंगावर घेण्याचा सल्ला देण्यात येत असतो. नुकत्याच जन्माला आलेल्या बालकांना काविळीची लागण झालेली असल्याने त्यांना सुरुवातीचे पाच दिवस कोवळ्या उन्हात ठेवण्याचा सल्ला ही तज्ज्ञांकडून दिला जात असतो. त्यामुळे सकाळच्या कोवळ्या उन्हाचे महत्व आपण सर्वच जाणतो. सकाळच्या सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती (Immunity) मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने यामुळे कोरोनाविरुध्दच्या (corona) लढ्यासाठी अधिक बळ मिळत असते. कोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून अनेक तज्ज्ञांनी ‘व्हिटॅमिन डी’ची शिफारस केली आहे. त्वचा सूर्यप्रकाशाच्या (Sunlight) संपर्कात आली की शरीरात ‘व्हिटॅमिन डी’ (vitamin D) तयार होते. जे लोक फार कमी वेळा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात त्यांच्यात ‘व्हिटॅमिन डी’ची पातळी कमी आढळते. कोरोना संसर्गाच्या वेळी अनेकांकडून घरातच राहण्याचा सल्ला देण्यात येत होता. अशा वेळी शरीरातील ‘व्हिटॅमिन डी’ची पातळी कमी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

लॉकडाउन आणि ‘व्हिटॅमिन डी’

कोरोना संसर्ग वाढीच्या वेळी शासनाने दिलेल्या सूचनांनुसार तसेच आपल्या आरोग्याच्या काळजीपोटी अनेकांनी घरातच राहणे पसंत केले होते. या वेळी अनेकांच्या शरीरातील ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता निर्माण झाली होती. दरम्यान, ‘व्हिटॅमिन डी’हे कोरोना प्रतिबंधावर किती फायदेशीर आहे याचा काही पुरावा नसला तरी, ‘व्हिटॅमिन डी’मुळे शरीरातील रोगप्रतिकारक्षमता वाढत असल्याने तज्ज्ञांकडून ‘व्हिटॅमिन डी’हे कोरोना काळात प्रतिबंधात्मक उपाय योजना असल्याचे मानले गेले आहे. कोरोना संसर्गामुळे मायोकार्डिटिस myocarditis, मायक्रोव्हस्कुलर थ्रोम्बोसिस microvascular thrombosis किंवा cytokine storms होतात. या सर्वांमध्ये जळजळ होते. ‘व्हिटॅमिन डी’हे रोग प्रतिकारशक्ती वाढवते व जळजळ कमी करते म्हणूनच कोरोनाविरुध्द ‘व्हिटॅमिन डी’ ला प्रभावी मानले जाते.

तज्ज्ञ काय सांगतात ?

तज्ज्ञांच्या मते, निमोनिया/एआरडीएस, जळजळ, साइटोकिन्स आणि थ्रोम्बोसिस संदर्भात ‘व्हिटॅमिन डी’च्या माध्यमातून कोरोनाचा प्रभाव कमी झालेला आढळला. युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा, मिनियापोलिस, यूएसए (University of Minnesota, Minneapolis, USA) येथील संशोधकांच्या मते, ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता साइटोकाइन्समध्ये वाढ आणि न्यूमोनिया आणि व्हायरल अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका निर्माण करणारी ठरु शकते. लठ्ठपणा आणि मधुमेह असलेल्या रूग्णांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’ ची कमतरता अधिक आढळून आली आहे. यामुळे कोरोना काळात मृत्यूचे प्रमाण देखील अधिक नोंदवले गेले आहे.

श्‍वसनासंबधित आजाराला फायदा

हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या मते, 2009 मध्ये H1N1 विषाणूमुळे झालेल्या साथीच्या फ्लूच्या अभ्यासात ‘व्हिटॅमिन डी’च्या प्रभावामुळे श्वसनमार्गाच्या संक्रमणाची शक्यता 12 ते 75 टक्क्यांपर्यंत कमी होते. सर्व वयोगटातील रूग्णांमध्ये आणि आधीच अस्तित्वात असलेले जुनाट आजार असलेल्या व्यक्तींमध्ये ‘व्हिटॅमिन डी’चा फायदेशीर परिणाम दिसून आला. ज्यांना संसर्ग झाला होता, त्यांच्यामध्ये फ्लूची लक्षणे कमी होती आणि जर त्यांना 1000 IU पेक्षा जास्त ‘व्हिटॅमिन डी’चा डोस मिळाला असेल तर ते लवकर बरे होत असल्याचेही अहवालात नमूद आहे.

तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

‘व्हिटॅमिन डी’युक्त गोळ्यांबाबत तज्ज्ञांच्या सूचना घेणे आवश्‍यक आहे. याशिवाय दररोज काही मिनिटांसाठी शरीरावर सूर्यप्रकाश घ्यावा. दैनंदिन आहारात ‘व्हिटॅमिन डी’ समृद्ध अन्न समाविष्ट केले पाहिजे. मासे, मशरूम, गाईचे दूध, सोया दूध आणि अंडी यांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’ भरपूर प्रमाणात असते. या सर्व पूरक आहारातून शरीरातील ‘व्हिटॅमिन डी’ कमतरता दूर होण्यास मदत मिळू शकते. वयोवृध्दांसह नवजात शिशूंपर्यंत सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश हा वरदानापेक्षा कमी नसतो.

(टीप : सदर लेख उपलब्ध माहितीवर आधारीत आहे, यास कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

इतर बातम्या

निर्बंधांमुळे हॉटेल व्यवसायिक अडचणीत, आहार संघटनेचं उद्धव टाकरे आणि अजित पवार यांना पत्र

Amravati | Ravi Rana यांनी अमरावतीत विनापरवानगी बसवलेला शिवरायांचा पुतळा रातोरात हटवला

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.